20 May 2019
लोहारा येथे संभाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन
लोहारा प्रतिनिधी -
लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी ( दि. 21) छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांनी केले आहे.
लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षीही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी मुख्याध्यापक उत्तम सूर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत. याच कार्यक्रमात शिवव्याख्याते अमोल मिटकरी यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच उमरगा तहसिलदार संजय पवार, भोकर चे तहसीलदार भरत सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, सामाजिक कार्यकर्ते अशोकराजे सरवदे, डॉ. रोहित साळुंके या मान्यवरांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नेताजी गोरे, डॉ. संदीप तांबारे, प्रकाश धस, अतुल गायकवाड, अर्चना अंबुरे, किरण गायकवाड, प्रकाश भगत, शिवाजी कदम, प्रताप पाटील, भास्कर वैराळे, विजय लोमटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मंगळवारी ( दि. 21) सायंकाळी 6 वाजता लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment