लोहारा प्रतिनिधी -
भारत निवडणूक आयोग दिल्ली यांचे दि. ११ जुलै २०१९ आणि मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांचे दि. १२ जुलै २०१९ च्या पत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त निरीक्षण कार्यक्रम-२०१९ जाहीर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी २०१९ रोजी ज्या मतदारांचे वय १८ वर्षे पूर्ण आहे, परंतु अद्यापही काही कारणास्तव अशा मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याचे राहून गेले असल्यास अशा सर्व मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे आणि मतदार यादीतील मयत, दुबार आणि स्थलांतरीत मतदारांच्या नावांची वगळणी करणे आणि त्या आधारे मतदार यादयांचे शुद्धीकरण करून मतदार यादी दोष विरहित करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. सोमवार दि. १५ जुलै २०१९ रोजी या कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादयांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. उमरगा - लोहारा विधानसभा मतदार संघातील सर्व नागरिकांनी १५ जुलै २०१९ ते ३० जुलै २०१९ या कालावधीत मतदार यादीत नावाची खात्री करावी, दुरुस्ती, नाव समाविष्ट अथवा वगळणी करणे, याबाबत संबधित यादी त्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्याकडे किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment