17 September 2020

लोहारा येथे मराठा आरक्षणाबाबत संभाजी ब्रिगेडचे निवेदन



प्रतिनिधी / लोहारा

पंतप्रधानांनी लोकसभा व राज्यसभेत मराठा आरक्षणाचा ठराव पास करून हा विषय मार्गी लावावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. लोहारा तहसीलदार विजय अवधाने यांनी हे निवेदन स्वीकारले.
                   मराठा आरक्षणासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पंतप्रधानांना तहसिलदार यांच्या मार्फत सोमवारी ( दि. १४) निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाच्या आरक्षण बाबत मा. सवौच्च न्यायालयाने दि. ९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने समाजाला दिलेल्या आरक्षणास स्थगिती देऊन मराठा आरक्षणाचा विषय स्वतंत्र घटना पिठाकडे वर्ग करण्याबाबत निर्दशीत केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संपूर्ण देशात विशेषताः महाराष्ट्रातील मराठा समाजास जबर फटका बसलेला आहे. मराठा समाज व्यथीत झालेला आहे. आम्ही घटनात्मक आरक्षणास पूर्णत पात्र आसताना देखील मराठा समाज आरक्षण लाभापासून कायम वंचित राहिलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून आपण समजून घ्याव्यात व मराठा आरक्षणाचा विषय लोकसभा व राज्यसभेत बहुमतांनी ठराव पास करून हा विषय मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाचा सरसगट ओबीसी मध्ये समावेश करावा, अंतिम निर्णय होईपर्यंत सध्या झालेली नोकरभरती, महाविद्यालयातील प्रवेश कायम ठेवावेत, घटना पिठाचा अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही स्वरूपाची शासकीय नौकर भरती करण्यात येउ नये,  महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढावा आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास घटनात्मक मार्गाने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी असा ईशारा या निवेदनात देण्यात आला आहे.




               या  निवेदनावर शरद पवार, धनराज बिराजदार, महादेव मगर, आण्णासाहेब पवार, शामसुंदर पाटील, बालाजी यादव, सुमित कोटमाळे, विशाल भोजराव, महेश भोजराव, सतिश जगदाळे, रवींद्र जाधव, विठ्ठल औरादे, अंगद मुळे, खंडू जांभळे, लक्ष्मण दावेकर, संतोष जांभळे, महादेव पवार, शरद मुळे आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

14 September 2020

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (स) येथे कृषी सहाय्यक दिपक जाधव यांच्या बदलीनिमित्त निरोप समारंभ संपन्न



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (स) येथे कृषी सहाय्यक पदावर कार्यरत असलेले दिपक जाधव यांची सास्तुर येथे बदली झाली आहे. शनिवारी ( दि. १२) हिप्परगा ( स) येथे ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून निरोप दिला.
             दिपक जाधव हे मागील ९ वर्षांपासून हिप्परगा (स), करवंजी येथे कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांची सास्तुर येथे बदली झाली. जाधव यांनी मागील ९ वर्षात केलेल्या उत्कृष्ठ सेवेबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी ( दि.१२) त्यांना निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच नागनाथ पाटील, पोलीस पाटील संतोष यादव, सोसायटीचे चेअरमन श्रीशैल्य ओवांडे, चांद कारभारी, ग्राम रोजगार सेवक लक्ष्मण मोरे, आदिनाथ भोजराव, दयानंद ओवांडे, मंगलताई सुरवसे, करवंजीचे सरपंच तानाजी हाक्के, भरत मुगळे, सोमनाथ भोंडवे, अनिल ओवांडे यांच्यासह हिप्परगा (स), करवंजी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी दिपक जाधव यांनी मागील ९ वर्षांत केलेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.

10 September 2020

“विकेल ते पिकेल” या धोरणावर मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद




मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब विविध कृषि विषयक योजनांच्या संदर्भात दिनांक  10 सप्टेंबर 2020 रोजी दु. 12 ते 1.30 वा. शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषि मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषि आयुक्त धीरज कुमार उपस्थित राहणार आहेत. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला व नागरिकांनी  या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती कृषि मंत्री, दादाजी भुसे यांनी केली आहे.










कृषि, महसूल व ग्रामविकास विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी ग्रामपातळीवर स्थानिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. सदर कार्यक्रमाचे कृषि विभागाच्या यु-ट्युब चॅनेल (http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM) वर लाईव्ह प्रसारण करण्यात येईल.
“विकेल ते पिकेल” अंतर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिर्वतन अभियानाची (SMART) सुरुवात करण्यात येईल. या प्रसंगी मा. मुख्यमंत्री ग्रामपातळीवरील कृषि विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून  “चिंतामुक्त”  शेतकरी  व “शेतकरी केंद्रित” कृषि विकास यावर आपले विचार मांडतील व शेतकऱ्यांशी संवाद साधतील.


 यु-ट्युब चॅनेल लिंक 

http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM




उमरगा, लोहारा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उमरगा लोहारा विधानसभा सदस्य आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे. 

“विकेल ते पिकेल” या धोरणावर मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद




मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे विविध कृषि विषयक योजनांच्या संदर्भात दिनांक  10 सप्टेंबर 2020 रोजी दु. 12 ते 1.30 वा. शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषि मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषि आयुक्त धीरज कुमार उपस्थित राहणार आहेत. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला व नागरिकांनी  या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती कृषि मंत्री, दादाजी भुसे यांनी केली आहे. 
कृषि, महसूल व ग्रामविकास विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी ग्रामपातळीवर स्थानिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. सदर कार्यक्रमाचे कृषि विभागाच्या यु-ट्युब चॅनेल (http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM) वर लाईव्ह प्रसारण करण्यात येईल.
“विकेल ते पिकेल” अंतर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिर्वतन अभियानाची (SMART) सुरुवात करण्यात येईल. या प्रसंगी मा. मुख्यमंत्री ग्रामपातळीवरील कृषि विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून  “चिंतामुक्त”  शेतकरी  व “शेतकरी केंद्रित” कृषि विकास यावर आपले विचार मांडतील व शेतकऱ्यांशी संवाद साधतील.










यु-ट्युब चॅनेल लिंक

http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM



तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी केले आहे.

09 September 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी घेतली जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट - जिल्ह्यातील विविध विषयांवर झाली चर्चा



राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची बुधवारी (दि. ९) भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने सध्याच्या कोविड १९ ची उद्भवलेली गंभीर परिस्थिती, दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी, सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वेमार्गाचे जास्तीत जास्त काम रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात यावे, उस्मानाबाद येथे होत असलेले वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ होणेबाबत, जिल्हा बँक आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. 




याबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढाकार घेऊन हे प्रश्न मार्गी लावावेत अशी विनंती करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, उस्मानाबाद चे माजी नगराध्यक्ष संपतराव डोके, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, उस्मानाबाद शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे उपस्थित होते.

07 September 2020

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या ऊस पिकाची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली पाहणी



प्रतिनिधी / उमरगा

 उमरगा तालुक्यातील येणेगुर व बलसुर परिसरात रविवारी ( दि. ६) रात्री झालेल्या वादळी पावसामुळे ऊस पिकाचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. सोमवारी ( दि. ७) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी या नुकसानीची पाहणी केली.
       उमरगा तालुक्यातील येणेगुर व बलसुर परिसरात रविवारी (दि.६) मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने ऊस पिकाचे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उंच वाढलेल्या ऊस पिकासाठी अनेक ठिकाणी हा पाऊस हानिकारक ठरला आहे. या झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली. यावेळी येणेगुर येथील शेतकरी काशिनाथ व्हनाळे, विठ्ठल व्हनाळे, राजू माळी, उमेश पाटील, छानूमिया जवळगे, गुंडाप्पा व्हनाळे, उमेश दामशेट्टी आदींसह भीमा स्वामी, आयुब जवळगे, वैभव बिराजदार, नेताजी कवठे आदींची उपस्थिती होती.

05 September 2020

एकता फाऊंडेशन उस्मानाबादचे शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर




प्रतिनिधी / उस्मानाबाद

समाजातील भावी पिढीवर संस्कार घडवण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात आजवर अनेक सुजान नागरिक समाजाला देण्याचे काम शिक्षकाच्या माध्यमातुन झालेले आहे. त्यामागे शिक्षकांचे योगदान निश्चित प्रशंसनीय आहे हीच बाब ओळखुन शिक्षण क्षेञात निरपेक्ष वृत्तीने समर्पित भावनेतुन कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव व्हावा या हेतुने शिक्षकांचा सुसंस्कारीत पिढी घडवण्याचा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरु राहावा व त्यांच्या या प्रयत्नास बळ मिळावे या उद्देशाने एकता फाऊंडेशन उस्मानाबाद च्या वतीने दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार चे आयोजन करण्यात येते. पुरस्काराचे यावर्षी चे चौथे वर्ष आहे. 
           1) श्री. विक्रम माणिकराव पाटील जिल्हा परिषद कन्या प्रा. शाळा बेंबळी ता.उस्मानाबाद 2) श्री. संतोष काकासाहेब घार्गे श्रीपतराव भोसले माध्य व उच्च माध्य विद्यालय उस्मानाबाद ता. उस्मानाबाद 3) श्री. धनंजय सदाशिव डोळस छञपती संभाजी विद्यालय जवळा ता. कळंब 4) श्री. प्रदीपकुमार अरुण गोरे नुतन प्राथमिक विद्यामंदीर उस्मानाबाद ता. उस्मानाबाद 5) श्री. भालचंद्र भारत कोकाटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवाजीनगर ता. उस्मानाबाद 6) सुशिलकुमार सुधाकर तीर्थकर विद्याभवन हायस्कुल कळंब ता. कळंब 7) श्री. श्रीमंत नारायण लगस जिल्हा परिषद शाळा वाडीबामणी ता. उस्मानाबाद. 8) श्री. सुधीर विश्वनाथ लोमटे जिल्हा परिषद प्रा. शाळा जवळा ता कळंब 9) श्रीमती.प्रणिता हरिश्चंद्र भंडारे छञपती शिवाजी माध्य व उच्च माध्य विद्यालय उस्मानाबाद ता. उस्मानाबाद 10) श्रीमती. सुनीता शंकरराव शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौडगाव ता. उस्मानाबाद 11) श्री. संजय प्रभाकर देशमुख जिल्हा परिषद शाळा पळसवाडी ता. उस्मानाबाद 12) श्री. ज्ञानेश्वर गुरलिंगआप्पा माशाळकरभारत विद्यालय बेडगा ता. उमरगा 13) श्री. लक्ष्मण संभाजी शेळके न्यु हायस्कुल चिंचोली ता. भुम 14) श्री. अर्जुन चिंतामण जाधव जिल्हा परिषद कन्या शाळा कळंब ता. कळंब 15) श्रीमती. ज्योती दिलीप पाटील केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा ता. लोहारा 16) श्री. संघपाल पंडीत सुकाळे जिल्हा परिषद शाळा झिन्नर ता. वाशी 17) श्री. अनिल आभिमान शिंदे जिल्हा परिषद प्रा.शाळा हिंगणगाव ता. कळंब 18) श्री. तुकाराम विष्णु वाडकर जिल्हा परिषद प्रा. शाळा सांगवी काटी ता. तुळजापुर 19) श्री. श्रीमंत संदीपान चौरे जिल्हा परिषद प्रा. शाळा पाचपिंपळा ता परंडा 20)  श्री. विठ्ठल उत्तम नरवडे जिल्हा परिषद प्रा. शाळा पिंपळा बुद्रक ता. तुळजापुर या शिक्षकांना यावर्षी चा आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला असुन कोरोना महामारीचे संकट कमी झाल्यानंतर विविध क्षेञातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा यथोचित गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संस्था सचिव आभिलाष लोमटे यांनी दिली आहे. 
           सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अमित कदम, विशाल थोरात, अतुल जगताप, प्रसाद देशमुख आदीनी आभिनंदन केले.

04 September 2020

कडदोरा येथील शेतकरी पिता पुत्राच्या खुनाचा गुन्हा महावितरण व कंत्राटदारावर दाखल करा - जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार




प्रतिनिधी / उमरगा 

उमरगा तालुक्यातील कडदोरा येथील शेतकरी पिता पुत्राचा महावितरण कंपनीच्या दिरंगाईमुळे विजेच्या धक्याने मृत्यु झाला. या प्रकरणी विद्युत वितरण कंपनी व दोषी अधिकाऱ्यांवर तसेच कंत्राटदारावर खुनाचा गुन्हा दाखल करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार संजय पवार यांना शुक्रवारी ( दि. ४) दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. 
                या निवेदनात म्हणले आहे की, कडदोरा येथील शेतकरी काशिनाथ बाबूजी रनखांब व भीमसेन काशिनाथ रनखांब या पिता पुत्रांनी महावितरण कंपनीकडे ३१ जानेवारी २०१७ रोजी पत्नी श्रीमती विजयाबाई काशिनाथ रनखांब यांच्या नावे वीज जोडणी प्रस्ताव दाखल करून रीतसर शुल्क भरणा केला होता. महावितरण कंपनीच्या तीन वर्षांच्या अक्षम्य दिरंगाईमुळे व टोलवाटोलवी मुळे सदरील शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे पिके जगविण्यासाठी हतबल होऊन स्वतःच वीज वायर जोडत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. महावितरण कंपनीच्या अक्षम्य दिरंगाईमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या महावितरण कंपनी, संबंधीत जबाबदार दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर मयत शेतकरी कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी. सदरील मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानिस महावितरण व प्रशासन जबाबदारी राहील असा ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष संजय पवार, जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन राम जाधव, विधानसभा कार्याध्यक्ष अमोल पाटील, तुकाराम रणखांब, बालाजी रणखांब, प्रदीप बालकुंदे, सरपंच शमशोद्दीन जमादार, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक नेताजी कवठे, प्रताप जाधव, सुभाष गायकवाड, मोहन गायकवाड आदींच्या सह्या आहेत.

01 September 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट



राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट


उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध प्रलंबित विषयाच्या अनुषंगाने केली चर्चा


खासदार सुप्रियाताई सुळे यांचीही घेतली भेट



उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तेरणा साखर कारखाना यासह काही प्रलंबित विषयावर चर्चा करण्यासाठी सोमवारी ( दि ३१) उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. प्रामुख्याने जिल्हयातील रेल्वे प्रश्नावर देखील चर्चा केली. तुळजाभवानी देवस्थान रेल्वे नकाशावर यावे याकरिता सोलापूर ते उस्मानाबाद या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली असून २०१९च्या अर्थसंकल्पात १कोटी रुपयांची तरतूद केली होती परंतु सर्वेक्षणाच्या पुढे काहिच झालेले दिसत नाही. ही बाब साहेबांच्या निदर्शनास आणून दिली व आज संपूर्ण देशात कोराना साथीच्या रोगामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला आहे. ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या कामाचा जास्तीत जास्त भाग राज्य सरकारने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्याची तयारी दर्शवली तर उस्मानाबाद जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचा विकास प्रकल्प मार्गी लागु शकतो. यापुर्वी राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील रेल्वे मार्गासाठी अशा स्वरूपाचे योगदान दिले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गावरील जास्तीत जास्त काम रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यासाठी मान्यता देण्यासाठी  राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील रेल्वेसाठी जे सहकार्य केले त्या धर्तीवर प्रस्ताव सादर करण्यासाठी  राज्य सरकारला विनंतीपुर्वक सुचीत करावे अशी विनंती केली. तसेच तेरणा कारखान्याच्या बाबतीत देखील शेतकरी आणि कामगार आडचणीत असुन भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने सामंजस्य दाखवल्यास तेरणा कारखाना पुढील हंगामात सुरु होऊ शकतो. ज्यामुळे शेतकरी, कामगार आणि जिल्हा बँकेला खुप मदत होऊ शकेल अशी चर्चा केली चर्चेअंती पवार साहेबांनी यामध्ये न्यायालयीन अडचण येणार नसेल तर नक्की तोडगा काढता येईल असे आश्वासन दिले. रेल्वे प्रश्नाबाबत राज्य सरकारला किती आणि कशा स्वरुपात सहभाग नोंदवता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांशी स्वतः चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकहिताचे प्रलंबित प्रश्न पवार साहेबांच्या पुढाकारातून मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. या चर्चेवेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या समवेत अॅड प्रविण यादव उपस्थित होते.



             तेरणा कारखाना विषयावर सुप्रिया ताई सुळे यांच्यासोबत देखील चर्चा झाली. यावेळी निवेदन ही देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर,  अॅड प्रविण यादव, प्रशांत कवडे, सचिन तावडे, शंतनू खंदारे, तौफीक पटेल हे उपस्थित होते.