23 July 2019
उमरगा येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षिका वर्षा चौधरी यांचा गौरव
लोहारा प्रतिनिधी -
लोहारा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ई लर्निंग व डिजिटल केल्याबद्दल ज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षिका वर्षा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना एकत्रित करून विद्यार्थ्यांच्या उज्वल आयुष्यासाठी एक प्रेरणा मिळावी या उद्देशाने उमरगा येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व ज्ञानज्योती पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो. या सोहळ्यात लोहारा शहरातील शिक्षिका वर्षा चौधरी यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ई लर्निंग व डिजिटल शाळा केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी याचा लाभ होणार आहे. त्यांच्या या कार्याबद्दल उमरगा येथील ज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी आयोजित एका कार्यक्रमात कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते वर्षा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, बाजार समतीचे सभापती एम.ए. सुलतान, जितेंद्र शिंदे, प्रा.उध्दव सोमवंशी यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
14 July 2019
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त निरीक्षण कार्यक्रम-२०१९ जाहीर
लोहारा प्रतिनिधी -
भारत निवडणूक आयोग दिल्ली यांचे दि. ११ जुलै २०१९ आणि मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांचे दि. १२ जुलै २०१९ च्या पत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त निरीक्षण कार्यक्रम-२०१९ जाहीर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी २०१९ रोजी ज्या मतदारांचे वय १८ वर्षे पूर्ण आहे, परंतु अद्यापही काही कारणास्तव अशा मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याचे राहून गेले असल्यास अशा सर्व मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे आणि मतदार यादीतील मयत, दुबार आणि स्थलांतरीत मतदारांच्या नावांची वगळणी करणे आणि त्या आधारे मतदार यादयांचे शुद्धीकरण करून मतदार यादी दोष विरहित करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. सोमवार दि. १५ जुलै २०१९ रोजी या कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादयांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. उमरगा - लोहारा विधानसभा मतदार संघातील सर्व नागरिकांनी १५ जुलै २०१९ ते ३० जुलै २०१९ या कालावधीत मतदार यादीत नावाची खात्री करावी, दुरुस्ती, नाव समाविष्ट अथवा वगळणी करणे, याबाबत संबधित यादी त्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्याकडे किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोहारा येथे आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी
लोहारा प्रतिनिधी -
आषाढी एकादशी निमित्त शुक्रवारी ( दि. 12) लोहारा ते कानेगाव पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील कानेगाव येथे संत मारुती महाराज यांच्या समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी उस्मानाबाद, लातुर, सोलापूर या जिल्ह्यातून भाविक येतात. आषाढी एकादशी निमित्त लोहारा शहरातील भाविक व हायस्कूल लोहारा यांच्या वतीने या पायी दिंडीची सुरुवात वृक्षरोपण कार्यक्रमाने करण्यात आली.
या पायी दिंडी दरम्यान हरिनामाचा गजर करीत महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी सहदेव काडगावे, नाना पाटील, ओम पाटील, प्रा. राजपाल वाघमारे यांच्या वतीने फळ वाटप करण्यात आले. यावेळी कानेगाव येथील ग्रामस्थांनी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी उपवासाच्या अल्पोपहाराची सोय केली होती. या विद्यार्थ्यांसोबत हायस्कूल लोहारा येथील शिक्षक विठ्ठल वचने, दयानंद पोतदार, बाळासाहेब लांडगे, वैजिनाथ पाटील, सदाशिव बचाटे, शाम पोतदार, वैजिनाथ होळकुंदे, गोपाळ सुतार यांच्यासह प्रवीण संगशेट्टी, मल्लिकार्जुन कलशेट्टी, श्रीशैल्य जट्टे, विरेश स्वामी, शंकर जाधव, बापु कदम, दिपक रोडगे, रोहित काडगावे इत्यादीनी पायी दिंडीत सहभाग नोंदवला.
लोहारा तालुक्यातील होळी येथील जि. प. प्रा. शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिगंबर पवार यांची तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण राठोड यांची निवड
लोहारा प्रतिनिधी -
लोहारा तालुक्यातील होळी येथील जि. प. प्रा. शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिगंबर पवार यांची तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण राठोड यांची निवड करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी शनिवारी ( दि. 13) पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अशोक रोडगे हे होते. यावेळी शिक्षक वनराज सुर्यवंशी यांनी शासन निर्णयाचे वाचन करुन समितीसाठी आवश्यक माहिती दिली. उपस्थित पालकांनी सदस्यांची निवड केली. सदस्य निवडीनंतर एकमताने दिगंबर पवार यांची अध्यक्ष म्हणुन तर लक्ष्मण राठोड यांची उपाध्यक्ष म्हणुन निवड केली.
या शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य म्हणून सुषमा मडूळे, छाया गायकवाड, रोहिणी गायकवाड, अपेक्षा पाटील, विठ्ठल गायकवाड , बळीराम सुरवसे, विठ्ठल जमादार, बजरंग जाधव, केशव सरवदे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नवनिर्वाचित सर्व सदस्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती निवडीप्रसंगी शाळेतील शिक्षक गणेश वाघमारे, प्रमोद माने, सतीश माळी, चंद्रकांत सौदागर, विलास नेलवाडे यांनी परिश्रम घेतले.
Subscribe to:
Posts (Atom)