![]() |
| पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारताना विद्यार्थी व संघ प्रमुख |
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाने औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या युवा महोत्सवात 'मुक अभिनय' गटातुन तृतीय क्रमांक पटकावला आहे. हा पुरस्कार देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद व भानुदासराव चव्हाण महाविद्यालय लोहारा यांच्यात विभागुन देण्यात आला. महामहाविद्यालयाने भारुड, मुक अभिनय, समुह गायन, रांगोळी, गोंधळ गीत, वक्तृत्व आदी प्रकारामध्ये सहभाग नोंदवला होता. या पुरस्काराचे वितरण रविवारी (दि. २४) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसार मंडळांचे सरचिटणीस आ. सतिश चव्हाण साहेब, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा.सतिश इंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. डी.एस.बिराजदार, उप प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी, अधिक्षक हंगरगेकर व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सहभागी विद्यार्थी व संघ प्रमुख प्रा. व्यंकट चिकटे, प्रा.अनुसया साठे, प्रा. शितल गायकवाड, प्रा. मेघराज टापरे, प्रा. अशोक भोसले, श्रीकांत वाडीकर, स्वागत जगताप व सहभागी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.


No comments:
Post a Comment