28 January 2019

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा - विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोहारा प्रतिनिधी -

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा -
विविध कार्यक्रमांचे आयोजन



लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनानिमीत्त प्रशालेत  विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
                या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपालसिंग बायस हे होते. तर ध्वजारोहण मुख्याध्यापक भास्कर बेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. कु. स्नेहा श्रीमंत शिवपुरे हिचा प्रयोग राज्याला निवड झाल्याबद्दल, तेजस प्रशांत सोलंकर हा माध्यमिक शिष्यवृत्तीधारक झाल्याबद्दल तसेच विविध  खेळात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शाळेच्या ग्रंथालयासाठी प्रशालेचा माजी विदयार्थी प्रणव रमेश पुजारी व त्यांच्या वर्गमित्रांकडून ३० हजारांचे पुस्तके आणि इतर साहित्य भेट दिल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
               मुख्य ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी संचलन (परेड), पोवाडा, टिपरी, लेझीम आदी सादर केले. तसेच "लोकसंख्याशिक्षण " ही बालनाटिका सादर करून जनजागृती करण्यात आले.
               यावेळी सरपंच प्रकाश लोखंडे, उपसरपंच दिलीप माळगे, बाळासाहेब पुजारी, अशोक कुनाळे, राजेंद्र सोलंकर, हिराकांत सोलंकर, शिवराज कुनाळे, मल्लिनाथ अष्टगे, अनंतसिंग बायस, जगदीश सुरवसे, माजी सैनिक दयानंद कमळापूरे, सिद्धाण्णा सुरवसे आदींसह स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. राम चंदनशिवे, डॉ . विनोद पाटील, सतिश जाधव, सिद्धेश्वर विभूते, फारूक जमादार, कांचन सुरवसे, मीनाक्षी कदारे, श्री धडड़े सर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सिद्धाराम भालके यांनी केले.

लोहारा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत एरंडी चा संघ विजेता तर लातूर चा संघ उपविजेता

लोहारा प्रतिनिधी -

लोहारा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत एरंडी चा संघ विजेता तर लातूर चा संघ उपविजेता



प्रजासत्ताक दिनानिमित्त लोहारा शहरातील कोब्रा बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान आयोजित भव्य खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत उस्मानाबाद तालुक्यातील एरंडी हा संघ विजेता तर लातुरचा संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघाला प्रथम बक्षीस रोख रक्कम रु. ११००० व चषक, उपविजेत्या संघाला रोख रक्कम रु. ९००० व चषक देण्यात आले.
                  लोहारा येथील कोब्रा बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त लोहारा हायस्कुल च्या मैदानावर व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. शनिवारी ( दि. २६) रात्री ८ च्या सुमारास उद्घाटन झालेल्या या स्पर्धा रविवारी ( दि. २७) दुपारपर्यंत सुरू होत्या. या स्पर्धेत उस्मानाबाद, लातुर, सोलापुर जिल्ह्यासह एकूण ६८ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील अंतिम, उपांत्य सामन्यासह अनेक सामने लक्षवेधी ठरले. अंतिम सामना पाहण्यासाठी शहरातील क्रीडा प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेत विजेता ठरलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील एरंडी संघाला प्रथम बक्षीस रु. ११००० व चषक, तर उपविजेता ठरलेल्या लातुरच्या संघाला द्वितीय बक्षीस रु. ९००० व चषक देण्यात आले. तसेच या स्पर्धेत मुरुड संघाला तृतीय बक्षीस ७००० रु. वचषक, उस्मानाबाद संघाला चतुर्थ बक्षीस ५००० रु, मातोळा अ संघाला पाचवे बक्षीस ३००० रु, मातोळा ब संघाला सहावे बक्षीस २००१ रु, अक्कलकोट संघाला सातवे बक्षीस १००१ रु, कोब्रा संघाला आठवे बक्षीस रु. ५०० देण्यात आले. तर उत्कृष्ट खेळाडु चे बक्षीस ( रु. १००१) व चषक एरंडी संघातील सुजितकुमार याला तसेच उत्कृष्ट नेटमँन चे बक्षीस ( रु. १००१) व चषक साई यांना देण्यात आले.
            या स्पर्धेसाठी कोब्रा बहुउद्वेशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता निर्मळे, उपाध्यक्ष महेश मक्तेदार, प्रताप घोडके, विजय ढगे, गोपाळ सुतार, सुनील देशमाने, सचिन भोसले, खंडू शिंदे, भरत सुतार, शैलेश जट्टे, विनोद लांडगे, चंद्रकांत नांगरे, ओम पाटील, परमेश्वर मुळे, किरण पाटील, शरणांपा कुंभार, अमोल रोडगे, संतोष शेवाळे, अनिल ठेले, नगरसेवक गगन माळवदकर, राजपाल वाघमारे, निहाल मुजावर, मधुकर सुरवसे यांच्या सह प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

27 January 2019

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय येथे दिव्यांग (अपंगत्व) निवारण शस्त्रक्रिया व तपासणी शिबिर





लोहारा प्रतिनिधी -

मी कोणासाठी थोडे काही केले तर त्या बदल्यात मला काय मिळेल असा विचार करणाऱ्या या जगात केवळ निस्वार्थ आरोग्य सेवेचे ब्रीद जोपासणाऱ्या सास्तूरच्या स्पर्श ग्रामीण रुग्णालयाने आरोग्य सेवेमध्ये आपला नवा ‘ स्पर्श पॅटर्न’ निर्माण केला आहे असे गौरवोदगार लोहारा - उमरगाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी काढले. तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय येथे दिव्यांग (अपंगत्व) निवारण शस्त्रक्रिया व तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शनिवारी ( दि. २६) ते बोलत होते.
              या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य सेवा लातूर परिमंडळचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले हे होते. यावेळी डॉ. शिवाजी फुलारी, लंडन येथे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. जॉन क्लेग, सरस्वती प्रतिष्ठान मुंबई सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. मयुरेश वारके, भूलतज्ञ डॉ. प्रमोद काळे, लंडन येथील डॉ. सायमन ह्म्प्री, डॉ. डॅनियल वेस्टा कॉट, डॉ. जामिये मॅक्लेन, मुंबई येथील डॉ. शहबाज अहमद, डॉ. कल्पेश शहा, डॉ. लुबना अहमद, डॉ. हिमांशू बेंद्रे, किर्तीका पी. राव, नायोनिका पाटणकर, रोहन भाल, रचना मेहता, गणेश केळुस्कर, नरेश शेणॅय, नागेश भट्ट, राहुल पटवर्धन, पदमा कपूर, आनंद राणे, मुकेश विसपुते, लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, स्पर्श ग्रामीण रुगणालय सास्तुरचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, निवासी अपंग शाळा सास्तुरचे मुख्याध्यापक बालाजी नादारगे, डॉ मोहन कुरुम, डॉ. सुरज सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी पुढे बोलताना आ. चौगुले म्हणाले की, प्रामाणिक प्रयत्नांना आपुलकीची, तळमळीची जोड असली कि स्पर्श ग्रामीण रुग्नालयासारखे अत्युच्च दर्जाचे जनसेवेचे, लोकसेवेचे कार्य घडते व त्यामुळे गरजू रुग्णांना ते आपले माहेरघर वाटते. त्यामुळे येथील दर्जेदार आरोग्य सेवेसाठी स्पर्शच्या अडी अडचणीसाठी या भागाचा आमदार म्हणून आपले नेहमीच सहकार्य राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
              या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुरचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले. सलग १० वर्ष ९०० च्या वर दिव्यांग बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दिव्यांग बालकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करणाऱ्या डॉ जॉन क्लेग, डॉ. मयुरेश वारके, डॉ. प्रमोद काळे तसेच रोटरी क्लब देवनार, अंबरनाथ, कॉव्हेंट्री लंडन, प्रशांतराव परिचारक फाउंडेशन पंढरपूर यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. या सर्व देवदूतांच्या निस्सीम सेवाभावी वृत्तीमुळेच ग्रामीण भागातील ९०० च्या वर बालकांच्या हातातील काठी बाजूला ठेऊन ते आज आपल्या पायावर चालत, पळत आहेत असे प्रतिपादन त्यांनी केले.
                 तर अध्यक्षीय भाषणात डॉ. माले म्हणाले की, वयाची ७५ वर्ष पूर्ण केल्यानंतरही डॉ. जॉन क्लेग ज्या उत्साहाने दिव्यांगाच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी जे अहोरात्र प्रयत्न करतात, त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे गौरवोदगार डॉ. एकनाथ माले यांनी काढले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्चूत आदटराव यांनी तर आभार डॉ. रहीम पटेल यांनी मानले.
--------------------------------------------------------

या शिबिरदरम्यान दिनांक २६ जानेवारी रोजी १४० दिव्यांग बालकाची तपासणी झाली तर ४५ बालकांवर दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांमध्ये, सी.टी.इ.व्ही, टेडन, लेन्दनिग, अर्थोदेसीस इ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दि. २७ जानेवारी रोजी देखील शस्त्रक्रिया व तपासणी सुरु राहणार आहे.

लोहारा तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लोहारा प्रतिनिधी -

लोहारा तालुक्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  लोहारा शहरातील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण  तहसीलदार राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार रणजित शिराळकर, पंचायत समितीच्या सभापती अश्विनी पाटील, उपसभापती हेमलता रनखांब, पोलीस उपनिरीक्षक गंगाधर दराडे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख, तालुका कृषी अधिकारी एम. बी. बिडबाग यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
            गटशिक्षण कार्यालयाच्या प्रांगणात पं. स.
सभापती अश्विनी पाटील यांच्या हस्ते धव्जारोहण करण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. लोहारा पोलीस ठाण्याचे ध्वजारोहण पोलीस निरीक्षक सर्जेराव भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. लोहारा नगरपंचायतचे ध्वजारोहण नगराध्यक्षा ज्योती दिपक मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, शहरातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचे ध्वजारोहण उपअभियंता एस.जी. माले यांच्या हस्ते करण्यात आले. तालुका कृषी कार्यालयाचे ध्वजारोहन तालुका कृषी अधिकारी एम.बी. बिडबाग यांच्या हस्ते करण्यात आले. लोहारा शहरातील कै. वसंतराव काळे विद्यालयातील ध्वजारोहण नगरसेवक शाम नारायणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूल चा ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्याची भाषणे, कवायत, कलागुण प्रदर्शन, मुलांना खाऊ वाटप आदी कार्यक्रम पार पडले. तसेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम ही संपन्न झाला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला पालक उपस्थित होते. महिलानां स्वतःला सिध्द करण्याची संधी म्हणून त्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक हिरा सोलापुरे, यशोधरा बनसोडे, गजाला सय्यद, अश्विनी कारभारी, मनीषा शिंदे, सुनीता कुंभार, लता पाटील, मनिषा जेवळे, आशा चौरे,    सोमनाथ कुसळकर, सुनिल पवार, नितीन सितापूरे , सुनिल कांबळे, महादेव कांबळे आदी उपस्थित होते. लोहारा खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच शोभा शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लोहारा तालुका ग्रामिण रुग्णावयाचे ध्वजारोहण वैद्यकिय अधिक्षक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामिण पाणीपुरवठा कार्यालयाचे ध्वजारोहन उप अभियंता पी.व्हि. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लोहारा शहरातील हजरत अबुलफता कादरी ऊर्दु प्रायमरी शाळेचे ध्वजारोहण नुर मोमीन यांच्या हस्ते करण्यात आले. लोहारा शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुल चे ध्वजारोहण दत्तात्रय बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. लोहारा तालुक्यातील कास्ती बु. येथील जि.प.कें.प्रा.शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक एम.एन.चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आले.

22 January 2019

श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय उमरगा आयोजित छात्रसेवाकाल शिबीराचे समारोप

श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय उमरगा आयोजित छात्रसेवाकाल शिबीराचे समारोप


लोहारा प्रतिनिधी :

उमरगा येथील श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयाच्या वतीने सिद्धेश्वर विद्यालय कसगी येथे चार दिवसीय छात्रसेवाकाल शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये विद्यार्था करीता विविध उपक्रम घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामकृष्णपंत खरोसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिध्देश्वर शिक्षण संस्थेचे सचिव विठ्ठलराव बदोले हे होते. या शिबीरात अध्यापन कार्य, रक्तदान शिबीर , वृक्षारोपन , पर्यावरण रक्षणासाठी व वाढविण्यासाठी गावातून वृक्षदिंडी काढून पथनाटय सादरीकरण करण्यात आले. क्रिडा विभागामार्फत विविध खेळ घेण्यात आले तसेच सामान्य ज्ञान स्पर्धा घेवून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले. तसेच भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.
          या शिबीराच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला. या  सांस्कृतीक कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग घेवून आपले कलाविष्कार सादर केले. या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून संजय कोथळीकर व व्ही एम सातपुते यांनी काम पाहिले. यावेळी प्राचार्य डॉ. विजय सरपे, मुख्याध्यापक संजय बदोले, जेष्ठ शिक्षक पटणे सर, डॉ. प्रा. कदम पि वाय. कदम, प्रा. बी व्ही. पवार, प्रा. एन.एम. देवकते, प्रा. ए .जेे. लाटे, प्रा. व्ही एम सातपुते, श्रध्दा जाधव, श्रुती चांदुरकर, कुलदीप जाधव आदी उपस्थित होते.
                    या छात्रसेवाकाल शिबीराचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व छात्राध्यापकांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगदीश सुरवसे यांनी तर श्रुती चांदुरकर यांनी आभार मानले.

21 January 2019

भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याचा गाळप शुभारंभ उत्साहात संपन्न

भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याचा गाळप शुभारंभ उत्साहात संपन्न

-------------------------------------------
लोहारा प्रतिनिधी :

भाऊसाहेब बिराजदार कारखान्याच्या उभारणीसाठी वीस वर्ष संघर्षाची वाटचाल करावी लागली. शासकिय भाग भांडवल मिळण्यास झालेला विलंब, कर्ज देण्यासाठी बँकाची उदासिनता आणि मध्यंतरीचे चार - पाच वर्षाच्या दुष्काळामुळे कारखाना सक्षमपणे सुरू करण्यासाठी अडचणी आल्या.  शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सक्षमपणे सुरू ठेवण्यासाठी संचालक मंडळाने क्युनर्जी इंडस्ट्रीजला भाडेतत्वावर दिला. ऊस उत्पादक सभासदांचा ऊस संपेपर्यंत कारखान्याचा गळीत हंगाम सुरू राहिल, शेतकऱ्यांना योग्य दरासह पंधरा दिवसाच्या आत ऊसबीलाची रक्कम पोहच होईल अशी हमी भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी दिली.
             क्युनर्जी इंडस्ट्रीज संचलित समुद्राळ ( ता. उमरगा ) येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी ( ता. २१ ) माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, क्युनर्जी इंडस्ट्रीजचे संचालक सचीन सिनगारे, पृथ्वीराज पाटील, कारखान्याचे अध्यक्ष प्रा. बिराजदार व संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्या वेळी प्रा. बिराजदार बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकुुन गळीत हंगामाचा शुभारंभ झाला. प्रा. बिराजदार पुढे बोलताना म्हणालेे की,  या भागातील शेतकऱ्यांची ऊस पाठविण्यासाठी होणारी फरफट दूर होण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याच्या उभारणीचा संकल्प केला. २००१ पासून कारखान्याच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू झाले. उभारणीदरम्यान अनेक आर्थिक अडचणी आल्या. संचालक मंडळ व शेतकऱ्यांनी शेतजमिनी  गहाण करून साडेचार कोटीचे कर्ज काढले आणि २०१२ मध्ये ऐन दुष्काळाच्या काळात पहिला गळीत चाचणी हंगाम सुरू झाला. त्यानंतर साखरेचेे कमालीचे दर उतरल्याने शेतकऱ्यांना बीलाची रक्कम देणे कठीण झाले. त्यानंतर पाच वर्ष सलग पडलेला दुष्काळ व बंद अवस्थेत वाढलेला व्याजाचा आकडा ,अशा परिस्थितीमूळे संचालक मंंडळाने सक्षम क्युनर्जी इंडस्ट्रीजला कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झाला. आता शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळणार आहे. पंधरा दिवसात ऊसबीलाची रक्कम संबंधित कंपनी देण्यासाठी सक्षम आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यावर वीस वर्ष विश्वास दाखवला असून आता चांगले दिवस आले आहेत, सर्वांचे ऊस घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न रहाणार असल्याचे प्रा. बिराजदार यांनी सांगितले. श्री. सिनगारे म्हणाले की, कारखान्याचा कारभार पारदर्शक रहाणार असून येणाऱ्या काळात इथेनॉल, सहविज निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांचा ऊस घेतला जाईल, शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतिचा ऊस देवून आपल्या हक्काचा कारखाना सक्षम करावा, शेतकऱ्यांनी ऊसाची काळजी घ्यावी, आम्ही चांगल्या दराची नक्कीच काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केलेेे. या वेळी संचालक साहेबराव पाटील यांनी इतर कारखान्यापेक्षा अधिक दर देण्याची अपेक्षा व्यक्त केली.  अडीच हजार मेट्रीक टन गाळप क्षमतेेचा कारखाना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना वहातूक तोडणीसाठी कसलाही त्रास होणार नाही. थोडी सहनशिलता ठेवून सर्वांनी सहकार्य करावे, सर्वांचा ऊस नेण्यात येणार असल्याचे कारखान्याचे सरव्यवस्थापक संजीव गुुरव यांंनी सांगितले. या वेळी उमरगा बाजार समितीचे सभापती एम. ए. सुलतान, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकरराव हराळकर, संचालक गोविंद साळुंके, सुनील माने, देवीदास माडीवाले, माणिकराव बिराजदार, किशोर साठे, इमाम पटेल, पंडीत आळंगे, विठ्ठलराव पाटील, अशोक इंगळे, गोविंद पवार आदींची उपस्थिती होती. या वेळी उमरगा, लोहारा, निलंगा व औसा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. कारखान्याचे संचालक व्यंकट सोनवणे यांनी आभार मानले.

लोहारा येथे भव्य खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

लोहारा प्रतिनिधी -

लोहारा येथे भव्य खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

लोहारा शहरात भव्य खुल्या व्हॉलीबॉल डायरेक्ट (ढकली) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार राहुल पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव भंडारे यांच्या हस्ते होणार आहे.
                    भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन दि. २६ जानेवारी रोजी लोहारा शहरातील कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठनच्या वतीने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लोहारा हायस्कूल शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम बक्षीस ११००० रु, द्वितीय बक्षीस ९००० रु, तृतीय बक्षीस ७००० रु आणि चषक, चतुर्थ बक्षीस ५००० रु आणि चषक, पाचवे बक्षीस ३००० रु आणि चषक, सहावे बक्षीस २००१, सातवे बक्षीस १००१ रु, उत्कृष्ट खेळाडु १००१ रु, उत्कृष्ट नेटमँन १००१ रु बक्षीस ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या संघाला २५१ रु प्रवेश शुल्क ठेवण्यात आला आहे. तरी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुनील देशमाने, प्रथमेश मुळे,गोपाळ सुतार,सचिन भोसले (9673273227) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन कोब्रा बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान यांनी केले आहे.

20 January 2019

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुल चे प्राचार्य शहाजी जाधव यांना महाराष्ट्र राज्य महात्मा फुले शिक्षक परिषदे तर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान


लोहारा प्रतिनिधी -

महाराष्ट्र राज्य महात्मा फुले शिक्षक परिषदे तर्फे दिला जाणारा जिल्हा स्तरीय शिक्षक पुरस्कार लोहारा शहरातील न्यू व्हीजन इंग्लिश स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव यांना प्रदान करण्यात आला. रविवारी (दि. 20) लातूर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
               यावेळी महात्मा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, महापौर सुरेश पवार, उपाध्यक्ष मुरलीधर गोडबोले, राज्य सरचिटणीस इस्माईल शेख, लातूर जि.प.चे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, डॉ. शिवाजीराव जवळगेकर या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार जाधव यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास भोसले, महावीर जाधव, सविता जाधव, दत्तात्रय गायकवाड, डॉ. भास्कर पाटील, युवराज सोनवणे, सिद्धेश्वर सुरवसे, प्रकाश तोडकरी, हारून हेड्डे, विशाल मुनाळे, शंकर जाधव, गणेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. प्राचार्य जाधव यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.