02 April 2019
जिल्हा परीषद लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अरुण सारंग यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सत्कार
लोहारा प्रतिनिधी -
कळंब येथील जिल्हा परीषद लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अरुण सारंग हे सेवानिवृत्ती झाल्याबद्दल लोहारा येथे सोमवारी ( दि. 1) त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अरुण सारंग हे मागील अनेक वर्षांपासून लोहारा येथे कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची कळंब येथे बदली झाली. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सोमवारी कार्यक्रम घेण्यात आला व त्यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंधारण अधिकारी ई. टी. सुर्यवंशी हे होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, छाया सारंग, कनिष्ठ अभियंता संगमकर, एच.जी.गडेराव, पी.एस.कुलकर्णी, एस. व्ही. शिंदे, सी.बी. कदम, नेताजी शिंदे, अमोल कसार, सौरव जगताप, प्रनिता कटकधोंड, सोनाली वाघमारे, दिपक रणखांब आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment