लोहारा प्रतिनिधी ( गिरीश भगत )
लोहारा येथील महाशिवरात्री महोत्सवास मंगळवारी (दि. 13) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. महाशिवरात्री निमित्त सकाळी 10 वाजता शहरातील जगदंबा मंदिरा पासून महादेव मंदिरा पर्यंत महादेवाच्या मु्र्तीची व काठीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वारकरी मंडळी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाशिवरात्री निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोहारा शहरात दि. 13 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता शहरातील जगदंबा मंदिरापासून महादेव मुर्ती व मानाच्या काठीची टाळमृदंगाच्या गजरात सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. डॉ. आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, शिवाजी चौक मार्गे महादेव मंदिर पर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी महादेव मंदिर येथे भारूडाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोरामणी, खंडाळा, उंडरगाव येथील पथकाने भारूडे सादर केली. यावेळी नगरसेवक बाळु कोरे,श्रीनिवास माळी, गगन माळवदकर, काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, सतिश ढगे, गोपाळ सुतार, विठ्ठल वचने, विरेश स्वामी, ओम पाटील, उदय कुलकर्णी, स्वनिल माटे, संतोष फावडे, बळी रणशुर, महेश कुंभार, अमोल बिराजदार, बाळु माशाळकर, गणेश हिप्परगेकर, सहदेव काडगावे, विलास मुळे, प्रकाश तोरकडे, यांच्यासह शहरातील युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोहारा शहरात शंभु महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंगळवारी ( दि. 13) महाशिवरात्री निमित्त पहाटेपासूनच शंभु महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
या महोत्सवात बुधवारी ( दि.14 ) महादेव मंदिरात काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तसेच दुपारी 4 वाजता जंगी कुस्ती स्पर्धा होणार आहेत. गुरुवारी ( दि.15 ) सकाळी 7 वाजता शहरात 3000 मिटरची मँरेथाँन स्पर्धा होणार आहे. तसेच सायकाळी 4 वाजता भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी ( दि. 16) सायंकाळी 6 च्या सुमारास लोहारा हायस्कुलच्या प्रांगणात भव्य खुल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
---------------------------------------------------------------
शोभा यात्रे दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील दहिटने येथील हलगी पथकाने त्यांची कला सादर केली. त्यांनी विविध प्रकारे सादर केलेल्या हलगी प्रकार पाहून उपस्थित ग्रामस्थ भारावून गेले होते.

No comments:
Post a Comment