26 March 2020

लोहारा - तालुक्यातील हराळी गावात कोरोना रोखण्यासाठी युवक, ग्रामपंचायत, प्रशासन व आरोग्य विभाग यांचा एकत्रीत लढा



प्रतिनिधी / लोहारा

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याबरोबर च ग्रामस्तरावर ही उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील हराळी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तरुणांची टीम, ग्रामपंचायत कार्यालय व प्रशासना मधिल लोहारा तालुक्याचे तहसीलदार विजय आवधाने यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संतोष मनाळे, आरोग्य सेवक अजय रनखांब, सरप्ंच बलभीम सूर्यवंशी, ग्रामसेवक एस.एम.मुंढे, पोलीस पाटील नितीन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सचिन सूर्यवंशी, दगडू हासुरे, कालिदास सूर्यवंशी, नेताजी काशिनाथ सूर्यवंशी, किसन सूर्यवंशी, संतोष मोरे, सुनिल रनखांब, अतुल बिराजदार, आशा कार्यकर्ता संध्या कारभारी, ग्रामपंचायतचे सेवक रवी ढोबळे  यांच्या माध्यमातून पुणे, मुबंई व इतर बाहेर गावातून आलेल्या नागरिकांची भेट घेवून त्यांची नाव नोंदणी व प्राथमिक तपासणी केली जात आहे.





तालुक्यातील हराळी गावात आरोग्यवर्धिनी केंद्र तोर्ंबा,  प्रा.आ.केंद्र माकणी, लोहारा ब्लॉक यांच्या वतीने बाहेरुन येणाऱ्या सर्व व्यक्तींची आरोग्य तपासणी केली जात आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासुन गावात कोरोना विषाणू जनजागृती माहिती पत्रक, घरोघरी जाऊन स्वच्छता ठेवणे, आरोग्य सल्ला इ. विषयी जनजागृती करण्यात आली. तसेच पुणे, मुंबई व बाहेरुन आलेल्या गावातील ग्रामस्थांच्या दररोज भेटी घेवून त्यांच्या आरोग्याविषयी चौकशी, सल्ला व घ्यावयाच्या काळजी विषयी माहिती देण्यात येत आहे. दि. २४ मार्च आखेरपर्यंत ११२ बाहेरून आलेल्या ग्रामस्थांची नोंद व तपासणी करण्यात आली आहे. या मधिल सर्व व्यक्तीचा रिपोर्ट नॉर्मल आले आहेत.




  गावातील विशेष काळजी म्हणुन किराणा दुकानासमोर प्रत्येक व्यक्तिमध्ये  १ मीटर अंतर राहील याचे नियोजन करुन प्रत्यक्ष अमंलबजावणी सुरु आहे. तसेच किराणा दुकान गावात सकाळी २ तास व संध्याकाळी २ तास उघडे ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गावातील सर्व सार्वजनीक ठिकाणी फवारणी करुन निर्जंतुकीकरण (Sodium Hypochloride Solution) करण्याची व्यवस्था केली आहे. यात बस स्टँड, मंदिर, मस्जिद, ग्रामपंचायत, शाळा इ. सार्वजनीक ठिकाणी फवारणी केली आहे. तसेच हराळीच्या चौकामध्ये दररोज संध्याकाळी माईकचा वापर करुन घरोघरी दरवाज्या मध्ये साबण व पाणी ठेवून नियमित स्वच्छ हात, पाय  धुवून आरोग्याची काळजी घ्यावी. घराबाहेर विनाकारण कोणीही बाहेर पडू नये, आपल्या स्वताःची काळजी घ्यावी. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन केले जात आहे.

            तोरंबा येथील आरोग्य उपकेंद्राअंतर्गत ३ गाव आहेत. त्यात हराळी, करवंजी व तोरंबा गावचा समवेश आहे. यात कर्मचारी यांची संख्या कमी म्हणजे फक्त समुदाय आरोग्य आधिकारी व आरोग्य सेवक यांच्या कडेच पुर्ण जबाबदारी आसून देखील तिन्ही गावात उत्तम नियोजन करुन प्रत्यक्ष अमंलबजावणी सुरु आहे. सध्या यांचे काम पाहून दिवस रात्र त्यांची धडपड पाहून तिन्ही गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment