04 April 2019

लोहारा - महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी महेश कुंभार तर उपाध्यक्षपदी ओम पाटील यांची निवड

अध्यक्ष

उपाध्यक्ष



लोहारा प्रतिनिधी -

महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी महेश कुंभार तर  उपाध्यक्षपदी ओम पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
                लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात माधवराव वकिल यांच्या अध्यक्षतेखाली लिंगायत समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी महेश कुंभार, उपाध्यक्षपदी ओम पाटील व परमेश्वर चिकटे, सचिवपदी मंगेश बनशेट्टी, बबलु यल्लोरे, मिरवणुक प्रमुख प्रथमेश मुळे, महेश चपळे, प्रसिध्दी प्रमुख म्हणून संतोष फावडे यांची निवड करण्यात आली. या बैठकीस दिपक मुळे, बाळासाहेब कोरे, हरी लोंखडे, शिवा स्वामी, मल्लिनाथ घोंगडे, सतिश जट्टे, गणेश कमलापुरे, सचिन तोडकरी, गणेश पालके, कपिल माशाळकर, बाळू माशाळकर, रामेश्वर वैरागकर, सहदेव काडगावे, पप्पु तोडकरी, ओम बिराजदार, विशाल मिटकरी, रामेश्वर काडगावे, अमोल तोडकरी, रामू मिटकरी आदीसह समाजबांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment