15 February 2018

लोहारा येथील कुस्ती स्पर्धेत शैलेश शेळके विजयी

लोहारा प्रतिनिधी -

लोहारा शहरात महाशिवरात्री निमित्त बुधवारी ( दि. 14) झालेल्या कुस्ती स्पर्धेत टाका येथील शैलेश शेळके याने अंतिम कुस्तीत बाजी मारली आहे.
                   महाशिवरात्री निमित्त लोहारा येथे विविध धार्मिक , सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे बुधवारी ( दि. 14) सायंकाळी 5 च्या सुमारास कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने पैलवान आले होते. यावेळी शैलेश शेळके (टाका) व भैय्या माळी (रामलींग मुदगड) यांच्यात अंतिम कुस्ती झाली. यामध्ये शैलेश शेळके याने भैय्या माळी याला अस्मान दाखवत  बाजी मारली. यावेळी अंतिम कुस्तीतील विजेता पैलवान शेळके यास के डी पाटील यांच्या तर्फे 21 तोळे चांदीची महादेवाची पिंड देण्यात आली आहे. यावेळी यात्रा कमिटी च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील, शंकर जट्टे, के.डी.पाटील, आयुब शेख, नवाज सय्यद, शंकर मुळे, गोपाळ सुतार, हरी लोखंडे, श्रीकांत भरारे, श्रीनिवास माळी, सतिश ढगे, उदय कुलकर्णी, ओम पाटील, बसवराज पाटील, विरेश स्वामी, मोहन वचने, दिनेश माळी, उमाकांत लांडगे, राजेंद्र दरेकर अमोल माळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment