20 April 2019

उमरगा येथे शिवविवाह संपन्न - समाज विकास संस्थेने केले होते आयोजन





लोहारा प्रतिनिधी -

उमरगा येथील समाज विकास संस्थेच्या वतीने शनिवारी ( दि. 20) उमरगा तालुक्यातील जवळगा येथील अमरसिंग कुंदनसिंह आणि पुणे येथील पुजा यांचा शिवविवाह संपन्न झाला. उमरगा येथील वात्सल्य बालगृह या ठिकाणी हा शिवविवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्या प्रसंगी समाज विकास संस्थेचे सचिव भूमिपुत्र वाघ, अनाथाची आई विद्याताई वाघ, सारिका लोंढे, शालिनी पाटील, ज्योती राजपूत, कृष्णा पाटील, सारिका लोंढे, सुमन कावळे उपस्थित होते. या नवदाम्पत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आशिर्वाद घेतले व वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली. समाज विकास संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या ह्या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

04 April 2019

लोहारा - महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी महेश कुंभार तर उपाध्यक्षपदी ओम पाटील यांची निवड

अध्यक्ष

उपाध्यक्ष



लोहारा प्रतिनिधी -

महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी महेश कुंभार तर  उपाध्यक्षपदी ओम पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
                लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात माधवराव वकिल यांच्या अध्यक्षतेखाली लिंगायत समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी महेश कुंभार, उपाध्यक्षपदी ओम पाटील व परमेश्वर चिकटे, सचिवपदी मंगेश बनशेट्टी, बबलु यल्लोरे, मिरवणुक प्रमुख प्रथमेश मुळे, महेश चपळे, प्रसिध्दी प्रमुख म्हणून संतोष फावडे यांची निवड करण्यात आली. या बैठकीस दिपक मुळे, बाळासाहेब कोरे, हरी लोंखडे, शिवा स्वामी, मल्लिनाथ घोंगडे, सतिश जट्टे, गणेश कमलापुरे, सचिन तोडकरी, गणेश पालके, कपिल माशाळकर, बाळू माशाळकर, रामेश्वर वैरागकर, सहदेव काडगावे, पप्पु तोडकरी, ओम बिराजदार, विशाल मिटकरी, रामेश्वर काडगावे, अमोल तोडकरी, रामू मिटकरी आदीसह समाजबांधव उपस्थित होते.

02 April 2019

जिल्हा परीषद लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अरुण सारंग यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सत्कार




लोहारा प्रतिनिधी -

कळंब येथील जिल्हा परीषद लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अरुण सारंग हे सेवानिवृत्ती झाल्याबद्दल लोहारा येथे सोमवारी ( दि. 1) त्यांचा  सपत्नीक सत्कार करण्यात आला.
               लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अरुण सारंग हे मागील अनेक वर्षांपासून लोहारा येथे कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची कळंब येथे बदली झाली. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सोमवारी कार्यक्रम घेण्यात आला व त्यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंधारण अधिकारी ई. टी. सुर्यवंशी हे होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, छाया सारंग, कनिष्ठ अभियंता संगमकर, एच.जी.गडेराव, पी.एस.कुलकर्णी, एस. व्ही. शिंदे, सी.बी. कदम, नेताजी शिंदे, अमोल कसार, सौरव जगताप, प्रनिता कटकधोंड, सोनाली वाघमारे, दिपक रणखांब आदी उपस्थित होते.