31 October 2019


शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये नुकसान झालेल्या कुटुंबाला बाबा जाफरी सोशल फाउंडेशन च्या वतीने गृहोपयोगी साहित्य देण्यात आले.


प्रतिनिधी / लोहारा

उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे मेहबूब शेख यांच्या घरी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये नुकसान झाले होते. या घटनेची माहिती बाबा जाफरी यांच्यापर्यंत पोहोचली. ते सध्या मक्का मदीना येथे उमराह यात्रेसाठी गेले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांच्या मित्र मंडळींना संपर्क साधून दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला मदत करण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे बाबा जाफरी सोशल फाऊंडेशनचे सदस्य दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला (मेहबूब शेख) भेट देऊन गृहोपयोगी साहित्य देवुन मदत करण्यात आली.
       यावेळी इरफान जहागीदार, असिफ शिलार, अस्लम पटेल, अमीन शेख, दिलीप निंबाळकर, लक्ष्मण आयवळे, अविनाश राठोड, प्रकाश राठोड, असिफ मुल्ला यांच्या सह बाबा जाफरी सोशल फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते.
       बाबा जाफरी यांनी त्यांच्या सोशल फाऊंडेशन च्या माध्यमातून अनेक सॅम7कार्य केली आहेत. तसेच अनेकांना मदत केली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

उमरगा लोहारा तालुक्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा — आमदार ज्ञानराज चौगुले यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी




प्रतिनिधी / लोहारा

उमरगा - लोहारा तालुक्यातील परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेबाबत शासनाकडे तात्काळ अहवाल पाठवावा अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  मागील २० ते २५ दिवसांपासून उमरगा लोहारा तालुका व परिसरात पावसाने कहर केला असून नदी नाले तुडुंब वाहत आहेत. शेतीमध्ये काढणीला आलेले सोयाबीन पीक काढता येत नाही. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात पाण्यात आहे. काही ठिकाणी सोयाबीन पावसामुळे वाहून गेलेले आहे. तसेच काही ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटत आहेत. सोयाबीन, तूर आदी खरीप पिकांची पावसामुळे मोठी हानी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक वाया जाण्याची वेळ आली आहे. तरी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात यावा अशी मागणी आमदार चौगुले यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे केलेली आहे.

18 October 2019

उमरगा - मागील दहा वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आ. चौगुले हॅट्रिक मारणार




प्रतिनिधी / उमरगा

शिवसेना गेल्या पाच वर्षात सत्तेत असूनही सर्वसामान्य जनतेबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी सरकारला सतत धारेवर धरण्याचे काम केले असल्याने मतदार नक्कीच शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशीआहेत. गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमदार ज्ञानराज चौगुले हे यावेळी हँट्रीक मारणार असून त्यांना मोठ्या मताधिकक्याने विजयी करावे असे आवाहन माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी केले.
                 उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील हनुमान चौकात गुरूवारी ( दि. १७) रात्री शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. गायकवाड बोलत होते.या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर पाटील होते. यावेळी उमरगा-लोहारा तालूक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना तालूकाप्रमूख बाबूराव शहपुरे, युवासेनेचे किरण गायकवाड, भाजपचे  माजी उपसभापती दिलिप गौतम, उपतालूका प्रमूख सुधाकर पाटील, शेतकरी सेना उपतालूका प्रमूख बलभिम येवते, विभाग प्रमूख राम जाधव, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास जाधव, माजी पंचायत समिती सदस्य मारूती थोरे, जेष्ठ नागरिक मुरलिधर कारभारी, गुरूवाडीचे सरपंच पप्पू घोडके, कोळसूरचे माजी सरपंच दिलिप जगताप आदिंची प्रमूख उपस्थिती होती.
             यावेळी पूढे बोलताना प्रा. गायकवाड म्हणाले की, गेल्या दहा वर्षापासून आमदार चौगुले यांनी कधीही कोणत्याही जाती-धर्माचा विचार केला नाही. अडचण घेवून आलेल्या प्रत्येकाला न्याय मिळवून दिला आहे. दोन्ही तालुक्याचा सर्वांगिण विकास साधन्यासाठी, शासन दरबारी सतत संघर्ष करून जास्तित जास्त विकास निधी आणला आहे. त्यामूळे विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता चौगूलेंना विजयी करण्याचे आवाहन केले.
              यावेळी बोलताना आमदार चौगूलेंनी जनतेचा सेवक राहणार असून कधीही मालक होणार नसल्याचे वचन दिले. यावेळी श्री गौतम व सुधाकर पाटील यांचीही भाषणे झाली. सभेचे प्रास्ताविक शिवशक्ति साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पंडीत शिंदे यांनी तर सूत्रसंचालन व आभार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी मानले.

17 October 2019

उमरगा - विकासासाठी काम करणाऱ्या आमदार चौगुले यांना तिसऱ्यांदा विजयी करा - किरण गायकवाड





प्रतिनिधी / उमरगा

विकासासाठी काम करणाऱ्या आमदार चौगुले यांना तिसऱ्यांदा विजयी करावे  विजयी करा - किरण गायकवाड

उमरगा- लोहारा विधानसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप महायुती चे उमेदवार आमदार ज्ञानराज चोगुले हे मत मागताना, प्रथम मागील पाच वर्षात केलेली कामे सांगून मते मागत आहेत. शिवसेनेने विकास कामासाठी झटणारे उमेदवार दिले असून इतर उमेदवार यांचेशी तुलना करून आमदार चौगुले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन युवा नेते किरण गायकवाड यांनी केले.
ते आलूर, भुसणी, कदेर आदी ठिकाणी आयोजित सभेत बोलत होते.
                उमरगा लोहारा विधासभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले उपस्थित होते. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, किरण गायकवाड, चंद्रशेखर मुदकना, राजू मिनीयर, विलास व्हटकर, सरपंच अमोल पटवारी, सरपंच सुरेश बोळदे, नागेश पाटील, निसार मदरसे, युवासेना तालुकाप्रमुख अजित चौधरी, गुलाब डोंगरे, शिवा झुरळे, संजय झुरळे, संजय गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
                 कसल्याही प्रकारच्या भुलथापांना बळी न पडता, नागरिकांची सेवा करणाऱ्या आमदार चौगुले यांना तिसऱ्यांदा विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आ. ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ सास्तुर, माकणी येथे सभा संपन्न





प्रतिनिधी / लोहारा

सर्वसामान्य माणसाला आदराची व सन्मानाने वागणुक देणारे, मतदारसंघात सतत सम्पर्क, मागील 10 वर्षे आमदार म्हणून काम करताना कसलाही प्रकारचा आरोप नाही असे ज्ञानराज चौगुले हे चारित्र्य सम्पन्न व्यक्तिमत्त्व असून इतर उमेदवार पेक्षा सरस असल्याने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन शिवसेनेचे नेते जितेंद्र शिंदे यांनी केले.
                 तालुक्यातील माकणी, सास्तुर येथील मंगळवारी ( दि. १५) झालेल्या सभेत शिंदे बोलत होते. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, महायुतीचे उमेदवार आ. ज्ञानराज चौगुले, सुधाकर पाटील, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, आमदार चौगुले हे मतदारसंघात विकास कामे करणारे आहेत. रस्त्याचे जाळे त्यांनी निर्माण केले आहेत तर आमदार निधीचा सुयोग्य वापर करून प्रत्येक गावात निधी दिला आहे. असे एकही गाव नाही की त्यांनी निधी दिला नाही. त्यामुळे या मतदारसंघात केलेल्या कामामुळे त्यांनाच मते मागण्याचा नैतिक अधिकार आहे. तसेच उमरगा आणि लोहारा या दोन्ही तालुक्यात आमदार चोगुले यांनी प्रशासकीय इमारती उभारणे, आरोग्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिली, जलसंधारण मध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढावा यासाठी नाला खोलीकरण केले, पेयजल योजनेतून पिण्यासाठी पाणी पुरवठा करणे, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून दोन्ही तालुक्यातील असंख्य गावे उत्तम रस्ते तयार केले आहेत अशा विविध योजना त्यांनी प्राधान्य देऊन राबवल्या आहेत. त्यामुळे त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार आहे. तर शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारास मते देण्याची नैतिक जबाबदारी मतदारांची आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार आ. चौगुले यांना मोठ्या मताधिकक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. यावेळी सुधाकर पाटील, किरण गायकवाड यांचीही भाषणे झाली.


14 October 2019

सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या आ. चौगुलेंना पुन्हा निवडून द्या - किरण गायकवाड




प्रतिनिधी / लोहारा

उमरगा-लोहारा तालुक्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या व  सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन काम करनाऱ्या आमदार चौगुले यांच्यासारख्या प्रामाणिक उमेदवाराला विजयी करावे असे आवाहन युवासेनेचे किरण गायकवाड यांनी केले.
                उमरगा शहरात रविवारी पतंगे रोड येथे आयोजीत प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले, बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे,  जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, भाजपचे जेष्ठ नेते अनिल धारूरकर, तालुकाध्यक्ष माधवराव पवार, माजी जिल्हा उपप्रमुख बसवराज वरनाळे, बाजार समिती सभापती मोहीयोद्दीन सुलतान, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, जिल्हा परिषद सदस्य दिग्विजय शिंदे, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, विवेक हराळकर , माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार , पोपटराव सोनकांबळे, तालुका प्रमुख बाबूराव शहापुरे , प्रभारी बळीराम सुरवसे , नगरसेवक संतोष सगर , पंढरीनाथ कोणे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष सुभाष सोनकांबळे यांची उपस्थिती होती.
               पुढे बोलताना किरण गायकवाड म्हणाले की, मतदारांनी दबावाला न घाबरता, सर्वांनी परत एकदा सुशिक्षित, स्वच्छ प्रतिमा, असलेले संयमी व्यक्तिमत्व आ. ज्ञानराज चौगुले यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे अशी व्यक्‍त केली. यावेळी संदिप चव्हाण , संदीप चौगुले , योगेश तपसाळे,  शरद पवार, साइनाथ विभुते , बाजार समितीचे उपसभापती रमेश माने , दिलिपसिंह गौतम सरचिटणीस सिद्धेश्वर माने , पंकज मोरे , प्रसिद्धीप्रमुख विठ्ठल चिकुन्द्रे , किरण रामतिर्थे , नगरसेवक आकाश शिंदे, इराप्पा घोडके अमर वरवटे, महादेव सलके यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

13 October 2019

महायुतीचे उमेदवार आ. ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ उमरगा येथे भव्य पदयात्रा संपन्न




महायुतीचे उमेदवार आ. ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ उमरगा शहरात भव्य पदयात्रा संपन्न झाली.


प्रतिनिधी / लोहारा

भाजप, शिवसेना, रिपाई व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ रविवारी ( दि. १३) उमरगा शहरातून   भव्य पदयात्रा काढण्यात आली.
           या पदयात्रेदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड, उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सर्वसामान्य मतदारांच्या भेटी गाठी घेत संवाद साधला. महादेव मंदिरापासून भाजपचे जेष्ठ नेते अनिल धारूरकर यांच्या हस्ते नारळ अर्पण करून पदयात्रेला सुरवात करण्यात आली. महादेव गल्ली, सय्यदबाशा गल्ली, जुनीपेठ, हमीद नगर, कोळीवाडा, बालाजीनगर, बँक कॉलनी, राष्ट्रीय महामार्ग, एकोंडी रोड परिसर, मुंशी प्लॉट, पतंगे रोड, म्हात्रे प्लॉट, शिवपुरी रोड मार्गे निघालेल्या या पदयात्रेचा समारोप पतंगे रोड येथील सचिन कॉर्नर येथे करण्यात आला.
            यावेळी पदयात्रेत शिवसेनेचे जितेंद्र शिंदे, किरण गायकवाड, माजी जिल्हा उपप्रमुख बसवराज वरनाळे, बाजार समिती सभापती सुलतान सेठ, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, विवेक हराळकर, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, तालुका प्रमुख बाबूराव शहापुरे, प्रभारी बळी सुरवसे, नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोने, संदिप चव्हाण, संदीप चौगुले, योगेश तपसाळे, शरद पवार, साई विभुते, भाजपचे जिल्हा बँकेचे व्हाइस चेअरमन कैलास शिंदे, तालुक्याध्यक्ष माधवराव पवार, कृ उ बा स उपसभापती रमेश माने, जिल्हा परिषद सदस्य दिग्विजय शिंदे, दिलिपसिंह गौतम, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, सरचिटणीस सिद्धेश्वर माने, पंकज मोरे, प्रसिद्धीप्रमुख विठ्ठल चिकुन्द्रे, किरण रामतिर्थे, नगरसेवक आकाश शिंदे, इराप्पा घोडके, अमर वरवटे, महादेव सलके, रिपाइंचे सुभाष सोनकांबळे आदींसह शिवसेना, युवासेना, भाजप, रिपाई व महायुतीच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोहारा येथे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन


लोहारा येथे आ. चौगुले यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना भाजप तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, आ. चौगुले व शिवसेना भाजप कार्यकर्ते


प्रतिनिधी / लोहारा

उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजपा महायुतीचे उमेदवार आ. ज्ञानराज चौगुले यांच्या लोहारा येथील संपर्क कार्यालयाचे  उदघाटन भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी यांच्या हस्ते शनिवारी (दि.१२) करण्यात आले.
                 आ. ज्ञानराज चौगुले यांच्या लोहारा येथील संपर्क कार्यालयाचे  उदघाटन भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, नगरसेवक अभिमान खराडे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस नेताजी शिंदे, भाजपा शहराध्यक्ष अशोक तिगाडे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, भाजपाचे कार्यकर्ते शब्बीर गवंडी, आयुब हबीब शेख, दादा मुल्ला, भाजपा ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, नगरसेवक शाम नारायणकर, सलीम शेख, नगरसेवक अतिक पठाण, कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक हाजी बाबा शेख, प्रशांत काळे, नामदेव लोभे, शंकर मुळे, प्रमोद पोतदार, शिवसेना कक्ष प्रमुख कुर्बान खुटेपड, रघुवीर घोडके, इन्नुस पटेल, संजय दरेकर, काका घोडके, सुकाजी सातपुते यांच्या शिवसेना, भाजपा, यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
             

लोहारा शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटवणार - रमाकांत गायकवाड




प्रतिनिधी / लोहारा

मतदारांनी उमरगा-लोहारा विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यास डबघाईला आलेल्या उमरगा येथील एमआयडीसीला उर्जित अवस्थेत आणण्याबरोबरच लोहारा शहराचा कायमस्वरुपी पाणी प्रश्न मिटविणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमाकांत गायकवाड यांनी पत्रकार परीषदेत व्यक्त केले.
       यावेळी बोलताना रमाकांत गायकवाड म्हणाले की, लोहारा-उमरगा तालुक्यात बेरोजगार तरुणांची संख्या लक्षणिय आहे. त्यांच्या हाताला काम नसल्याने तरुणवर्ग मुंबई, पुणे या सारख्या शहरात मोठ्याप्रमाण स्थलांतरीत होत आहेत. तालुक्यातील प्रस्थापित नेते मात्र या तरुणांचा वापर केवळ निवडणूक प्रचारासाठी करून घेतात. सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम त्यांच्याच गावात उपलब्ध करुन देण्याच्या इराद्याने निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे केजी टू पीजी पर्यंतचे शिक्षण मोफत करुन गुणात्मक शिक्षण देण्यास प्राधान्य देणार आहे. दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तीन खेडी व पाच खेडी पाणीपुरवठा योजना राबविण्यास प्राधान्य देणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तसेच ही माझी पहीली व शेवटची निवडणूक राहणार आहे. मी यापुढे कुठलीही निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अमोल माटे, अतुल कांबळे, मधुकर वाघमारे, तात्याराव कांबळे, मोहन वाघमारे, सचिन रोडगे आदी उपस्थित होते.

11 October 2019

निवडणूक निरीक्षक ( सामान्य) यांच्या उपस्थितीत उमरगा येथे दुसरी सरमिसळ प्रक्रिया संपन्न




प्रतिनिधी / लोहारा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने 240 उमरगा (अ. जा.) विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी उस्मानाबाद यांचेकडून पहिल्या सरमिसळ नंतर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट 2 ऑक्टोंबर 2019 रोजी प्राप्त झाले होते. सदर मतदान यंत्रांची 2 री सरमिसळ प्रक्रिया निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांच्या उपस्थितीत दिनांक 10 ऑक्टोंबर 2019 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय उमरगा येथे पार पडली.
                        या प्रक्रियेमध्ये 240  उमरगा (अ. जा) विधानसभा मतदारसंघासाठी प्राप्त झालेल्या कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट यांची 2 री सरमिसळ ऑनलाईन सॉफ्टवेअर मधून 240 उमरगा (अ.जा) विधानसभा मतदार संघातील 315 मतदान केंद्रासाठी सरमिसळ करण्यात आली. सदर सरमिसळ बाबत निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी सर्व विषयाची माहिती उपस्थित उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना दिली. दुसरी सरमिसळ प्रक्रिया निवडणूक निरिक्षक (सामान्य) जितेन्द्र कुमार उपाध्याय, निवडणुक निर्णय अधिकारी श्री विठ्ठल उदमले, निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी श्री जगताप , नायब तहसीलदार रोहन काळे  व इतर अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत पार पडली. या प्रक्रियेवेळी निवडणूक लढविणारे उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
               निवडणूक निरिक्षक (सामान्य )यांना दूरध्वनीवर मौजे जकेकुर येथील मतदान केंद्र क्रमांक 188, 189 मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी मतदानादिवशी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्याचे तसेच मतदारांना पुरेशी सावली व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने माननीय निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांनी मौजे जकेकुर, तालुका उमरगा येथील दोन्ही मतदान केंद्रांना भेटी देऊन संबंधित अधिकाऱ्यांना तेथे मतदारांना व्यवस्थित मतदान करता यावे यासाठी आवश्यक  सोयीसुविधा व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याविषयी निर्देश दिले. तसेच निवडणूक निरीक्षक (सामान्य) मौजे दाळिंब येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे असणाऱ्या पाच मतदान केंद्रांना भेटी देऊन सदरचे पाच मतदान केंद्रे एकाच शाळेच्या परिसरात असल्याने मतदानादिवशी मतदारांची गैरसोय होणार नाही याविषयी दक्षता घेण्याचे निर्देश निवडणूक विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

महायुतीचे उमेदवार आ. ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचाराचा तुरोरी येथे शुभारंभ




प्रतिनिधी - लोहारा

उमरगा -लोहारा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या तुरोरी जिल्हा परिषद गटातील प्रचाराचा शुभारंभ  गुरूवारी (दि. 10)  ग्रामदैवत संतश्रेष्ठ तुकाराम मंदिरात उमरगा पंचायत समितीचे उपसभापती युवराज जाधव यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून करण्यात आला.
             महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शहरातील सर्वच मंदिरासह छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसही अभिवादन करण्यात आले. शहरातील प्रमूख मार्गावरून व मुख्य बाजार पेठेतून 'धनूष्यबाणाला' मतदान करण्याचे आवाहन करत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत उपसभापती श्री. जाधव यांच्यासह सरपंच ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना विभाग प्रमूख राम जाधव, शिवशक्ति साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष पंडीत शिंदे, माजी पंचायत समिती माजी सदस्य मारूती थोरे, शाखा प्रमूख विजयकुमार भोसले, तंटामूक्त समितीचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास जाधव, युवासेनेचे तालूका उपाध्यक्ष विशाल जाधव, माजी उपसरपंच पवन जाधव, जेष्ठ शिवसैनिक अंगदबापू साळूंके, ज्ञानेश्वर माने, अतुल पवार, धनराज सुर्यवंशी, नामदेव राठोड यांच्यासह शिवसैनिक व मित्रपक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.