02 August 2020

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे वीज पडून बैल ठार



प्रतिनिधी / लोहारा

शनिवारी ( दि. १) दुपारी झालेल्या पावसात वीज पडून बैल ठार झाल्याची घटना तालुक्यातील कानेगाव येथे घडली आहे.
                 याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील कानेगाव येथील वैजिनाथ गणपती कुंभार हे शनिवारी ( दि.१) त्यांच्या बैलजोडीने सुगलाबाई जावळे यांच्या शेतात पेरणी करत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. यादरम्यान एका बैलावर वीज कोसळून बैल ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच तलाठी बालाजी कांबळे, पोलीस पाटील सुखराज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बैलपोळा सण काही दिवसांवर असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment