लोहारा प्रतिनिधी -
शिक्षकांनी सुशिक्षित पिढी घडविण्यापेक्षा सुसंस्कृत पिढी घडवुन आपला समाज व देश सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन आ. ज्ञानराज चौगुले यांनी केले. लोहारा शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुलच्या वार्षिक स्नेह समेलन व बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा ज्योती मुळे, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे, शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, प्राचार्य शहाजी जाधव, नगरसेवक शाम नारायणकर, श्रीनिवास माळी, गगन माळवदकर, नगरसेविका आरती गिरी सुनिता ढगे, माजी उपनगराध्यक्षा सौ. नाजमिन शेख, नगरसेविका निर्मला स्वामी, माजी जि.प. सदस्या मिरा फुलसुंदर, सोलापुर येथील लावण्यखणी कलाकार सोनी सोलापुरकर, ज्योती मिरजकर, संस्थाध्यक्ष डॉ. सुहास भोसले, संचालिका माधुरी चोबे, दिपक मुळे, श्रीकांत भरारे, शिवराज झिंगाडे, सुरेखा भोसले, दत्तात्रय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विर जवानाना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आ. ज्ञानराज चौगुले यांनी या स्कुलसाठी दोन संगणक भेट देत असल्याचे जाहिर केले. या नंतर सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांनी विविध गितांवर बहारदार नृत्य सादर करुन भारतीय विर जवानाना मानवंदना दिली. स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या, अशा सामाजिक विषयावर एकांकीका नाटिका सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. तसेच मराठी, हिंदी आदी विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सविता जाधव यांनी तर आभार प्रकाश तोडकरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिध्देश्वर सुरवसे, हारुण हेड्डे, विशाल मुनाळे, रवि चव्हाण, वर्षा शेवाळे, वैशाली जाधव, अनुराधा बंडगर, वर्षा घोडके, ललीता रोडगे, प्रणिता जाधव, सोनाली राठोड,
चांदबी चाऊस, सुवर्णा पाटील आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शहर व परिसरातील नागरीक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



No comments:
Post a Comment