14 July 2019
लोहारा येथे आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी
लोहारा प्रतिनिधी -
आषाढी एकादशी निमित्त शुक्रवारी ( दि. 12) लोहारा ते कानेगाव पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील कानेगाव येथे संत मारुती महाराज यांच्या समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी उस्मानाबाद, लातुर, सोलापूर या जिल्ह्यातून भाविक येतात. आषाढी एकादशी निमित्त लोहारा शहरातील भाविक व हायस्कूल लोहारा यांच्या वतीने या पायी दिंडीची सुरुवात वृक्षरोपण कार्यक्रमाने करण्यात आली.
या पायी दिंडी दरम्यान हरिनामाचा गजर करीत महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी सहदेव काडगावे, नाना पाटील, ओम पाटील, प्रा. राजपाल वाघमारे यांच्या वतीने फळ वाटप करण्यात आले. यावेळी कानेगाव येथील ग्रामस्थांनी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी उपवासाच्या अल्पोपहाराची सोय केली होती. या विद्यार्थ्यांसोबत हायस्कूल लोहारा येथील शिक्षक विठ्ठल वचने, दयानंद पोतदार, बाळासाहेब लांडगे, वैजिनाथ पाटील, सदाशिव बचाटे, शाम पोतदार, वैजिनाथ होळकुंदे, गोपाळ सुतार यांच्यासह प्रवीण संगशेट्टी, मल्लिकार्जुन कलशेट्टी, श्रीशैल्य जट्टे, विरेश स्वामी, शंकर जाधव, बापु कदम, दिपक रोडगे, रोहित काडगावे इत्यादीनी पायी दिंडीत सहभाग नोंदवला.
Subscribe to:
Post Comments (Atom)



No comments:
Post a Comment