01 August 2020
लोहारा येथील दत्ताजी जावळे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेच्या राज्य सल्लागार सदस्यपदी निवड
प्रतिनिधी / लोहारा
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेच्या राज्य सल्लागार सदस्यपदी लोहारा येथील दत्ताजी वसंतराव जावळे यांची निवड झाली आहे. या संस्थेचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी दत्ताजी जावळे यांच्य कार्याची दखल घेत संस्थेच्या राज्यकार्यकारिणीत सल्लागार सदस्यपदी निवड केली आहे. सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे. आपण आपले बुद्धिकौशल्य वापरून राष्ट्रहित व समाजहित जोपासत पर्यावरणपूरक कार्य करावे असे आवाहन संस्थेच्या वतीने दिलेल्या नियुक्तीपत्रात केले आहे. या निवडीबद्दल दत्ताजी जावळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment