02 June 2020
ग्रामपंचायतकडील १५ टक्के मागासवर्गीय निधीमधून ग्रामपंचायत क्षेत्रातील मागासवर्गीय कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा (धान्य वगळता ) पुरवठा करणे बाबत आदेश देऊन मागासवर्गीय कुटुंबांना न्याय द्यावा - ग्रामपंचायत सदस्य प्रविण बोंदाडे यांची मागणी
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायतकडील १५ टक्के मागासवर्गीय निधीमधून ग्रामपंचायत क्षेत्रातील मागासवर्गीय कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा (धान्य वगळता ) पुरवठा करणे बाबत आदेश देऊन मागासवर्गीय कुटुंबांना न्याय द्यावा अशी विनंती तालुक्यातील दक्षिण जेवळीचे ग्रामपंचायत सदस्य प्रविण बोंदाडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे सोमवारी ( दि. १) निवेदनाद्वारे केली आहे.
लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात म्हणले आहे की, सध्या कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य आजारामुळे राज्यातील परिस्थिती आपणास माहितच आहे. गेल्या कित्येेक दिवसापासून राज्यात लाॅकडाॅउन पाळण्यात येत आहे. मौजे दक्षिण जेवळी सहित तालुक्यातील सर्वच गावातील मागासवर्गीय लोकांना दररोज मोलमजोरी केल्याशिवाय चुल पेटत नाही. सर्व कामधंदे बंद असल्यामुळे मागासवर्गीय कुटुंबाची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली आहे. काम करण्याची ठिकाणे बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्यांची परिस्थिती हालाकिची व बिकट झाली आहे. राज्यात लाॅकडाॅउनची घोषणा झाल्यापासून ते आजपर्यत सर्वांच्या घरामध्ये असणारे पैसे व किराणा सामान संपले असून फक्त शासनाने गेल्या काही दिवसापूर्वी दिलेला गहू व तांदूळ काही प्रमाणात शिल्लक असेल. धान्य वगळता घरामध्ये लागणारे इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी एक पैसा देखिल मागासवर्गीय कुटुंबाकडे शिल्लक राहिलेला नाही. वरिल विषयास अनूसरूण कोविड -१९ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हाणून जिवनावश्यक वस्तूंच्या वाटपाबाबत तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीकडे १५ टक्के (अनुषेश पाहून) मागासवर्गीय निधिमधून ग्रामपंचायत क्षेत्रातील मागासवर्गीय कुटुंबांना धान्य वगळता इतर जिवनावश्यक वस्तूंचा (तेल, साखर, दाळी, शेंगदाणे ,साबण, चहा, मिठ, तिखट ई.) पुरवठा संबंधित ग्रामपंचायत मधील १५ टक्केचा अनुषेश पाहून खर्च करण्यात यावा असा आदेश आपण लोहारा तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींना काढून मागासवर्गीय कुटुंबांना न्याय दयावा अशी विनंती दक्षिण जेवळी चे ग्रामपंचायत सदस्य प्रविण बळीराम बोंदाडे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment