26 June 2020

आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा - राष्ट्रवादी काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी



प्रतिनिधी / लोहारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत गुरुवारी ( दि. २५) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
                 या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या गोपीचंद पडळकर या आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांच्याबद्दल एका वृत्तवाहिनीवर अपशब्द वापरून अवमान केला आहे. पडळकराच्या माध्यमातून भाजपचा मराठा व धनगर समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा हा डाव आहे. आणि तो डाव आम्ही कदापीही यशस्वी होऊ देणार नाही. निव्वळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अपशब्द वापरल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सुनील साळुंके, प्रकाश भगत, गोविंदराव साळुंके, विजय लोमटे, हेमंत माळवदकर, नवाज सय्यद, राजेंद्र कदम, मिलिंद नागवंशी, सचिन रनखांब, विशाल गोरे, किरण पाटील, मनोज देशपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

25 June 2020

मराठवाडा विभागाचे समन्वयक म्हणून लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील माजी पंचायत समिती सभापती असिफ मुल्ला यांची नियुक्ती



प्रतिनिधी / लोहारा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रशिक्षण शिबिराच्या अंमलबजावणी करिता बुधवारी ( दि. २४)  प्रशिक्षण कार्यक्रम राज्य समन्वयक व विभागीय समन्वयकाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात मराठवाडा विभागाचे समन्वयक म्हणून लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील माजी पंचायत समिती सभापती असिफ मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
                    अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा प्रशिक्षण कार्यक्रमाचे राष्ट्रीय समन्वयक सचिन राव यांनी सुरू केलेल्या प्रशिक्षण शिबीराच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार राज्य समन्वयक व विभागीय समन्वयक यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात मराठवाडा विभागाचे समन्वयक म्हणून लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील माजी पंचायत समिती सभापती असिफ मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असिफ मुल्ला यांनी यापूर्वी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम केले आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

23 June 2020

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल सलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधासाठी ८८ हजार ६४५ रुपयांची मदत





प्रतिनिधी / लोहारा

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल सलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधासाठी ८८ हजार ६४५ रुपयांची मदत करण्यात आली आहे. सोमवारी ( दि. २२) शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजर सुमित्रा सिंह यांच्याकडे हा धनादेश सोपविण्यात आला.
           लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल सलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने कोविड १९ या महाराष्ट्रवर आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मदत करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांचा एक दिवसाच्या पगाराची रक्कम एकत्र करून ८८ हजार ६४५ रुपयांचा धनादेश स्टेट बँक ऑफ इंडिया लोहारा शाखेचे मॅनेजर सुमित्रा सिंह यांच्याकडे प्राचार्या उर्मिला पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी प्रा. ज्ञानदेव शिंदे, प्रा. उध्दव सोमवंशी, भास्कर जाधव, सुलोचना रसाळ, पौर्णिमा घोडके, श्रीकांत मोरे, अंकुश शिंदे, बँकेतील सहाय्यक अनिल नरवाडे व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मॅनेजर सुमित्रा सिन्हा यांनी सर्वांचे आभार मानले.

22 June 2020

लोहारा येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते आर्सेनिक अल्बम गोळ्या, फेसशिल्ड, सॅनिटायझरचे वाटप





वाढदिवसाच्या निमित्ताने युवासेना लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांनी राबविला स्तुत्य उपक्रम

प्रतिनिधी / लोहारा

वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून शिवसेना वर्धापनदिन व वाढदिवसाच्या निमित्ताने आर्सेनिक अल्बम गोळ्या, ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम गोळ्या, फेसशिल्ड व सॅनिटायझर तसेच शहरातील व्यापाऱ्यांना आर्सेनिक अल्बम, सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. रविवारी ( दि. २१) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला.

लोहारा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड व आर्सेनिक अल्बम गोळ्या देण्यात आल्या.


                    कोरोनावर लस उपलब्ध नसल्याने प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी एकमेव प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन भारत सरकार आयुष्य मंत्रालयाने प्रतिबंधात्मक औषध म्हणून सुचवलेले अर्सेनिक अल्बम गोळ्या  लोहारा शहरातील प्रत्येक कुटुंबाला वाटप करावे, तसेच लोहारा ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना अर्सेनिक गोळ्या, फेसशील्ड व सॅनिटायजर व शहरातील व्यापाऱ्यांना अर्सेनिक गोळ्या व सॅनीटायजर वाटप करण्याचा एक स्तुत्य विचार युवासेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या मनात आला. त्यामुळे वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून शिवसेना वर्धापन दिन व आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा राबविण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार रविवारी ( दि. २१) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ननागरिकांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम गोळ्या, फेसशिल्ड, तसेच व्यापाऱ्यांना आर्सेनिक अल्बम, सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.

लोहारा शहरातील व्यापाऱ्यांना आर्सेनिक अल्बम, सॅनिटायझर देण्यात आले.
                  

                  यावेळी जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, उस्मानाबाद चे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षय ढोबळे, शिवसेना तालुका प्रमुख मोहन पनुरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक जवळगे, युवासेना लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार, उमरगा युवासेना तालुका प्रमुख अजित चौधरी, तुळजापूर युवासेना तालुका प्रमुख प्रतिक रोचकरी, युवासेनेचे उपतालुका प्रमुख शिवराज चिनगुंडे, नगरसेवक अभिमान खराडे, शाम नारायणकर, अतिक पठाण, जगदीश लांडगे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुधीर घोडके, शहर प्रमुख सलीम शेख, श्रीकांत भरारे, मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष भरत सुतार, दत्ता मोरे, प्रदीप मडुळे यांच्यसह लोहारा उमरगा तालुक्यातील युवासैनिक शिवसैनिक उपस्थित होते. शहरातील प्रत्येक घरात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करणार असल्याचे अमोल बिराजदार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

18 June 2020

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने बिनधास्त बोला हा अभिनव उपक्रम



राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने बिनधास्त बोला हा अभिनव उपक्रम



राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांचा आवाज सर्वदूर पोहोचवण्यासाठी 'बिनधास्त बोल' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विरोधक क्षुद्र राजकारणापायी परीक्षा घेण्याचा आपला दुराग्रह व अट्टहास कायम ठेवत आहेत.

ह्या चक्रव्यूहात अडकलेला एक विद्यार्थी आणि पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? कोरोनाच्या संकटात परीक्षा व्हावी की नको याबाबत तुमचं काय मत आहे? तुमचा आक्रोश, तुमचा असंतोष हे आपण पत्राद्वारे कमीत कमी शब्दात किंवा ३० सेकंद ते २ मिनिटांच्या एका व्हिडीओ मधून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पर्यंत पोहोचवा. आम्ही आपले हे व्हिडीओ एकत्रितपणे कुलाधिपतींकडे पोहोचवून विद्यार्थी आणि पालकांची भूमिका त्यांच्या निदर्शनास आणून देऊ.

आपण आपले व्हिडीओ रविवार, दिनांक २१ जूनपर्यंत खालील क्रमांकांवर व्हाट्सॲप करा किंवा खालील ई-मेल आयडी वर मेल करा. व्हिडीओ 2 मिनिटांपेक्षा अधिक नसावा याची नोंद घ्यावी.

ई-मेल: bolabindas.nsc@gmail.com

अधिक माहितीसाठी संपर्क

Adv.अमोल मातेले - (9892411498)

अमोल हिरे - (9082072090)

स्नेहल कांबळे - (7262883090)

इम्रान तडवी-
(9870626465)

अमित गुप्ता - (9821757668)

Adv.ज्ञानेश्वर गावडे - (8976618004)


राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लोहारा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अभिप्राय अभियानात सहभागी होऊन आपले मत नोंदवा - जिल्हाध्यक्ष सुरेश ( दाजी) बिराजदार



'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' अभियानाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पक्षाचा वटवृक्ष आणखी मजबूत करायचा आहे. म्हणून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानांतर्गत आपला अभिप्राय कळवावा अशी विनंती करतो. पक्षाकडे आपले मत, प्रतिक्रिया, मनोगत कळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. आपले मत पक्षाची पुढील वाटचाल ठरवेल!  -

सुरेश बिराजदार,
जिल्हाध्यक्ष

https://bit.ly/RashtravadiPakshAbhipraay_
#RashtravadiPakshAbhipray

17 June 2020

लोहारा तालुक्यातील जेवळी येथे शेतीशाळा संपन्न





प्रतिनिधी / लोहारा

तालुक्यातील जेवळी येथे सोमवारी ( दि. १५) शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा घेण्यात आली. या शेतीशाळेत बीजप्रक्रिया, पेरणी कशी करावी, निंबोळी अर्क कसे तयार करावे आदी अनेक विषयांवर तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
                    कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील जेवळी येथे शेतीशाळा संपन्न झाली. शेतकऱ्यांना सविस्तर माहिती मिळावी यासाठी कृषी सहाय्यक गणेश बिराजदार यांनी याचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग म्हणाले की, शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच खते वापरावीत. माती परीक्षण अहवालावरून जमिनीचा कस व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण यासोबतच जमीन आम्लधर्मी, क्षारयुक्त किंवा चोपण आहे का याचे निदान करता येते. सोयाबीनचे घरगुती पावसात न भिजलेले बियाणे त्याची उगवनशक्ती तपासून आणि बीजप्रक्रिया करून पेरणीसाठी वापरावे. बीजप्रक्रिया करताना बुरशीजन्य रोगापासून संरक्षणसाठी ५० ग्राम ट्रायकोडर्मा किंवा कार्बोक्सिन + थायरम ३० ग्राम आणि तदनंतर नत्र स्थिरीकरणसाठी रायझोबियम  २५० ग्राम + पीएसबी २५० ग्राम प्रति १० किलो बियाणेस हळुवारपणे चोळावे. तसेच शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी. या पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे हे पेरणीसाठी २० % कमी प्रमाणात लागते. आणि बियाण्याची बचत होते. चार सोयाबीनच्या ओळीनंतर एक सरी सोडल्यास पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाऊस कमी झाल्यास सरीमध्ये पाणी बराच काळ साठुन राहते आणि जरी पाऊस जास्त पडला तरी अतिरीक्त पाणी हे सरीद्वारे बाहेर काढता येते. आंतरमशागत आणि फवारणी ही चांगल्या प्रकारे करता येते. हवा खेळती राहून पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादनात २० % पर्यंत वाढ होते. तसेच सध्या सर्वच शेतकऱ्यांच्या शेतावर निंबोळ्या या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्या सध्या गोळा करून ठेवाव्यात आणि भविष्यात फवारणीसाठी निंबोळी अर्काचा वापर केल्यास फवारणीचा खर्चही कमी होतो आणि रसशोषक किडी आणि आळ्याचे पण नियंत्रण होते. यासाठी ५ किलो निंबोळी ही बारीक कुटून घ्यावी आणि ९ लिटर पाण्यात ही निंबोळीची बुकटी रात्रभर भिजू द्यावी. त्यांनतर दुसऱ्या दिवशी हे द्रावण गाळून घ्यावे. यासोबतच १ लिटर पाण्यात साबणाचा चुरा मिसळून हे दोन्ही द्रावण एकत्र मिसळून घ्यावे. सदरील १० लिटर चे द्रावण (निंबोळी अर्क ९ + साबणाचे १ लिटर) हे 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास सर्वच पिकावरील रसशोषक आळ्या व किडीचे नियंत्रण होण्यास मदत होईल असे मार्गदर्शन बिडबाग यांनी केले.






              या कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहाय्यक गणेश बिराजदार यांनी केले. यावेळी बिराजदार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बियाणे उगवनशक्ती आणि बीजप्रक्रियाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. पोकरा आणि मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीची माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी पोकरा योजनेचे समुह सहाय्यक शिवाजी गायकवाड, प्रशिक्षक विद्या बिराजदार, सहदेव दामाजी भोसले, नागेश आळंगे, बसवेश्वर एकनाथ शिंदे, उमराव माने, अशोक  शिंदे, लक्ष्मण मोरे, ज्योतीराम घोरपडे, कविता भोसले, मनोज हराळे, यादव मोरे, यशवंत चव्हाण आदी अनेक शेतकरी उपस्थित होते.

13 June 2020

लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथे शेतीशाळा संपन्न - तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी शेतकऱ्यांना केले सविस्तर मार्गदर्शन



प्रतिनिधी / लोहारा

तालुक्यातील लोहारा खुर्द येथे शुक्रवारी ( दि. १२) शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा घेण्यात आली. या शेतीशाळेत बीजप्रक्रिया, पेरणी कशी करावी आदी अनेक विषयांवर तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
               कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील लोहारा खुर्द येथे शेतीशाळा संपन्न झाली. शेतकऱ्यांना सविस्तर माहिती मिळावी यासाठी कृषी सहाय्यक नागेश जट्टे यांनी याचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग म्हणाले की, सोयाबीनचे घरगुती पावसात न भिजलेले बियाणे त्याची उगवनशक्ती तपासून आणि बीजप्रक्रिया करून पेरणीसाठी वापरावे. बीजप्रक्रिया करताना बुरशीजन्य रोगापासून संरक्षणसाठी ५० ग्राम ट्रायकोडर्मा किंवा कार्बोक्सिन + थायरम ३० ग्राम आणि तदनंतर नत्र स्थिरीकरणसाठी रायझोबियम  २५० ग्राम + पीएसबी २५० ग्राम प्रति १० किलो बियाणेस हळुवारपणे चोळावे. तसेच शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी. या पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे हे पेरणीसाठी २० % कमी प्रमाणात लागते. आणि बियाण्याची बचत होते. चार सोयाबीनच्या ओळीनंतर एक सरी सोडल्यास पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाऊस कमी झाल्यास सरीमध्ये पाणी बराच काळ साठुन राहते आणि जरी पाऊस जास्त पडला तरी अतिरीक्त पाणी हे सरीद्वारे बाहेर काढता येते. आंतरमशागत आणि फवारणी ही चांगल्या प्रकारे करता येते. हवा खेळती राहून पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादनात २० % पर्यंत वाढ होते. तसेच सध्या सर्वच शेतकऱ्यांच्या शेतावर निंबोळ्या या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्या सध्या गोळा करून ठेवाव्यात आणि भविष्यात फवारणीसाठी निंबोळी अर्काचा वापर केल्यास फवारणीचा खर्चही कमी होतो आणि रसशोषक किडी आणि आळ्याचे पण नियंत्रण होते. यासाठी ५ किलो निंबोळी ही बारीक कुटून घ्यावी आणि ९ लिटर पाण्यात ही निंबोळीची बुकटी रात्रभर भिजू द्यावी. त्यांनतर दुसऱ्या दिवशी हे द्रावण गाळून घ्यावे. यासोबतच १ लिटर पाण्यात साबणाचा चुरा मिसळून हे दोन्ही द्रावण एकत्र मिसळून घ्यावे. सदरील १० लिटर चे द्रावण (निंबोळी अर्क ९ + साबणाचे १ लिटर) हे 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास सर्वच पिकावरील रसशोषक आळ्या व किडीचे नियंत्रण होण्यास मदत होईल असे मार्गदर्शन बिडबाग यांनी केले.



              या कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहाय्यक नागेश जट्टे यांनी केले. यावेळी नागेश जट्टे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बियाणे उगवनशक्ती आणि बीजप्रक्रियाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. पोकरा आणि मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीची माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी शेखर पाटील, पोकरा योजनेचे रमण आगळे, सचिन रसाळ, पोलीस पाटील बिरुदेव सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

02 June 2020

ग्रामपंचायतकडील १५ टक्के मागासवर्गीय निधीमधून ग्रामपंचायत क्षेत्रातील मागासवर्गीय कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा (धान्य वगळता ) पुरवठा करणे बाबत आदेश देऊन मागासवर्गीय कुटुंबांना न्याय द्यावा - ग्रामपंचायत सदस्य प्रविण बोंदाडे यांची मागणी



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायतकडील १५  टक्के मागासवर्गीय निधीमधून ग्रामपंचायत क्षेत्रातील मागासवर्गीय कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा (धान्य वगळता ) पुरवठा करणे बाबत आदेश देऊन मागासवर्गीय कुटुंबांना न्याय द्यावा अशी विनंती तालुक्यातील दक्षिण जेवळीचे ग्रामपंचायत सदस्य प्रविण बोंदाडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे सोमवारी ( दि. १) निवेदनाद्वारे केली आहे.




                   लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात म्हणले आहे की, सध्या कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य आजारामुळे राज्यातील परिस्थिती आपणास माहितच आहे. गेल्या कित्येेक दिवसापासून राज्यात लाॅकडाॅउन पाळण्यात येत आहे. मौजे दक्षिण जेवळी सहित तालुक्यातील सर्वच गावातील मागासवर्गीय लोकांना दररोज मोलमजोरी केल्याशिवाय चुल पेटत नाही. सर्व कामधंदे बंद असल्यामुळे मागासवर्गीय कुटुंबाची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली आहे. काम करण्याची ठिकाणे बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्यांची परिस्थिती हालाकिची व बिकट झाली आहे. राज्यात लाॅकडाॅउनची घोषणा झाल्यापासून ते आजपर्यत सर्वांच्या घरामध्ये असणारे पैसे व किराणा सामान संपले असून फक्त शासनाने गेल्या काही दिवसापूर्वी दिलेला गहू व तांदूळ काही प्रमाणात शिल्लक असेल. धान्य वगळता घरामध्ये लागणारे इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी एक पैसा देखिल मागासवर्गीय कुटुंबाकडे शिल्लक राहिलेला नाही. वरिल विषयास अनूसरूण कोविड -१९ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हाणून जिवनावश्यक वस्तूंच्या वाटपाबाबत तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीकडे १५ टक्के (अनुषेश पाहून) मागासवर्गीय निधिमधून ग्रामपंचायत क्षेत्रातील मागासवर्गीय कुटुंबांना धान्य वगळता इतर जिवनावश्यक वस्तूंचा (तेल, साखर, दाळी, शेंगदाणे ,साबण, चहा, मिठ, तिखट ई.) पुरवठा संबंधित ग्रामपंचायत मधील १५ टक्केचा अनुषेश पाहून खर्च करण्यात यावा असा आदेश आपण लोहारा तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींना काढून मागासवर्गीय कुटुंबांना न्याय दयावा अशी विनंती दक्षिण जेवळी चे ग्रामपंचायत सदस्य प्रविण बळीराम बोंदाडे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

01 June 2020

लोहारा तालुक्यातील नागराळ ( लो) येथील पोलीस पाटील तानाजी माटे यांचा रिअल कोरोना फायटर पुरस्काराने गौरव



उस्मानाबाद / प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील नागराळ ( लो) येथील पोलीस पाटील तानाजी माटे यांना रिअल कोरोना फायटर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. श्री शंकर बाबा सेवा प्रतिष्ठान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मारुती पवार यांनी याबाबत सन्मानपत्र पाठवले आहे. याबद्दल पोलीस पाटील तानाजी माटे यांचे अभिनंदन होत आहे.



               लोहारा तालुक्यातील नागराळ (लो) येथील पोलिस पाटील तानाजी माटे यांनी कोविड १९ अर्थात कोरोना विषाणूच्या महामारित उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ- मुंडे यांनी परित केलेले आदेश जनसामान्यांपर्यंत पोहचवले. उमरगा उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, लोहाऱ्याचे तहसीलदार विजय अवधाने, पोलीस निरीक्षक अशोक चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन, प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमबजावणी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.  लॉकडाऊन, फिजिकल डिस्टनसिंग, इतर राज्यातून, परजिल्ह्यातून गावी आलेल्या व्यक्तींच्या नोंदी ठेवणे, त्यांना वैद्यकीय तपासणी करून घेण्यास प्रवृत्त करणे, त्यांचे अलगिकरण करणे आदी कामे पुढाकार घेऊन केल्यामुळे श्री शंकर बाबा सेवा प्रतिष्ठान ट्रस्टचे मारुती पवार, डॉ. लताजी महतो यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन पोलिस पाटील तानाजी माटे यांना रिअल कोरोना फायटर हा पुरस्कार दिला आहे. याबाबत सन्मानपत्र पाठवण्यात आले आहे. नागराळ (लो) येथील सरपंच रितू गोरे, उपसरपंच गुंडू जाधव, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दगडू भरगांडे यांच्यासह ग्रामस्थ व मित्र परिवाराने पोलीस पाटील तानाजी माटे यांचे अभिनंदन केले आहे.