प्रतिनिधी / लोहारा
सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोबाईल एटीएम व्हॅनच्या माध्यमातून तालुक्यातील सालेगाव येथे गुरुवारी ( दि.२३) जवळपास १९ लाख रुपये पीक विमा वाटप करण्यात आला. या उपक्रमाचे शेतकऱ्यांतून कौतुक केले जात आहे.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सध्या गावागावात जाऊन पीक विमा दिला जात आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना बँकेतील पैसे काढण्यासाठी अडचणी येत होत्या. सध्या अडचणीच्या काळात बँकेच्या मोबाईल एटीएम व्हॅनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन विमा देण्याची संकल्पना बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार यांना सुचली. या संकल्पनेनुसार त्यांनी विमा वाटप करण्याच्या सूचना दिल्या. तालुक्यातील सालेगाव येथे गुरुवारी ( दि. २३) बँकेच्या एटीएम व्हॅनच्या माध्यमातून जवळपास १५० खतेदारांना १९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शासनाच्या वतीने सांगण्यात आलेल्या सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करत हे वाटप करण्यात आले. कोरोना सारख्या संकटाच्या काळात लोकांना आपल्या गावात पीक विम्याचे वाटप झाल्यामुळे लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी शाखा व्यवस्थापक बालाजी सगर, इन्स्पेक्टर दिलीप जाधव, आलिम अत्तार, गोविंद साळुंके, गोविंद बिराजदार, सुनिल साळुंके उपस्थित होते. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात ही रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



No comments:
Post a Comment