वाढदिवसाच्या निमित्ताने युवासेना लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांनी राबविला स्तुत्य उपक्रम
प्रतिनिधी / लोहारा
वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून शिवसेना वर्धापनदिन व वाढदिवसाच्या निमित्ताने आर्सेनिक अल्बम गोळ्या, ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम गोळ्या, फेसशिल्ड व सॅनिटायझर तसेच शहरातील व्यापाऱ्यांना आर्सेनिक अल्बम, सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. रविवारी ( दि. २१) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला.
![]() |
| लोहारा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड व आर्सेनिक अल्बम गोळ्या देण्यात आल्या. |
कोरोनावर लस उपलब्ध नसल्याने प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी एकमेव प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन भारत सरकार आयुष्य मंत्रालयाने प्रतिबंधात्मक औषध म्हणून सुचवलेले अर्सेनिक अल्बम गोळ्या लोहारा शहरातील प्रत्येक कुटुंबाला वाटप करावे, तसेच लोहारा ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना अर्सेनिक गोळ्या, फेसशील्ड व सॅनिटायजर व शहरातील व्यापाऱ्यांना अर्सेनिक गोळ्या व सॅनीटायजर वाटप करण्याचा एक स्तुत्य विचार युवासेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या मनात आला. त्यामुळे वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून शिवसेना वर्धापन दिन व आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा राबविण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार रविवारी ( दि. २१) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ननागरिकांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम गोळ्या, फेसशिल्ड, तसेच व्यापाऱ्यांना आर्सेनिक अल्बम, सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.
![]() |
लोहारा शहरातील व्यापाऱ्यांना आर्सेनिक अल्बम, सॅनिटायझर देण्यात आले.
|
यावेळी जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, उस्मानाबाद चे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षय ढोबळे, शिवसेना तालुका प्रमुख मोहन पनुरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक जवळगे, युवासेना लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार, उमरगा युवासेना तालुका प्रमुख अजित चौधरी, तुळजापूर युवासेना तालुका प्रमुख प्रतिक रोचकरी, युवासेनेचे उपतालुका प्रमुख शिवराज चिनगुंडे, नगरसेवक अभिमान खराडे, शाम नारायणकर, अतिक पठाण, जगदीश लांडगे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुधीर घोडके, शहर प्रमुख सलीम शेख, श्रीकांत भरारे, मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष भरत सुतार, दत्ता मोरे, प्रदीप मडुळे यांच्यसह लोहारा उमरगा तालुक्यातील युवासैनिक शिवसैनिक उपस्थित होते. शहरातील प्रत्येक घरात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करणार असल्याचे अमोल बिराजदार यांनी यावेळी बोलताना सांगितले.



No comments:
Post a Comment