23 July 2019

उमरगा येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षिका वर्षा चौधरी यांचा गौरव



लोहारा प्रतिनिधी -

लोहारा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ई लर्निंग व डिजिटल केल्याबद्दल ज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षिका वर्षा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
       ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी व  विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना एकत्रित करून विद्यार्थ्यांच्या उज्वल आयुष्यासाठी एक प्रेरणा मिळावी या उद्देशाने उमरगा येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व ज्ञानज्योती पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो. या सोहळ्यात लोहारा शहरातील शिक्षिका वर्षा चौधरी यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ई लर्निंग व डिजिटल शाळा केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी याचा लाभ होणार आहे. त्यांच्या या कार्याबद्दल उमरगा येथील ज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी आयोजित एका कार्यक्रमात कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते वर्षा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, बाजार समतीचे सभापती एम.ए. सुलतान, जितेंद्र शिंदे, प्रा.उध्दव सोमवंशी यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment