26 February 2020

लोहारा येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करून संत गाडगेबाबा जयंती साजरी





प्रतिनिधी / लोहारा

लोहारा येथे रविवारी ( दि. २३) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडीच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वर्षा चौधरी यांच्या वतीने शहरात स्वच्छता करणाऱ्या २६ महिलांना साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले.
           या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा रवा च्या मुख्याध्यापिका उलन कांबळे या होत्या. यावेळी पत्रकार निळकंठ कांबळे, गिरीष भगत, यशवंत भुसारे, बालाजी बिराजदार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष गितांजली मोटे, महिला संघटक निर्मला दंतकाळे, महिला तालुकाध्यक्षा वर्षा चौधरी, तालुका संघटक आसिफा सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगरपंचायत लोहारा येथील गाडगेबाबा महिला स्वच्छता युनिटमधील २६ महिला स्वच्छता दुत यामध्ये  जिजाबाई सगट,मंगलबाई रोडगे,सुनिता कांबळे,अश्वीनी रोडगे,ललीता रोडगे,नागरबाई साळवे,सुकुमार सगट, कांचन सितापुरे, जनाबाई शेवाळे,पार्वती सगट,मुद्रिका थोरात,शालु रोडगे,नागरबाई रोडगे, राजाबाई लवटे,विजया सुरवसे,मोगलम्मा तेकोष्ठी व डंपिंग कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्ष व साडी चोळी स्वरूपात भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन स्वच्छतादुत जोडपे यामध्ये हुकुम इनामदार व अख्तरबी इनामदार,  हमीद मुजावर, रईसा मुजावर यांचा सत्कार करण्यात आला. या सन्मानाने स्वच्छता कर्मचारी महिला भारावून गेल्या होत्या. आमच्या कामाला वेगळेपणाणे पाहीले जाते पण आज आमचा मान सन्मान केल्याबद्दल आम्हांला खुप समाधान वाटलं अशी प्रतिक्रिया जिजाबाई सगट, रईसा मुजावर यांनी व्यक्त केली.
             संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून गाडगेबाबा यांच्या अनुयायांचा, दुसऱ्यांच्या स्वास्थासाठी स्वच्छता हिच ईश्वरसेवा समजून काम करण्याऱ्या स्वच्छता दुतांचा सन्मान करायचा योग आला यामुळे नक्कीच सफाई कामगार वर्गाचा लोक आदर करतील असे मत लोहारा तालुका शिक्षक संघ महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा वर्षा चौधरी व्यक्त केले. यावेळी गितांजली मोटे, उलन कांबळे, हमीद मुजावर यांनी स्वच्छता व गाडगेबाबा यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक राजु माळवदकर, रफीक शेख, काका गोरे, लक्ष्मण खंडाळे, प्रा. उद्धव सोमवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विकास घोडके यांनी तर निर्मला दंतकाळे यांनी आभार मानले.

21 February 2020

लोहारा येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला शुक्रवार पासून सुरुवात - धार्मिक, सांस्कृतिक, क्रिडा यासह विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन




प्रतिनिधी / लोहारा

लोहारा येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला शुक्रवारी ( दि. २१) पासून सुरुवात होत आहे. सलग चार दिवस धार्मिक, सांस्कृतिक, क्रिडा यासह विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
          या यात्रा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (दि. २१) सकाळी ९ वाजता हरिहर भजनी मंडळाचे वारकरी, ग्रामस्थ, युवकांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या जयघोषात शोभायात्रा व शंभू महादेवाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.२२) सकाळी १० वाजता शिवभक्त संगमेश्वर बिराजदार महाराज ( वलांडीकर) यांचे काल्याचे किर्तन, दुपारी १ वाजता भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. सायंकाळी ४ वाजता जंगी कुस्त्यांचा फड रंगणार असून या स्पर्धेतील शेवटची कुस्ती जिंकणाऱ्या मल्लास २५ तोळे चांदीची महादेवाची पिंड देण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी रविवारी (दि. २३) सकाळी ७ वाजता मॅरेथॉन स्पर्धा, सकाळी १० वाजता रांगोळी स्पर्धा, सायंकाळी ६ वाजता पुरुषांसाठी भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा होणार आहेत. तसेच चौथ्या दिवशी सोमवारी (दि. २४) सायंकाळी ७ वाजता हायस्कुल लोहारा शाळेच्या मैदानावर भव्य खुल्या राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांसाठी सव्वा लाखांपेक्षा अधिक रक्कमेची बक्षिसे व चषक विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणार आहेत. तरी या यात्रामहोत्सव व विविध धार्मिक, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ लोहारा तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

20 February 2020

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलचे ७ वे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा संपन्न



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलचे ७ वे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा मंगळवारी ( दि.१८) संपन्न झाला. यावेळी स्कुल च्या चिमुकल्यांनी विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.


             या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प.सदस्य दीपक जवळगे होते. लोहारा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा ज्योती मूळे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपनगराध्य प्रताप घोडके, दिपक मूळे, नगरसेवक गगन माळवदकर, दत्तात्रय वाडीकर, प्रा. यशवंत चंदनशिवे, दत्तात्रय गायकवाड, जयराम चोबे, सुरेखा भोसले, ब्रह्मकुमारी सरिता बहनजी, स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव, पालक प्रतिनिधी शिवराज झिंगाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


                    कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, कलेची देवता नटराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेच्या वतीने मान्यवरांना स्मृतिचिन्ह व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय  कब-बुलबुल, स्काऊट गाईड राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त विद्यार्थी, आदर्श शिक्षक म्हणून पूजा दाळिंबकर, वर्षा घोडके यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी केलेल्या प्रास्ताविकातून स्कुलचा वर्षभरातील आढावा प्राचार्य शहाजी जाधव यांनी मांडला. ते म्हणाले की, कोणतीही भाषा ही वाईट नसते, ज्याप्रमाणे मराठी मातृभाषा, हिंदी राष्ट्रभाषा आहे त्याचप्रमाणे इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याने या भाषेतून शिक्षण देणे ही काळाची गरज आहे.


                 यावेळी बोलताना दिपक जवळगे म्हणाले की, न्यू व्हिजन या नावाप्रमाणेच स्कुलचे कार्य आहे. लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांच्या पाल्यांना या शाळेत इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे असे मत मांडून स्कुलच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये चिमुकल्यानी गणेश वंदना व उठाओ बस्ता - है आगे स्कुल का रस्ता या गीताने प्रारंभ केला. यावेळी लोकनृत्य, तांडवनृत्य, गोंधळगीत, देव मल्हारी, देशभक्तीपर गीत, माय भवानी, कब्बडी डान्स, फनी डान्स, लावणी, बालगीत, शेतकरी गीत, महाराष्ट्राची लोकधारा, मराठी- हिंदी सिनेमातील गीतावर विविध प्रकारची नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच समाजातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्याच मुलांकडून होणारे हाल व आपला समाज मातृ पितृ देवोभव: ही संस्कृती विसरत चालल्याचे विदारक सत्य  वृद्धाश्रम  या नाटिकेतून दाखवून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणले. छ. शिवरायांचे चरित्र दर्शविणारे 'एकच राजा इथे जन्मला' व 'दैवत छत्रपती' हे गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्र संचलन सविता जाधव यांनी तर आभार सिद्धेश्वर सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कुलमधील शिक्षक रामेश्वर पंजरकर, व्यंकटेश पोतदार, अनंत समदळे, परमेश्वर जाधव, रवींद्र चव्हाण, गणेश सूर्यवंशी, शीतल खराडे, हिना सौदागर, पूनम गोरे, मीरा शिवकर, प्रणिता जवादे, चांदबी चाउस, हुमेरा पटेल, पूनम पंजरकर, स्वाती कुलकर्णी, वैशाली स्वामी, सुवर्णा पाटील आदींसह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात वर्षभरात पालकांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

19 February 2020

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील फिनिक्स फाउंडेशन येथे शिवजयंती साजरी







प्रतिनिधी / लोहारा

तालुक्यातील अचलेर येथील फिनिक्स फाऊंडेशन च्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
            यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक रामसिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मल्लिनाथ अष्टगे, जगदीश सुरवसे यांची उपस्थिती होती. जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विचार व्यक्त केले. यावेळी रामसिंग चव्हाण, जगदीश सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावरील विविध गीतांवर सादरीकरण केले. तसेच नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अबूबकर पटेल यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहा शिवपुरे यांनी तर काजल गघिलोत यांनी आभार मानले.

लोहारा तालुक्यातील हराळी येथे शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुक्यातील हराळी येथे शिवजयंती निमित्त मंगळवारी ( दि. १८) सिंहासिनाधिश्वर मित्र मंडळ हराळी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी माजी सरपंच अजित सूर्यवंशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून
रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे हराळी केंद्र प्रमुख अभिजित कापरे, प्राचार्या गौरी कापरे, सचिन सूर्यवंशी, सुहास पाठक, किसन सूर्यवंशी, अमित रनखांब, अविनाश सूर्यवंशी, प्रशांत कस्तुरे, शरद सूर्यवंशी, साहिल शेख, भैय्या धाडवे, मल्लीकार्जुन गौरकर, इस्माईल शेख, नितीन कस्तुरे, विकास धनुरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सोलापूर येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांनी रक्तसंकलन केले.
            या कार्यक्रमासाठी अध्यक्ष किशोर सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुरज सूर्यवंशी, समाधान सूर्यवंशी, अतुल बिराजदार आदींनी परिश्रम घेतले. आली.

16 February 2020

लोहारा तालुक्यातील धानुरी येथील शेतकऱ्यांकडून गटविकास अधिकारी काळे यांचा सत्कार



प्रतिनिधी / लोहारा

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन तालुक्यातील धानुरी करजगाव रस्त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल धानुरी येथील शेतकऱ्यांनी लोहारा गटविकास अधिकारी अशोक काळे यांचा सत्कार केला.
          धानुरी करजगाव हा रस्ता पाणंदमुक्त करुन मजबुतीकरण करण्यात यावे यासाठी धानुरी येथील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदपासुन मंत्रालयापर्यंत वेगवेगळे आंदोलने केली होती. यानंतर जिल्हा परिषदेने शेस फंडातुन ८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदरील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधुन पहिल्या टप्प्यातील १ किमी रस्त्यासाठी ११ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वर्षानुवर्षे मागणी करण्यात आलेल्या शेतरस्त्याचे काम मंजूर केल्याबद्दल धानुरी येथील शेतकऱ्यांनी लोहारा गटविकास अधिकारी अशोक काळे यांचा सत्कार केला. यावेळी कनिष्ठ प्रशासन अधिकारी पी. एस. निंबाळकर, कनिष्ठ सहाय्यक डी. एन. जायफळे, विठ्ठल बुरटुकणे, माजी उपसरपंच बालाजी वडजे, संभाजी मुसांडे, विजय साळुंके, गहिनीनाथ साळुंके, गुंडु पाटील, तात्याराव साळुंके, मनोज साळुंके, बबु देशमुख, परमेश्वर साळुंके, अजित मुसांडे आदीसह शेतकरी उपस्थित होते.

12 February 2020

लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील जि प शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न





प्रतिनिधी / लोहारा

तालुक्यातील बेलवाडी येथील जि प प्रा शाळेत मंगळवारी ( दि.११) वार्षिक स्नेहसमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थीनी विविध कलागुणाचे प्रदर्शन करुन प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोहारा तहसीलचे तहसीलदार विजय अवधाने, महादेव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच छाया जाधव, उपसरपंच शोभा हजारे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लहू जाधव, उपाध्यक्षा निता भगत, शिक्षक समिती पदाधिकारी बबुवान बादुले, दत्तात्रय फावडे, कैलास माणिकशेट्टी, भिमाशंकर डोकडे,  महानंदा चव्हाण, मोहन शेवाळे, तानाजी दबडे, रसुल शेख, विकास घोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यकमाचे प्रास्ताविक परमेश्वर सुर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचलन सुनंदा निर्मळे यांनी तर मल्लिकार्जून कलशेट्टी यांनी आभार मानले. कार्यकमासाठी बबिता शिंदे, मल्लिकार्जून कलशेट्टी ,मोरवे खिजर, अनंत कानेगावकर यांनी परिश्रम घेतले.

09 February 2020

कलदेव निंबाळा येथे विहिरींच्या कामांचा शुभारंभ





कलदेव निंबाळा येथे विहिरींच्या कामांचा शुभारंभ


आ. ज्ञानराज चौगुले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या हस्ते नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा शुभारंभ -

प्रतिनिधी / उमरगा

नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजने अंतर्गत  कलदेव निंबाळा ग्रामपंचायतीच्या वतीने मंजुर करण्यात आलेल्या विहिरींच्या कामाचा शुभारंभ आ. ज्ञानराज चौगुले, उस्मानाबाद जिल्हा बँकेचे  चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जि.प. सदस्य प्रा. सुरेश  बिराजदार, शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, पंचायत समिती सदस्या पानफुलाबाई कांबळे,   तालुका कृषी अधिकारी एस. व्ही. जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सचिव  बाळासाहेब स्वामी आदीच्या हस्ते लाभार्थी विवेकानंद डोणगावे यांच्या विहीरीचा कार्यरंभ करण्यात आला.
                     यावेळी सरपंच सुनिता पावशेरे, बाबूराव शहापुरे, सदानंद शिवदे पाटील, अजित पाटील, अतुल गायकवाड, तुकाराम बिराजदार, सुनिल पांचाळ, एस . व्ही गायकवाड,  प्रभाकर बिराजदार, तुकाराम जाधव, खयूम चाकुरे, प्रा . रमाकांत पाटील, मधुकर पाटील, कलाकार पाटील, विजयकुमार डोणगावे, बन्सी चव्हाण, कल्लेश्वर जाधव, किरण स्वामी, अतूल गायकवाड, निळकंठ कांबळे, किसाबाई डोणगावे, शिवाजी रसाळ, प्रभाकर बिराजदार, बळीराम मुसांडे, वैजनाथ कल्याणकर , मलिनाथ कारभारी, गोपाळराव डोणगावे, पांडूरंग पाटील, किरण स्वामी, अजित भालेराव, गहिनीनाथ बिराजदार, दयानंद सुर्यवंशी , कुमार सरवदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते . याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
                   गावातील शेतकऱ्यांनी गाव स्तरावरील कृषी संजिवनी समितीकडे ऑनलाईन विहीर मागणीचे अर्ज नोंदणी केले होते. यामधून शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार अपंग, मागासवर्गीय, खुला प्रवर्गास पारदर्शक ड्रॉ पद्धतीने विहीरींचे वाटप सर्व प्रवर्गाला  ग्रामपंचायतीच्या वतीने तालुक्यात प्रथम  केल्याचे  या कृषी समितिच्या अध्यक्षा तथा सरपंच सुनिता देविदास पावशेरे यांनी या प्रसंगी सांगितले. देविदास पावशेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

08 February 2020

लोहारा तालुक्यातील हराळी येथील सचिन सूर्यवंशी यांच्याकडून महालिंगरायवाडी शाळेला क्रीडा साहित्य



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुक्यातील हराळी येथील सचिन सूर्यवंशी यांनी उमरगा तालुक्यातील महालिंगरायवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला क्रीडा साहित्य वितरित केले आहे. महालिंगरायवाडी येथे बुधवारी ( दि. ५) क्रीडा साहित्य वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल, फुटबॉल, बॅट, बॉल, बॅडमिंटन किट, जंपिंग रोप, रिंग्स आदी साहित्य देण्यात आले. यावेळी सचिन सूर्यवंशी यांनी मुलांनी शारीरिक क्षमता कशी वाढवावी याविषयी मुलांना माहिती सांगितली तसेच जलसंधारण व पाण्याच्या शुद्धते विषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी किसन सूर्यवंशी, उपसरपंच आशाताई भुसार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या चंदा घोरपडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षक राजेश सुर्यवंशी यांनी तर शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी आभार मानले.


06 February 2020

सहशिक्षक विजयकुमार कलशेट्टी यांना राज्यस्तरीय गुणीजण शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान






प्रतिनिधी / लोहारा

उमरगा तालुक्यातील आलूर येथील जि. प. कन्या प्राथमिक शाळेतील  तंत्रस्नेही सहशिक्षक विजयकुमार कलशेट्टी यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अँकाडमी, मुंबई तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय गुणीजण शिक्षकरत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अँकाडमीचे संस्थापक अध्यक्ष अँडव्होकेट कृष्णाजी जगदाळे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण  करण्यात आले. सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र आणि मानकरी बॅच हे या राज्यस्तरीय गुणीजण गौरव पुरस्काराचे स्वरूप होते.
            तंञज्ञानाच्या युगात डिजीटल करण्याचे उद्दिष्ट शाळेसमोर    असताना तंञस्नेही उपक्रमशील शिक्षक विजयकुमार कलशेट्टी यांच्या सहविचार कल्पनेतून शाळेचे सर्व वर्ग डिजीटल झाले आहे. शाळेतील सर्वच वर्ग Smart Led Tv युक्त झाले आहेत. याद्वारे शाळेतील विद्यार्थीनीना स्वयंअध्ययन, इंटरनेट, युटुब अँप्स हाताळण्यास मदत होत आहे. शाळेत बोअरवेल, प्रोजेक्टर, संगणक संच, ध्वनी साधने आदी साहीत्याने शाळा समृध्द बनली आहे. शाळेतील सर्वच शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका, वाँटर बेल, led tv द्वारे अध्यापन, आदी नवनवीन उपक्रम राबविले जातात.
            विजयकुमार कलशेट्टी यांचे शैक्षणिक, सामाजिक, अष्टपैलू कार्य पाहूनच मनुष्यबळ विकास लोकसेवा अँकाडमी, मुंबईने त्यांना सन्मानित केले आहे. या यशाबद्दल शाळेतील मुख्याध्यापक अनिल सोमंवशी व सर्व शिक्षक स्टाफच्या वतीने परिपाठात त्यांचा गौरव करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्नेहलता भालके, उपाध्यक्ष महादेव बिराजदार, सर्व सदस्य, सरपंच सुरेश बोळदे, उपसरपंच राजकुमार माने, तंटामुक्त समिती अध्यक्ष नागेश पाटील, माजी पं.स.सदस्य शिरीष पाटील, तसेच जि .प . उर्दू शाळा आलूर , सरस्वती इंग्लिश स्कूल आलूर , सोमेश्वर इंग्लिश स्कूल आलूर , जि .प इंदीरा नगर आलूर , फिनिक्स फाउंडेशन अचलेर, केसरजवळगा, अचलेर, बेळंब, मुरुम, आलूर व परिसरातून सर्वच नागरीकांनी कलशेट्टी यांचे कौतुक केले आहे.

कै. ल. ना. श्रीगिरे व कै. डॉ. के.डी. शेंडगे यांच्या पुण्यस्मरणा्निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न





प्रतिनिधी / लोहारा

सामाजिक उत्तरदायित्व या भावनेने लोहारा येथील श्रीगिरे हॉस्पिटलच्या वतीने बुधवारी (दि. ५) मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जवळपास ३०० रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. 
                 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. एस. थिटे हे होते. शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागण्णा वकील, चंद्रकांत पाटील, नगराध्यक्षा ज्योती मुळे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, शंकर जट्टे, व्यंकट घोडके, जालिंदर कोकणे, गणेश वैरागकर, गिरीश भगत, निळकंठ काबंळे, वर्षा चौधरी, उत्तम पाटील, एस बी आय लोहारा शाखेचे मॅनेजर सुमित्रा सिन्हा, राम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. सचिन शेंडगे, डॉ. दयानंद चौरे, डॉ. वसुधा दापके-देशमुख, डॉ. प्रियांंका चौरे, डॉ. श्रीकांत बलवंडे यांनी रूग्णांची तपासणी केली. या शिबिरात रक्तातील साखर, रक्तदाब, हिमोग्लोबिन, ईसीजी, एक्स-रे आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. जवळपास ३०० रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हेमंत श्रीगिरे यांनीे केले. सुत्रसंचालन जी. के. घोडके यांनी तर डॉ. रुपाली श्रीगिरे यांनी आभार मानले. श्रीगिरे हॉस्पिटलच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याची तज्ञ डाॅक्टरांकडून  मोफत तपासणी व्हावी या सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने हा उपक्रम राबविला. कै. ल. ना. श्रीगिरे व कै. डॉ. के.डी. शेंडगे यांच्या पुण्यस्मरणा्निमित्त या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.