01 June 2020
लोहारा तालुक्यातील नागराळ ( लो) येथील पोलीस पाटील तानाजी माटे यांचा रिअल कोरोना फायटर पुरस्काराने गौरव
उस्मानाबाद / प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील नागराळ ( लो) येथील पोलीस पाटील तानाजी माटे यांना रिअल कोरोना फायटर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. श्री शंकर बाबा सेवा प्रतिष्ठान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मारुती पवार यांनी याबाबत सन्मानपत्र पाठवले आहे. याबद्दल पोलीस पाटील तानाजी माटे यांचे अभिनंदन होत आहे.
लोहारा तालुक्यातील नागराळ (लो) येथील पोलिस पाटील तानाजी माटे यांनी कोविड १९ अर्थात कोरोना विषाणूच्या महामारित उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ- मुंडे यांनी परित केलेले आदेश जनसामान्यांपर्यंत पोहचवले. उमरगा उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, लोहाऱ्याचे तहसीलदार विजय अवधाने, पोलीस निरीक्षक अशोक चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन, प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमबजावणी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. लॉकडाऊन, फिजिकल डिस्टनसिंग, इतर राज्यातून, परजिल्ह्यातून गावी आलेल्या व्यक्तींच्या नोंदी ठेवणे, त्यांना वैद्यकीय तपासणी करून घेण्यास प्रवृत्त करणे, त्यांचे अलगिकरण करणे आदी कामे पुढाकार घेऊन केल्यामुळे श्री शंकर बाबा सेवा प्रतिष्ठान ट्रस्टचे मारुती पवार, डॉ. लताजी महतो यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन पोलिस पाटील तानाजी माटे यांना रिअल कोरोना फायटर हा पुरस्कार दिला आहे. याबाबत सन्मानपत्र पाठवण्यात आले आहे. नागराळ (लो) येथील सरपंच रितू गोरे, उपसरपंच गुंडू जाधव, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दगडू भरगांडे यांच्यासह ग्रामस्थ व मित्र परिवाराने पोलीस पाटील तानाजी माटे यांचे अभिनंदन केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment