28 November 2019
उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञानमंच परीक्षेत भारत विद्यालय उमरगा येथील चार विद्यार्थ्यांची निवड
प्रतिनिधी / उमरगा
उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञानमंच परीक्षेत जिल्ह्यातील ३० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात भारत विद्यालय उमरगा येथील चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये सृष्टि, क्षीरसागर, वैष्णवी मुसांडे, माधुरी आगडे, आस्था जोळदापके यांचा समावेश आहे. तर प्रतिक्षा यादीत धनश्री नांगरे हिचा समावेश आहे. विज्ञानमंच परीक्षेत निवड झाल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक शाहूराज जाधव व पर्यवेक्षक विक्रांत मोरे, पर्यवेक्षक संजय देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षक मल्लिकार्जुन लोहार, रेणूका इंगळे, संदीप चव्हाण, व्यंकटेश पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. सदरील विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
27 November 2019
उमरगा - मराठा सोयरिक संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर
प्रतिनिधी / उमरगा
तालुक्यातील मराठा सोयरिक संघटनेची तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली असून खालील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही संघटना कार्य करणार असल्याचे मत तालुका प्रमुख विद्याताई वाघ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
समाजातील विधवा, परितक्ता, आर्थिक दृष्टय़ा दुर्बल, अनाथ अशा मुलींच्या लग्नाला आर्थिक मदत करणे, समाज विकास संस्थेचे मंगल कार्यालय मोफत पुरविणे आदी उद्दिष्ट असल्याचे विद्याताई वाघ यांनी सांगितले तर रेखाताई पवार यांनी वय झालेल्या युवा युवतींचे लग्न जमविण्यावर जास्त भर देण्यात यावा असे मत व्यक्त केले. तसेच हुंडा विरोधी चळवळ सक्रिय करावी असे मत सुवर्णा उगले, सीता सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. आंतरजातीय विवाहास प्राधान्य द्यावे असे मत सारिका लोढे यांनी व्यक्त केले. त्याचसोबत आजपासून तालुक्याचे मध्यवर्ती कार्यालय म्हणून समाज विकास संस्थेचे कार्यालयामध्ये लग्न जुळवनी केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. संघटनेची तालुका कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली. त्याप्रमाणे मराठा सोयरिक संघटनेच्या तालुका प्रमुखपदी विद्या वाघ, कार्याध्यक्ष सीता सुर्यवंशी, उपाध्यक्ष सविता मुळे, सचिव सुवर्णा उगले, खजिनदार सारिका लोंढे, संघटक रेखाताई पवार, प्रचारक सविता मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
भारत विद्यालय उमरगा येथे संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी / उमरगा
उमरगा येथील भारत विद्यालयात मंगळवारी (दि. २६) भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी तात्याराव मोरे (आबा) यांच्या पुतळ्याचे पुजन प्रशालेचे मुख्याध्यापक शाहुराज जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर संविधान दिनानिमित्त राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमचे पुजन प्रशालेचे पर्यवेक्षक विक्रांत मोरे यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सामूहिक संविधान वाचन केले.
संविधान दिनानिमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेत* कु. आकांक्षा कांबळे प्रथम तर कु. प्रतिक्षा चव्हाण द्वितीय आली. तर निबंध स्पर्धेत कु. भाग्यश्री बिराजदार प्रथम तर कु. रुपाली बनसोडे द्वितीय आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शाहुराज जाधव होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकट गुंजोटे यांनी तर आभार हरीबा चव्हाण यांनी आभार मानले. त्यानंतर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक संजय देशमुख, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
26 November 2019
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलमध्ये कौमी एकता सप्ताह साजरा
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलमध्ये सोमवारी ( दि. २५) कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिना निमित्त पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक शहाजी जाधव यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे जीवनचरित्रावर प्रकाश टाकला आणि भारत हा देश विविधतेने नटलेला असुन त्या विविधता गुण्यागोविंदाने हजारो वर्षपासून एकत्र नांदत आहेत त्यासाठी आपण हिंदू, मुस्लिम शीख, इसाई - हम सब है भाई भाई असे म्हणत सर्वांनी एकत्र येऊन आपण भारतीय असल्याचे जगासमोर दाखवून दिले आहे असे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी स्कुलमधील विद्यार्थ्यांनी, पंजाबी, गुजराती, तमिळ आणि महाराष्ट्रातील मराठी, मुस्लिम, कोळी, ब्राह्मण, धनगर, लिंगायत अशा विविध वेशभूषेत येऊन विविधतेतून एकता म्हणजेच कौमी एकता सप्ताह साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक सिद्धेश्वर सुरवसे यांनी तर आभार सविता जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक रामेश्वर पंजरकर, अनंत समदळे, परमेश्वर जाधव, रवींद्र चव्हाण, पूजा दाळिंबकर , हिना सौदागर, शीतल खराडे यांनी परिश्रम घेतले.
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचा संघ मूक अभिनयात तृतीय
पारितोषिक मिळाल्यानंतर संघातील विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाने औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या युवा महोत्सवात 'मुक अभिनय' गटातुन तृतीय क्रमांक पटकावला आहे. हा पुरस्कार देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद व भानुदासराव चव्हाण महाविद्यालय लोहारा यांच्यात विभागुन देण्यात आला. महामहाविद्यालयाने भारुड, मुक अभिनय, समुह गायन, रांगोळी, गोंधळ गीत, वक्तृत्व आदी प्रकारामध्ये सहभाग नोंदवला होता. या पुरस्काराचे वितरण रविवारी (दि. २४) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसार मंडळांचे सरचिटणीस आ. सतिश चव्हाण साहेब, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा.सतिश इंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. डी.एस.बिराजदार, उप प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी, अधिक्षक हंगरगेकर व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सहभागी विद्यार्थी व संघ प्रमुख प्रा. व्यंकट चिकटे, प्रा.अनुसया साठे, प्रा. शितल गायकवाड, प्रा. मेघराज टापरे, प्रा. अशोक भोसले, श्रीकांत वाडीकर, स्वागत जगताप व सहभागी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.
![]() |
| पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारताना विद्यार्थी व संघ प्रमुख |
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाने औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या युवा महोत्सवात 'मुक अभिनय' गटातुन तृतीय क्रमांक पटकावला आहे. हा पुरस्कार देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद व भानुदासराव चव्हाण महाविद्यालय लोहारा यांच्यात विभागुन देण्यात आला. महामहाविद्यालयाने भारुड, मुक अभिनय, समुह गायन, रांगोळी, गोंधळ गीत, वक्तृत्व आदी प्रकारामध्ये सहभाग नोंदवला होता. या पुरस्काराचे वितरण रविवारी (दि. २४) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसार मंडळांचे सरचिटणीस आ. सतिश चव्हाण साहेब, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा.सतिश इंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. डी.एस.बिराजदार, उप प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी, अधिक्षक हंगरगेकर व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सहभागी विद्यार्थी व संघ प्रमुख प्रा. व्यंकट चिकटे, प्रा.अनुसया साठे, प्रा. शितल गायकवाड, प्रा. मेघराज टापरे, प्रा. अशोक भोसले, श्रीकांत वाडीकर, स्वागत जगताप व सहभागी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.
लोहारा - शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
प्रतिनिधी / लोहारा
परतीचा पाऊस व अतीवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी व निराधाराचे मानधन तात्काळ द्यावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसिलदार यांना सोमवारी ( दि. २५) दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
तहसिलदार विजय अवधाने यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, यावर्षी परतीचा पाऊस व अतीवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे सोयाबिन, तुर, मका, द्राक्ष, केळी बागायती पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपये मदत देणे गरजेचे आहे. पण आद्याप कसलीही मदत मिळाली नाही. तसेचे वयोवृध्द,विधवा महीला ,निराधार यांना शासनाकडून मदत दिली जाते. पण तहसिल कार्यालयातील काही कर्मचारी, दलाल या निराधाराना पैशाची मागणी करत त्यांच्याकडून पैसे घेत आहेत. याची चौकशी करुन आठ दिवसाच्या आत या निराधाराचे मानधन त्यांच्या खात्यावर जमा करावे. व शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तहसिल कार्यालयावर शेतकरी, निराधार, वयोवृध्द, विधवा महीलांचा मोर्चा काढण्यात येईल तसेच राष्ट्रीय माहामार्ग आष्टामोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. तरी पुढील परीणामास प्रशासन जबाबदार राहील असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलिम शेख, उपतालुका प्रमुख आमिन कुरेशी, नगरसेवक श्याम नारायणकर, अमिन सुंबेकर, श्रीकांत भरारे, बाळासाहेब कदम, सुरेश दंडगुले, प्रेम लांडगे, सलिम सय्यद, कुलदिप गोरे, कुंडलिक सुर्यवंशी, नितिन जाधव, पोपट सुर्यवंशी, रमेश जाधव, दत्ता मोरे, रोहीत काडगावे, दिलीप लोभे आदीच्या सह्या आहेत.
20 November 2019
भारत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची विभागीय स्पर्धेसाठी निवड
प्रतिनिधी / उमरगा
लोहारा तालुक्यातील माकणी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत भारत विद्यालय उमरगा येथील विद्यार्थी संस्कार विजयकुमार कांबळे व अफवानहुसेन हसन लदाफ ( इयत्ता ९ अ ) या विद्यार्थ्यांची पाणी शुद्धतेसाठी करण्यात येणारे उपाययोजनांचा अभ्यास या विषयावर सादर केलेल्या प्रकल्पाची निवड विभागस्तरीय स्पर्धेसाठी झाली. त्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक शाहूराज जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक विक्रांत मोरे, पर्यवेक्षक संजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. मार्गदर्शक शिक्षक मल्लिकार्जुन लोहार, रेणुका इंगळे, संदीप चव्हाण, व्यंकटेश पाटील यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
16 November 2019
उमरगा येथे शिवसेना शेतकरी मदत केंद्राचा शुभारंभ
प्रतिनिधी / उमरगा
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनाम्यांसाठी मदत करणे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे, आदी कामांसाठी उमरगा तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मेन रोड, उमरगा येथे शुक्रवारी ( दि. १५) शेतकरी मदत केंद्र सुरू करण्यात आले. या शेतकरी मदत केंद्राचा शुभारंभ आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवा नेते किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, जिल्हा परिषद सदस्य शेखर घंटे, जगन पाटील, शरद इंगळे, दत्तू जाधव, योगेश तपसाळे, नागेश पाटील, बाजार समितीचे संचालक हणमंत डावरगे, सुधाकर पाटील, अजित चौधरी, विलास भगत, बलभीम येवते यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या विविध योजना व समस्या याबाबत मदत व मार्गदर्शन सदर केंद्रामार्फत देण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी युवा नेते किरण गायकवाड यांनी कोरेगाव व गुगळगाव येथील किसान सन्मान योजनेपासून अद्याप वंचीत असलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार तहसिल कार्यालयातून माहिती घेतली व
या गावांना भेटी देऊन वंचित शेतकऱ्यांची आवश्यक कागदपत्रे गोळा करून शेतकरी मदत केंद्रामार्फत त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलमध्ये बालदिन साजरा
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलमध्ये गुरुवारी ( दि. १४) भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती ही बालदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी हे होते. या कार्यक्रमासाठी लोहारा येथील न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती जे. आर. राऊत, दिवाणी सह न्यायाधीश ए. ए. बाबर, शिक्षण विस्तार अधिकारी डी. एम.जंगम, श्री समर्थ प्राथमिक आश्रमशाळा येवतीचे शिक्षक एम.पी.कदम, डॉ. रूपाली श्रीगिरे, लोहारा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष के.डी. मोरे, सहाय्यक सरकारी वकील बालाजी जगताप, रामदास जाधव, बालाजी दहातोंडे, सहाय्यक अधिक्षक आर.डी. वाघमारे, पालक प्रतिनिधी चंद्रकांत पाटील, प्रकाश भोसले, प्राचार्य शहाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य व उस्मानाबाद भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. रूपाली श्रीगिरे यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना लोहारा येथील न्यायालयाच्या न्यायाधीश जे. आर. राऊत म्हणाल्या की, बालपण हे अगदी निरागस असते आणि ते दुःख व टेन्शन विसरून आनंदाने जगले पाहिजे. तसेच मोबाईलपासून दूर रहा व भरपूर खेळा. मोठे स्वप्न पहा. अभ्यास, कष्ट व अपार जिद्दीने आयुष्यात यश प्राप्त करा असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
यावेळी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी डी. एम.जंगम म्हणाले की ज्यांना आपला इतिहास माहीत असतो, त्यांचे भविष्य उज्वल असते. त्यानंतर एम.पी. कदम यांनी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या शब्दात मार्गदर्शन करून लागलाय जमाना बदलायला , माझ्या बोटात जादू आहे बघा- बघा-बघा, बालगीत, बडबडगीते, गोष्टी सांगत मुलांशी हितगुज केली व महापुरुषांच्या जीवन चरित्राचे वाचन करण्यास सांगितले. स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव यांनी मुलांच्या भावनेचा विकास म्हणजे खरे शिक्षण होय. आपले जीवन हे गतिमान असून गतिमान जीवनच सर्वांगीण विकास साधते व आज न्याय, शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना एकत्र पाहण्याचा प्रेरणादायी प्रसंग आलेला आहे असे मत मांडले. यानंतर राम पंजरकर यांनी लोकराज्य मासिकातील पं. नेहरू व इंदिरा गांधी यांच्या चरित्रात्मक लेखाचे वाचन केले. शेवटी मान्यवरांच्या व लोहारा विधिज्ञ मंडळाकडून मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सविता जाधव यांनी तर आभार सिद्धेश्वर सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कुलमधील सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
लोहारा तालुक्यातील तोरंबा येथील भाऊसाहेब बिराजदार प्राथमिक शाळेत पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी
प्रतिनिधी / लोहारा
तालुक्यातील तोरंबा येथील भाऊसाहेब बिराजदार प्राथमिक शाळेत गुरुवारी ( दि. १४) पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट बिराजदार यांनी केले. बाल दिनानिमित्त पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी सोमनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. तर अंबादास नाईक यांनी लोकराज्य मासिकाचे वाचन केले. या कार्यक्रमात बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस होता त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेत गॅस कनेक्शन घेऊन शालेय पोषण आहाराची आवश्यकता पूर्ण केली. यामुळे शाळा धुरमुक्त झाली आहे. या गॅस चे पूजन शांता कुंभार यांनी केले. कार्यक्रमासाठी गावातील पालक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एल. एम. बोडरे यांनी तर गुलाब माने यांनी आभार मानले.
12 November 2019
लोहारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी संदर्भात बैठक संपन्न
प्रतिनिधी / लोहारा
जिल्ह्यात पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी एक लाख सभासद नोंदणीची मोहिम राबवून पक्षाची पूनर्बांधणी करण्याचा निर्णय उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घेण्यात आला असून लोहारा तालुक्यातील जास्तीत जास्त सदस्यांनी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केले.
लोहारा येथे रविवारी ( दि. १०) सभासद नोंदणी मोहिमेसंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बिराजदार बोलत होते. या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अच्युत साठे, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, युवराज कदम, बाबासाहेब जाधव, गोविंद बिराजदार, नगरसेवक गगन माळवदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना बिराजदार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी विधानसभा निवडणूकीत ऊन, पावसाची तमा न बाळगता पक्षाचा झंझावात निर्माण करून कार्यकर्त्याचा उत्साह द्विगुणीत केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेहमी बळ देण्याचे काम केले आहे. निवडणूकीपूर्वी जिल्ह्यात पक्षांतराचे वारे होते. यामुळे पक्षात संभ्रम आहे. यामुळे जिल्ह्यात नव्याने एक लाख सभासद नोंदणीची मोहिम राबवून पक्षाची पूनर्बांधणी करण्याचा निर्णय उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घेण्यात आला आहे. पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उस्मानाबाद जिल्ह्यात एक लाख सभासद नोंदणीची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी ०२२४०३७५७७१ या टोल फ्री नंबरवर मिसकॉल करावा. त्यानंतर आलेल्या लिंक वर सदस्य नोंदणीचा फॉर्म भरावा. या मोहिमेत तालुक्यातील जास्तीत जास्त युवक, नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी विजय लोमटे, सरपंच विठ्ठल साठे, हेमंत माळवदकर, गजेंद्र जावळे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, दादा पाटील, नवाज सय्यद, मिलिंद नागवंशी, संजय जाधव, अभिजित लोभे, मंगेश पाटील, शैलेश चंदनशिवे, निहाल मुजावर, महेबूब फकीर, प्रशांत सोमवंशी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
लोहारा येथील डॉ. रूपाली हेमंत श्रीगिरे यांना उस्मानाबाद भुषण पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी / लोहारा
महात्मा कबीर समता परिषदे तर्फे उस्मानाबाद येथे रविवारी ( दि. १०) आयोजित कार्यक्रमात लोहारा येथील डॉ. रूपाली हेमंत श्रीगिरे यांना उस्मानाबाद भूषण या पुरस्काराने शाल, श्रीफळ, ताम्रपत्र, सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले.
डॉ. रूपाली श्रीगिरे यांनी आत्तापर्यंत अनेक प्रसुती अल्पदरात केल्या आहेत. व्यंध्यत्व निवारणासाठी काम केले आहे. तसेच विविध मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महात्मा कबीर समता परिषदेकडून मान्यवरांच्या हस्ते उस्मानाबाद भूषण पुरस्कार देऊन डॉ. श्रीगिरे यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चित्रपट दिग्दर्शक शांतारामजी, कबीर समता परिषदेचे अध्यक्ष मुकुंदराज पाटील, रामकृष्ण बेले, माधव जाधव ,प्रा. डॉ सय्यद अकबर, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. रुपाली श्रीगिरे यांना उस्मानाबाद भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल लोहारा येथील माजी उपसरपंच व्यंकट घोडके, माजी जि.प सदस्य बाबुराव पवार, उत्तमराव पाटील, बी.एस.स्वामी, रघुनाथ घोडके, गणेश हिप्परगेकर ,खंडु सरवदे, जयसिंग बंडगर, अनिल येल्लोरे, किशोर जावळे, पिंटू वैरागकर, कल्पना मिसाळ, उज्वला सुरवसे, सुदर्शन जगताप आदींनी अभिनंदन केले.
Subscribe to:
Posts (Atom)






















