23 May 2019

लोहारा - छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव उत्साहात संपन्न - मराठा भूषण पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण





लोहारा प्रतिनिधी -

लोहारा तालुका  संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी  देण्यात येणाऱ्या 'मराठा भूषण' पुरस्काराचे वितरण मंगळवारी (दि. 21) मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. यावेळी शिवव्याख्याते अमोल मिटकरी यांचे व्याख्यान झाले.
               लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी ( दि. 21) रात्री आठ च्या सुमारास हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार हे होते. यावेळी नगराध्यक्षा ज्योती मुळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक उत्तम सूर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अर्चना अंबुरे, बब्रुवान पाटील, नेताजी गोरे, डॉ. संदीप तांबारे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, अतुल गायकवाड, वंदना भगत, रंजना हासुरे, नागण्णा वकील, आबासाहेब साळुंके, जालिंदर कोकणे, पोलिस निरीक्षक सर्जेराव भंडारे, शिवाजी कदम, अॅड. दादासाहेब पाटील, किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
             लोहारा तालुका संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी 'मराठा भूषण' पुरस्कार देण्यात येतो. यावेळी तहसीलदार संजय पवार (उमरगा), तहसीलदार भरत सूर्यवंशी ( भोकर), विभागीय पोलिस अधिकारी  राहुल धस (उमरगा), अशोकराजे सरवदे (सास्तूर), डॉ. रोहित साळुंके (कोलीकट) या पाच जणांना शिवव्याख्याते अमोल मिटकरी यांच्या हस्ते मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील साळुंके यांनी केले. सूत्रसंचालन व आभार मोहन जाधव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महादेव वाघमारे, प्रकाश भगत, संतोष पवार, श्रीकांत गोरे, बालाजी सरवदे, भास्कर वैराळे, प्रताप पाटील, दयानंद थोरात, विजय लोमटे, डॉ. चंद्रशेखर गायकवाड, जगदीश पाटील, कृष्णाथ साठे, संजय जाधव, गोपाळ माने, मनोज देशपांडे, शैलेश चंदनशिवे, तानाजी मातोळे, विशाल मातोळे, योगेश बिराजदार, धनराज बिराजदार, लक्ष्मण बिराजदार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment