17 September 2020
लोहारा येथे मराठा आरक्षणाबाबत संभाजी ब्रिगेडचे निवेदन
प्रतिनिधी / लोहारा
पंतप्रधानांनी लोकसभा व राज्यसभेत मराठा आरक्षणाचा ठराव पास करून हा विषय मार्गी लावावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. लोहारा तहसीलदार विजय अवधाने यांनी हे निवेदन स्वीकारले.
मराठा आरक्षणासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पंतप्रधानांना तहसिलदार यांच्या मार्फत सोमवारी ( दि. १४) निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाच्या आरक्षण बाबत मा. सवौच्च न्यायालयाने दि. ९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने समाजाला दिलेल्या आरक्षणास स्थगिती देऊन मराठा आरक्षणाचा विषय स्वतंत्र घटना पिठाकडे वर्ग करण्याबाबत निर्दशीत केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संपूर्ण देशात विशेषताः महाराष्ट्रातील मराठा समाजास जबर फटका बसलेला आहे. मराठा समाज व्यथीत झालेला आहे. आम्ही घटनात्मक आरक्षणास पूर्णत पात्र आसताना देखील मराठा समाज आरक्षण लाभापासून कायम वंचित राहिलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून आपण समजून घ्याव्यात व मराठा आरक्षणाचा विषय लोकसभा व राज्यसभेत बहुमतांनी ठराव पास करून हा विषय मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाचा सरसगट ओबीसी मध्ये समावेश करावा, अंतिम निर्णय होईपर्यंत सध्या झालेली नोकरभरती, महाविद्यालयातील प्रवेश कायम ठेवावेत, घटना पिठाचा अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही स्वरूपाची शासकीय नौकर भरती करण्यात येउ नये, महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढावा आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास घटनात्मक मार्गाने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी असा ईशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर शरद पवार, धनराज बिराजदार, महादेव मगर, आण्णासाहेब पवार, शामसुंदर पाटील, बालाजी यादव, सुमित कोटमाळे, विशाल भोजराव, महेश भोजराव, सतिश जगदाळे, रवींद्र जाधव, विठ्ठल औरादे, अंगद मुळे, खंडू जांभळे, लक्ष्मण दावेकर, संतोष जांभळे, महादेव पवार, शरद मुळे आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
14 September 2020
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (स) येथे कृषी सहाय्यक दिपक जाधव यांच्या बदलीनिमित्त निरोप समारंभ संपन्न
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (स) येथे कृषी सहाय्यक पदावर कार्यरत असलेले दिपक जाधव यांची सास्तुर येथे बदली झाली आहे. शनिवारी ( दि. १२) हिप्परगा ( स) येथे ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून निरोप दिला.
दिपक जाधव हे मागील ९ वर्षांपासून हिप्परगा (स), करवंजी येथे कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांची सास्तुर येथे बदली झाली. जाधव यांनी मागील ९ वर्षात केलेल्या उत्कृष्ठ सेवेबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी ( दि.१२) त्यांना निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच नागनाथ पाटील, पोलीस पाटील संतोष यादव, सोसायटीचे चेअरमन श्रीशैल्य ओवांडे, चांद कारभारी, ग्राम रोजगार सेवक लक्ष्मण मोरे, आदिनाथ भोजराव, दयानंद ओवांडे, मंगलताई सुरवसे, करवंजीचे सरपंच तानाजी हाक्के, भरत मुगळे, सोमनाथ भोंडवे, अनिल ओवांडे यांच्यासह हिप्परगा (स), करवंजी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी दिपक जाधव यांनी मागील ९ वर्षांत केलेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.
10 September 2020
“विकेल ते पिकेल” या धोरणावर मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद
मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब विविध कृषि विषयक योजनांच्या संदर्भात दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी दु. 12 ते 1.30 वा. शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषि मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषि आयुक्त धीरज कुमार उपस्थित राहणार आहेत. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती कृषि मंत्री, दादाजी भुसे यांनी केली आहे.
कृषि, महसूल व ग्रामविकास विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी ग्रामपातळीवर स्थानिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. सदर कार्यक्रमाचे कृषि विभागाच्या यु-ट्युब चॅनेल (http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM) वर लाईव्ह प्रसारण करण्यात येईल.
“विकेल ते पिकेल” अंतर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिर्वतन अभियानाची (SMART) सुरुवात करण्यात येईल. या प्रसंगी मा. मुख्यमंत्री ग्रामपातळीवरील कृषि विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून “चिंतामुक्त” शेतकरी व “शेतकरी केंद्रित” कृषि विकास यावर आपले विचार मांडतील व शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
यु-ट्युब चॅनेल लिंक
http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM
उमरगा, लोहारा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उमरगा लोहारा विधानसभा सदस्य आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.
“विकेल ते पिकेल” या धोरणावर मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद
मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे विविध कृषि विषयक योजनांच्या संदर्भात दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी दु. 12 ते 1.30 वा. शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषि मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषि आयुक्त धीरज कुमार उपस्थित राहणार आहेत. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती कृषि मंत्री, दादाजी भुसे यांनी केली आहे.
कृषि, महसूल व ग्रामविकास विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी ग्रामपातळीवर स्थानिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. सदर कार्यक्रमाचे कृषि विभागाच्या यु-ट्युब चॅनेल (http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM) वर लाईव्ह प्रसारण करण्यात येईल.
“विकेल ते पिकेल” अंतर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिर्वतन अभियानाची (SMART) सुरुवात करण्यात येईल. या प्रसंगी मा. मुख्यमंत्री ग्रामपातळीवरील कृषि विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून “चिंतामुक्त” शेतकरी व “शेतकरी केंद्रित” कृषि विकास यावर आपले विचार मांडतील व शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
यु-ट्युब चॅनेल लिंक
http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM
तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी केले आहे.
09 September 2020
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी घेतली जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट - जिल्ह्यातील विविध विषयांवर झाली चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची बुधवारी (दि. ९) भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने सध्याच्या कोविड १९ ची उद्भवलेली गंभीर परिस्थिती, दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी, सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वेमार्गाचे जास्तीत जास्त काम रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात यावे, उस्मानाबाद येथे होत असलेले वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ होणेबाबत, जिल्हा बँक आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.
याबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढाकार घेऊन हे प्रश्न मार्गी लावावेत अशी विनंती करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, उस्मानाबाद चे माजी नगराध्यक्ष संपतराव डोके, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, उस्मानाबाद शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे उपस्थित होते.
07 September 2020
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या ऊस पिकाची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली पाहणी
प्रतिनिधी / उमरगा
उमरगा तालुक्यातील येणेगुर व बलसुर परिसरात रविवारी ( दि. ६) रात्री झालेल्या वादळी पावसामुळे ऊस पिकाचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. सोमवारी ( दि. ७) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी या नुकसानीची पाहणी केली.
उमरगा तालुक्यातील येणेगुर व बलसुर परिसरात रविवारी (दि.६) मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने ऊस पिकाचे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उंच वाढलेल्या ऊस पिकासाठी अनेक ठिकाणी हा पाऊस हानिकारक ठरला आहे. या झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली. यावेळी येणेगुर येथील शेतकरी काशिनाथ व्हनाळे, विठ्ठल व्हनाळे, राजू माळी, उमेश पाटील, छानूमिया जवळगे, गुंडाप्पा व्हनाळे, उमेश दामशेट्टी आदींसह भीमा स्वामी, आयुब जवळगे, वैभव बिराजदार, नेताजी कवठे आदींची उपस्थिती होती.
05 September 2020
एकता फाऊंडेशन उस्मानाबादचे शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी / उस्मानाबाद
समाजातील भावी पिढीवर संस्कार घडवण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात आजवर अनेक सुजान नागरिक समाजाला देण्याचे काम शिक्षकाच्या माध्यमातुन झालेले आहे. त्यामागे शिक्षकांचे योगदान निश्चित प्रशंसनीय आहे हीच बाब ओळखुन शिक्षण क्षेञात निरपेक्ष वृत्तीने समर्पित भावनेतुन कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव व्हावा या हेतुने शिक्षकांचा सुसंस्कारीत पिढी घडवण्याचा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरु राहावा व त्यांच्या या प्रयत्नास बळ मिळावे या उद्देशाने एकता फाऊंडेशन उस्मानाबाद च्या वतीने दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार चे आयोजन करण्यात येते. पुरस्काराचे यावर्षी चे चौथे वर्ष आहे.
1) श्री. विक्रम माणिकराव पाटील जिल्हा परिषद कन्या प्रा. शाळा बेंबळी ता.उस्मानाबाद 2) श्री. संतोष काकासाहेब घार्गे श्रीपतराव भोसले माध्य व उच्च माध्य विद्यालय उस्मानाबाद ता. उस्मानाबाद 3) श्री. धनंजय सदाशिव डोळस छञपती संभाजी विद्यालय जवळा ता. कळंब 4) श्री. प्रदीपकुमार अरुण गोरे नुतन प्राथमिक विद्यामंदीर उस्मानाबाद ता. उस्मानाबाद 5) श्री. भालचंद्र भारत कोकाटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवाजीनगर ता. उस्मानाबाद 6) सुशिलकुमार सुधाकर तीर्थकर विद्याभवन हायस्कुल कळंब ता. कळंब 7) श्री. श्रीमंत नारायण लगस जिल्हा परिषद शाळा वाडीबामणी ता. उस्मानाबाद. 8) श्री. सुधीर विश्वनाथ लोमटे जिल्हा परिषद प्रा. शाळा जवळा ता कळंब 9) श्रीमती.प्रणिता हरिश्चंद्र भंडारे छञपती शिवाजी माध्य व उच्च माध्य विद्यालय उस्मानाबाद ता. उस्मानाबाद 10) श्रीमती. सुनीता शंकरराव शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौडगाव ता. उस्मानाबाद 11) श्री. संजय प्रभाकर देशमुख जिल्हा परिषद शाळा पळसवाडी ता. उस्मानाबाद 12) श्री. ज्ञानेश्वर गुरलिंगआप्पा माशाळकरभारत विद्यालय बेडगा ता. उमरगा 13) श्री. लक्ष्मण संभाजी शेळके न्यु हायस्कुल चिंचोली ता. भुम 14) श्री. अर्जुन चिंतामण जाधव जिल्हा परिषद कन्या शाळा कळंब ता. कळंब 15) श्रीमती. ज्योती दिलीप पाटील केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा ता. लोहारा 16) श्री. संघपाल पंडीत सुकाळे जिल्हा परिषद शाळा झिन्नर ता. वाशी 17) श्री. अनिल आभिमान शिंदे जिल्हा परिषद प्रा.शाळा हिंगणगाव ता. कळंब 18) श्री. तुकाराम विष्णु वाडकर जिल्हा परिषद प्रा. शाळा सांगवी काटी ता. तुळजापुर 19) श्री. श्रीमंत संदीपान चौरे जिल्हा परिषद प्रा. शाळा पाचपिंपळा ता परंडा 20) श्री. विठ्ठल उत्तम नरवडे जिल्हा परिषद प्रा. शाळा पिंपळा बुद्रक ता. तुळजापुर या शिक्षकांना यावर्षी चा आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला असुन कोरोना महामारीचे संकट कमी झाल्यानंतर विविध क्षेञातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा यथोचित गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संस्था सचिव आभिलाष लोमटे यांनी दिली आहे.
सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अमित कदम, विशाल थोरात, अतुल जगताप, प्रसाद देशमुख आदीनी आभिनंदन केले.
04 September 2020
कडदोरा येथील शेतकरी पिता पुत्राच्या खुनाचा गुन्हा महावितरण व कंत्राटदारावर दाखल करा - जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार
प्रतिनिधी / उमरगा
उमरगा तालुक्यातील कडदोरा येथील शेतकरी पिता पुत्राचा महावितरण कंपनीच्या दिरंगाईमुळे विजेच्या धक्याने मृत्यु झाला. या प्रकरणी विद्युत वितरण कंपनी व दोषी अधिकाऱ्यांवर तसेच कंत्राटदारावर खुनाचा गुन्हा दाखल करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार संजय पवार यांना शुक्रवारी ( दि. ४) दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हणले आहे की, कडदोरा येथील शेतकरी काशिनाथ बाबूजी रनखांब व भीमसेन काशिनाथ रनखांब या पिता पुत्रांनी महावितरण कंपनीकडे ३१ जानेवारी २०१७ रोजी पत्नी श्रीमती विजयाबाई काशिनाथ रनखांब यांच्या नावे वीज जोडणी प्रस्ताव दाखल करून रीतसर शुल्क भरणा केला होता. महावितरण कंपनीच्या तीन वर्षांच्या अक्षम्य दिरंगाईमुळे व टोलवाटोलवी मुळे सदरील शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे पिके जगविण्यासाठी हतबल होऊन स्वतःच वीज वायर जोडत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. महावितरण कंपनीच्या अक्षम्य दिरंगाईमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या महावितरण कंपनी, संबंधीत जबाबदार दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर मयत शेतकरी कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी. सदरील मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानिस महावितरण व प्रशासन जबाबदारी राहील असा ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष संजय पवार, जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन राम जाधव, विधानसभा कार्याध्यक्ष अमोल पाटील, तुकाराम रणखांब, बालाजी रणखांब, प्रदीप बालकुंदे, सरपंच शमशोद्दीन जमादार, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक नेताजी कवठे, प्रताप जाधव, सुभाष गायकवाड, मोहन गायकवाड आदींच्या सह्या आहेत.
01 September 2020
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट
उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध प्रलंबित विषयाच्या अनुषंगाने केली चर्चा
खासदार सुप्रियाताई सुळे यांचीही घेतली भेट
उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तेरणा साखर कारखाना यासह काही प्रलंबित विषयावर चर्चा करण्यासाठी सोमवारी ( दि ३१) उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. प्रामुख्याने जिल्हयातील रेल्वे प्रश्नावर देखील चर्चा केली. तुळजाभवानी देवस्थान रेल्वे नकाशावर यावे याकरिता सोलापूर ते उस्मानाबाद या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली असून २०१९च्या अर्थसंकल्पात १कोटी रुपयांची तरतूद केली होती परंतु सर्वेक्षणाच्या पुढे काहिच झालेले दिसत नाही. ही बाब साहेबांच्या निदर्शनास आणून दिली व आज संपूर्ण देशात कोराना साथीच्या रोगामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला आहे. ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या कामाचा जास्तीत जास्त भाग राज्य सरकारने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्याची तयारी दर्शवली तर उस्मानाबाद जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचा विकास प्रकल्प मार्गी लागु शकतो. यापुर्वी राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील रेल्वे मार्गासाठी अशा स्वरूपाचे योगदान दिले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गावरील जास्तीत जास्त काम रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यासाठी मान्यता देण्यासाठी राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील रेल्वेसाठी जे सहकार्य केले त्या धर्तीवर प्रस्ताव सादर करण्यासाठी राज्य सरकारला विनंतीपुर्वक सुचीत करावे अशी विनंती केली. तसेच तेरणा कारखान्याच्या बाबतीत देखील शेतकरी आणि कामगार आडचणीत असुन भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने सामंजस्य दाखवल्यास तेरणा कारखाना पुढील हंगामात सुरु होऊ शकतो. ज्यामुळे शेतकरी, कामगार आणि जिल्हा बँकेला खुप मदत होऊ शकेल अशी चर्चा केली चर्चेअंती पवार साहेबांनी यामध्ये न्यायालयीन अडचण येणार नसेल तर नक्की तोडगा काढता येईल असे आश्वासन दिले. रेल्वे प्रश्नाबाबत राज्य सरकारला किती आणि कशा स्वरुपात सहभाग नोंदवता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांशी स्वतः चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकहिताचे प्रलंबित प्रश्न पवार साहेबांच्या पुढाकारातून मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. या चर्चेवेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या समवेत अॅड प्रविण यादव उपस्थित होते.
तेरणा कारखाना विषयावर सुप्रिया ताई सुळे यांच्यासोबत देखील चर्चा झाली. यावेळी निवेदन ही देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, अॅड प्रविण यादव, प्रशांत कवडे, सचिन तावडे, शंतनू खंदारे, तौफीक पटेल हे उपस्थित होते.
31 August 2020
मराठा सेवा संघाच्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा- शिवश्री विठ्ठल सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड लोहारा
जय जिजाऊ
१ सप्टेंबर १९९०
मराठा सेवा संघ वर्धापनदिन
बहुजन समाजातील महापुरुषांच्या विचारावर आधारित असणाऱ्या मराठा सेवा संघाची स्थापना आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केली.आज मराठा सेवा संघाला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. बहुजन समाजातील पोरांच मस्तक सशक्त करण्याचं काम अखंड व अविरतपणे सुरू ठेवण्याचं काम आज मराठा सेवा संघ करत आहे.आज बहुजन समाजातील पोर लेखणी घेऊन क्रांतीच वार निर्माण करत आहेत.कित्येक बहुजन पोर लिहायला शिकली बोलायली शिकली,स्वतःवर होणाऱ्या सांस्कृतिक व धार्मिक अन्याला वाचा फोडायला शिकली,इतिहासात महापुरुषांच्या चरित्राचा झालेल विद्रुपीकरण खऱ्या अर्थाने बाहेर काढून बहुजन समाजाला सत्य इतिहास जर कुणामुळे समजला असेल तर तो फक्त आणि फक्त मराठा सेवा संघामुळे.आजही शत्रूच्या गोटात मराठा सेवा संघाचं नाव घेतलं तर त्यांना घाम फुटतो. आज मराठा सेवा संघाचा वटवृक्ष झाला आहे या सगळ्याच श्रेय खेडेकर साहेब या 30 वर्षाच्या तुमच्या त्यागात,प्रयत्नांत, सत्यात आहे.साहेब तुम्ही आम्हाला जी चळवळ रुपी शिदोरी दिली आहे ती घेऊन आम्ही तुम्हला अभिप्रेत असणारी क्रांती नक्की घडवू.
होता मराठा सेवा संघ
म्हणुन कळले जीवनाचे रंग
मराठा सेवा संघ
वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
👏💐
शिवश्री विठ्ठल सूर्यवंशी
तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड लोहारा
माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
भारतीय राजकारणाचे भीष्म पितामह म्हणून त्यांचा लौकिक राहीला. त्यांनी अर्थमंत्री पदापासून विविध स्तरांवर भारतीय राजकारण, समाजकारण आदींबाबत दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. 💐💐🙏🙏
मराठा सेवा संघ वर्धापन दिनाच्या सदिच्छा - शिवश्री मोहन जाधव
•|| वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद ||•
✒लेखणी परिवर्तनाची💪🏽
#१_सप्टेंबर_१९९०_ते_२०२०...,
#मराठा_सेवा_संघ_वर्धापनदिन...!!
मराठा समाजाच्या सामाजिक जाणिवा अधिक बळकट करुन वैचारिक क्षेत्रात प्रचंड मोठ्या कामाचा डोंगर उभ्या करणाऱ्या मराठा सेवा संघाचा आज वर्धापनदिन होय. गेल्या २९ वर्षांमध्ये मराठा सेवा संघाने समाजाला काय दिले हा प्रश्न विचारायची आज कोणत्याही सुज्ञ मराठा बांधवाला गरज पडत नाही, हे या संस्थेचे यश आहे. माजलेल्या काटेरी झुडुपांच्या भुमीची मशागत करुन तिला विचारांचं भरघोस पीक मिळावण्याईतपत सुपीक बनविण्याचे अवघड कार्य मराठा सेवा संघाने करुन दाखविले आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांना ३३ प्रकारात विभागुन त्या प्रत्येक प्रश्नासाठी एक कक्ष उभा करणे आणि तो चालवणे ही सोपी गोष्ट नाही. समाजातुन वेळ, बुद्धी, कौशल्य, श्रम व पैसा हे पंचदान गोळा करुन समाजाला धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, शिक्षणसत्ता व प्रचार-प्रसार माध्यमसत्ता या पंचसत्ता हस्तगत करण्याची दिशा देणाचे कार्य ही संस्था मा.पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.
समाजातील वाईट विचारांचे, अनिष्ट चालीरितींचे तसेच व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी करुन त्याच समाजाला वाचण्याचे, लिहिण्याचे, बोलण्याचे आणि विचार करण्याचे विधायक व्यसन लावण्याचे काम या संस्थेने केले आहे. सामाजिक क्षेत्रात कामाचा डोंगर उभा करताना मात्र आपल्या कामाची नोंद ठेवण्यात ही संस्था कमी पडली अशी अनेक सहकाऱ्यांची भावना आहे. मागच्या ३० वर्षांचा आढावा घेतला तर महाराष्ट्राच्या प्रगतीच्या आलेखावर मराठा सेवा संघाच्या योगदानाचा बिंदु नजरेत भरेल अशा पातळीवरच दिसेल याबद्दल काही शंका नाही. अशा संस्थेशी जोडलं जाणं हा आमच्यासारख्या असंख्य तरुणांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा होता. कमी वयातच सामाजिक भान आणि कामाचा नेमकेपणा याचे धडे आम्हाला इथे मिळाले. पुढचा प्रवास करत असताना मराठा सेवा संघाने दीर्घकाळ परिणामकारक ठरणारी रचनात्मक कामं हातात घ्यावीत, अशी समाजातुन अपेक्षा व्यक्त होत आहे. मराठा समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करणाऱ्या मराठा सेवा संघाच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व सहकाऱ्यांना स्नेहपुर्वक सदिच्छा...!!
•|| शिवेच्छुक ||•
*- शिवश्री मोहन जाधव {जिल्हाध्यक्ष}*
*वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, उस्मानाबाद.*
30 August 2020
डॉ. रोहित विष्णू साळुंके यांची पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या केरळ प्रदेशाध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी / उस्मानाबाद
लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील रहिवासी असलेले व केरळ राज्यातील बालूसेरी येथील संस्कृत विद्यापीठात प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले डॉ. रोहित विष्णू साळुंके यांची पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या केरळ प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल साळुंके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
डॉ. रोहित विष्णू साळुंके हे लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांनी एम. ए. पूर्ण केले असून संस्कृत विषयात पीएचडी मिळवली आहे. सध्या ते कलिकट संस्कृत विद्यापीठ बालीसेरी येथे संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मराठा सेवा संघ प्रणित डाॅ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या केरळ राज्य प्रदेशाध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव दळवी व मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी साळुंके यांना नियुक्तीपत्र दिले आहे. डॉ. रोहित विष्णू साळुंके यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
24 August 2020
पीक कर्जबाबत तालुक्यातील बँकांची बैठक आयोजित करून कर्जवाटपाचा आढावा घ्यावा - लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी / लोहारा
पीक कर्जबाबत तालुक्यातील बँकांची बैठक आयोजित करून कर्जवाटपाचा आढावा घ्यावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्याकडे सोमवारी ( दि. २४) निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हणले आहे की, यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात खरिपाची पेरणी केली. परंतु अनेकांची बियाणे उगवले नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यात तालुक्यातील बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. एकीकडे शेतकरी अडचणीत असताना बँकेने शेतकऱ्यांना पीककर्ज देऊन सहकार्य करणे आवश्यक असताना काही बँकेमार्फत टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पीक कर्जाची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व बँकांची तातडीने बैठक घेऊन पिककर्जाची सद्यस्थिती काय आहे, किती टक्के वाटप झाले, पीककर्ज वाटप करण्यास टाळाटाळ का होत आहे याबाबत विचारणा व्हावी. तसेच पुढील ५ - ६ दिवसांत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जवाटप करावे अशा सूचना द्याव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सहाय्यक प्रशासन अधिकारी पी. एस. चौगुले यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनावर तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजयकुमार लोमटे, महेबूब फकीर, व्यंकट समदळे, संजय गायकवाड, मनोज देशपांडे, विठ्ठल माने आदींच्या सह्या आहेत.
22 August 2020
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार व तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
प्रतिनिधी / लोहारा
कोरोनाच्या काळात ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फळे नागरिकांना मोफत दिली अशा तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरुवारी ( दि. २०) कोविड शेतकरी योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
तालुक्यातील सालेगाव येथे गुरुवारी ( दि. २०) हा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सरपंच नारायण गुरव, युवक जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी, सचिन कदम, गोविंद साळुंके, गोविंद बिराजदार, उपसरपंच मुरलीधर पाटील, आबासाहेब साळुंके, प्रकाश भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना काळात आपल्या शेतातील फळे नागरिकांना मोफत दिलेले सास्तुर येथील दत्तात्रय सुतार, जेवळी येथील मल्लिनाथ कारभारी, कानेगाव रघुनाथ कदम या तीन शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते कोविड शेतकरी योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विलास देशपांडे, साहेबराव साळुंके, संजय जाधव, योगेश बिराजदार, गोपाळ माने, मनोज देशपांडे, विशाल बडूरे, महादेव रवळे, गोविंद देशपांडे, बाळू यादव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पप्पू गोरे यांनी तर गोविंद साळुंके यांनी आभार मानले.
कोविड काळात गावपातळीवर चांगल्या प्रकारे काम करत असल्याबद्दल लोहारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, राजेंद्र कदम, मिलिंद नागवंशी, हेमंत माळवदकर, नवाज सय्यद, नगरसेवक गगन माळवदकर, आयुब शेख, शब्बीर गवंडी, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, प्रकाश भगत, पृथ्वीराज जगताप, महेबूब फकीर, विठ्ठल बुरटूकणे, राहुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
काही दिवसांपूर्वी लोहारा शहरातील आमीनाबी मकबूल बागवान या महिलेने प्रसंगावधान दाखवत दोन लहान चिमुकल्यांचा जीव वाचवला होता. त्याबद्दल या महिलेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने साडी चोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कोविड केअर सेंटर मधील सफाई कामगारांचाही सत्कार करण्यात आला.
19 August 2020
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त करजखेडा येथे वृक्षारोपण
प्रतिनिधी / लोहारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त करजखेडा गावात वृक्षारोपण करण्यात आले. पारंपरिक केक वगैरे या गोष्टींना टाळून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वृक्षलागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, जगदिश पाटील, प्रकाश भगत, लोहारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, सचिन रणखांब, करजखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा बनकर, उपसरपंच सुभाष कळसुले, तंटामुक्ती अध्यक्ष रवी आदटराव, बाळासाहेब कांबळे, धोंडिराम आदटराव, भागवत भंडारकर, बाळासाहेब चव्हाण, गणेश आदटराव, विनोद चव्हाण, आमित कांबळे उपस्थित होते.
18 August 2020
गणेशोत्सव, कोरोना उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
प्रतिनिधी / मुंबई
गणेशोत्सव, कोरोना उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा
समाजप्रबोधन करण्याचे गणेश मंडळांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई, दि. १८:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करतानाच कोरोना युद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो तर काही ठिकाणी जात आहोत. त्यामुळे गाफील न राहाता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत त्या यापुढेही नेटाने राबवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई येथे आढावा बैठकीत दिले.
गणेशोत्सव, राज्यातील कोरोना उपाययोजना यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, राज्य टास्क फोर्सचे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय कोरोना उपाययोजना आणि मृत्यूदर यासंदर्भात आढावा घेतला.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केले आहे. याप्रमाणेच आता येऊ घातलेला गणेशोत्सव आणि मोहरम हे सण गर्दी न करता साजरे करावेत. गणेशोत्सवासंदर्भात गृहविभागाने मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यातील तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणपतीची मूर्ती ४ फुटांची तर घरगुती गणेश मुर्ती २ फुटांची असावी असे या मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद केले आहे. त्याचे पालन करतानाच आगमन आणि विसर्जन मिरवणूका निघणार नाहीत, गणेशोत्सवात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक असून गृह विभागाचे परिपत्रक सर्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळावी
या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, जिथे शक्य नाही तिथे मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव निर्माण करावेत व तेथेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन विसर्जनाची व्यवस्था करण्यात यावी. महापालिका यंत्रणेकडे गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
गणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश द्यावा. कोरोना आणि एकंदरीतच आरोग्य विषयक जनजागृती मोहिम होती घेण्याचे आवाहन करतानाच दर्शनासाठी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास सोयीचे होईल. उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था चोख राहील याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात लोक गेले असून तिथे अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मृत्यूदर रोखण्यासाठी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या
कोरोनाबाबत आढावा घेतल्यानंतर सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले, काही ठिकाणी परिस्थिती आटोक्यात तर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात राहील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मृत्यूदर रोखण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्यात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत तेथे अतिदक्षता विभागातील (आयसीयू) बेड आणि ऑक्सीजनची व्यवस्था असलेले बेड वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
चाचण्यांचे प्रमाण वाढवावे
कोरोना उपचारासाठी जम्बो सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगत पावसाळी आजार डोके वर काढतात त्याकडे लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, चाचण्यांचे दर नियंत्रित राहतील याकडे लक्ष द्यावे,चाचणी रिपोर्ट लवकर येईल यासाठी प्रयत्न करावेत. कोरोनातून बरे होऊन घरी गेल्यानंतर रुग्णांना पुन्हा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे पोस्ट कोविड परिस्थितीकडे, रुग्णांकडे लक्ष देण्याची अधिक गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती मोहिम
स्वयंशिस्त, मास्क वापरणे, हात धुणे, स्वच्छता राखणे यासारखे उपायच कोरोनावर सध्याचे औषध असल्याचे सांगतानाच आज ८० टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत. पण ते संक्रमण करू शकतात. त्यांच्या माध्यमातून होणारा प्रसार गंभीर बाब असल्याने अशा रुग्णांचे विलगीकरण करणे, त्यांना क्वारंटाईन करणे आवश्यक असून या रुग्णांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती मोहिम घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाच्या विषाणुला जोपर्यंत हरवत नाही तोपर्यंत अहोरात्र अविश्रांत मेहनत सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी यंत्रणेला केले.
कायमस्वरूपीच्या सुविधांसाठी रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करावे -
उप मुख्यमंत्री अजित पवार
गणेशोत्सवासाठीचे मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक राज्यात सर्वांसाठी एक सारखे असावे अशी सूचना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह विभागाला केली. लिक्वीड ऑक्सीजन पुरवठ्याकडे मुख्य सचिवांनी लक्ष द्यावे त्याचे दर वाढणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जिल्ह्यातून आलेल्या निधीच्या मागणीवर बोलताना उप मुख्यमंत्री म्हणाले की, एसडीआरएफ, जिल्हा विकास निधी (डीपीसी) वापरावा. सीएसआरचा निधी अधिकाधिक मिळवण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. राज्यात जम्बो सुविधा उभ्या करतच आहोत पण त्याचबरोबर विभागीय आयुक्तांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी आहे त्या रुग्णांलयांमध्ये हा निधी खर्च करून तिथे आयसीयु बेड, ऑक्सीजनची सुविधा निर्माण करून या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन केल्यास कायमस्वरूपी सुविधा म्हणून त्या उपयोगात येतील.
समाज माध्यमांवरील चुकीच्या व्हिडिओंवर पोलीसांनी लक्ष ठेवावे - गृहमंत्री अनिल देशमुख
समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या चुकीच्या व्हिडिओंवर पोलीसांनी लक्ष ठेवण्याच्या सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिल्या. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची स्थानिक यंत्रणेने अधिकाधिक निर्मिती करावी जेणेकरून विसर्जनाला गर्दी होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
टेलीआयसीयुचा विस्तार करण्याची आवश्यकता
- आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळतील यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तालुकास्तरावर रुग्णवाहिका उपलब्ध राहतील याकडे जिल्हाधिकऱ्यांनी लक्ष घालावे. लवकर निदानासाठी काही जिल्ह्यांमध्ये कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चाचण्यांची क्षमता पुरेशी असून त्याचा पूर्णपणे वापर करण्याचे आवाहन आरोग्मंत्र्यांनी केले. टेलीआयसीयु सुविधा राज्यात सुरू झाली असून भिवंडी मध्ये त्याच्या वापराने फायदा होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. जेथे विशेषज्ञ उपलब्ध नाही तेथे ही सुविधा फायदेशीर ठरत असल्याचे सांगतानाच सध्या सीएसआरच्या माध्यमातून ही योजना सुरू असून राज्यात तिचा विस्तार करण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
17 August 2020
उमरगा येथील तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात औषधनिर्माण शास्त्र पदवीला (बी फार्मसी) मान्यता
प्रतिनिधी / उमरगा
उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाला महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI), नवी दिल्ली यांच्याकडून औषधनिर्माण शास्त्र पदवीला (बी फार्मसी) मान्यता मिळाली आहे. प्रवेश क्षमता ६० असणार आहे. तसेच हे महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी लोणेर (BATU) या विद्यापीठाशी संलग्नित आहे. महाविद्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये महाविद्यालयामध्ये औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी फार्मसी) अभ्यासक्रम व पदवी अभ्यासक्रम (बी फार्मसी) प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती प्राचार्य कवलजीत बिराजदार यांनी दिली आहे.
भारत विद्यालय उमरगा येथे स्वातंत्र्यदिन साजरा
प्रतिनिधी / उमरगा
भारत विद्यालय उमरगा येथे शनिवारी ( दि. १५) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
यावेळी भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. तात्यारावजी मोरे आबा यांच्या पुतळ्याचे पुजन मुख्याध्यापक शाहूराज जाधव व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन पर्यवेक्षक विक्रांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक शाहूराज जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक विक्रांत मोरे, पर्यवेक्षक संजय देशमुख, माजी शिक्षक नंदु कुलकर्णी व शिक्षकवृंद उपस्थित होते. कोरोनाला न घाबरता सर्वांनी सामना करून कोरोनासह जगण्याची तयारी करावी लागणार आहे. शाळा नाही, शिक्षण सुरु या उद्देशाने सुरू असलेल्या आॅनलाईन अभ्यासक्रमाबद्दल मुख्याध्यापक शाहूराज जाधव यांनी माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाच्या निर्देशांचे पालन यावेळी करण्यात आले. सूत्रसंचालन व्यंकट गुंजोटे यांनी केले.
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयामध्ये ७४ वा स्वातंत्र्य दिन व गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे भानुदासराव चव्हाण महाविद्यालयामध्ये शनिवारी (दि. १५) स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देवगिरी ग्लोबल अकॅडमी कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल पहिल्याच वर्षी सायन्स ९६.४७ टक्के व काॅमर्स १०० टक्के लागला आहे. या निमित्ताने प्राचार्य, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयातून प्रथम आलेली शुभांगी विकास ढोले, आकाश शिवशंकर स्वामी, मुस्कान रफिक मुलानी, कीर्ती नवनाथ माळी, लता लिंबराज बादुले, स्नेहल वैजनाथ पाटील, कमल पंडित मडोळे, निकिता इराप्पा बादुले, जना महादेव पाटील, शिवकन्या सहदेव कदम या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश इंगळे, नगराध्यक्षा ज्योती मुळे, किशोर साळुंके, प्रवीण पाटील, पांडुरंग पाटील, कोंडीबा जगताप, महाविद्यालयाचे प्राचार्य वीरभद्रेश्वर स्वामी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. यशवंत चंदनशिवे, प्रा. व्यंकट चिकटे, प्रा. राजपाल वाघमारे, प्रा. विनोद तुंगे, प्रा. स्वाती निकम, प्रा. अमृता दिक्षित, प्रा. उमा हलकुडे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
16 August 2020
लोहारा तालुक्यातील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्यसेवेतील कार्य उल्लेखनीय - पालकमंत्री शंकरराव गडाख
प्रतिनिधी / लोहारा
सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाने मागील २५ वर्षात आरोग्यसेवेत अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे स्पर्श रुग्णालयाची महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे असे गौरवोद्गार उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी काढले. दि १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान पालकमंत्री गडाख यांनी स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूरला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री गडाख दोन दिवस उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी शुक्रवारी ( दि. १४) तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली अवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार विजय अवधाने, गटविकास अधिकारी अशोक काळे, लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, सास्तुरचे सरपंच यशवंत कासार, ग्रामविकास अधिकारी शिवानंद बिराजदार उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्पर्श रुग्णालयात पाहणी केली. यावेळी स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी स्पर्शच्या कामकाजाची माहितीचे प्रोजेक्टरद्वारे प्रेझेन्टेशन केले. मान्यवरांच्या हस्ते स्त्री जन्माचे स्वागत म्हणून रुग्णालयात जन्मलेल्या बालिका व मातांना बेबी कीट, पैंजण, साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व गरोदर माता व प्रसूती मातांना हिमोग्लोबिन वाढीसाठी एक महिना पुरेल एवढे सकस आहार गुळ, शेंगदाणे लाडू वाटप करण्यात आले.
जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूरच्या अडचणी प्रामुख्याने सोडवण्यात येतील तसेच स्पर्श रुग्णालयाच्या भविष्यातील सुधारण्यासाठी शासना तर्फे संपूर्ण सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन पालकमंत्री गडाख यांनी यावेळी केले. स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूरची पाहणी व कामकाजाचा आढावा घेतल्याबद्दल प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
Subscribe to:
Posts (Atom)

















































