09 August 2020

जोपर्यंत कोरोनाची तीव्रता कमी होत नाही, तोपर्यंत एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात - स्टुडंट हेल्पींग युनिटीच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली विनंती



जोपर्यंत कोरोनाची तीव्रता कमी होत नाही, तोपर्यंत एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती स्टुडंट हेल्पींग युनिटीच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
                या पत्रात त्यांनी म्हणले आहे की, कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेउन आपण विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले त्याबद्दल आभार.  यावर्षी 13 सप्टेंबर  2020 ला होणार्‍या राज्यसेवा पुर्व परीक्षा घेण्याची तयारी आयोगाने सुरु केली आहे. एकीकडे सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेउ नये म्हणून न्यायालयात गेले आहे, परंतु एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत परीक्षा घेणार असा दुजाभाव का ?
             सरकारने 31 ऑगस्ट पर्यत लॉकडाऊन वाढवले आहे. त्यात  बसगाडया ही बंद आहेत. जर बस सरकारने आठ दिवस आधी सुरु केली नाही तर पुर्वनियोजन नसताना विद्यार्थांच्या  गोंधळात आणखीनच भर पडेल. म्हणून बस कधी सुरु करणार हे आधी सरकारने स्पष्ट करावे. जेणे करून विद्यार्थी परीक्षेच्या चार दिवस आधी तरी शहरात जाऊ शकतील. अनेक विद्यार्थ्यांना खाजगीवाहने करुन जाणे परवडणार नाही.
              या विद्यार्थ्यांना केंद्र बदलायला सरकारने परवानगीे दिली नाही. राज्यातील लाखो विदयार्थी या परीक्षेला बसतात. यातील 50% विदयार्थी पुण्यातच अभ्यास करतात आणि परीक्षा केंद्रही प्राधान्याने ते पुणेच देतात. अशा वेळी एकदम विदयार्थी शहराकडे आले तर संक्रमणाचा धोका निश्चित आहे. त्याच बरोबर या विद्यार्थ्यांना एका दिवसाच्या परीक्षासाठी यांना कोण लगेच रुम देणार नाही. मान्य आहे की या परीक्षासाठी लाखो विदयार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. वेळेवरती परीक्षा घेणे महत्वाचेच आहे. परंतु सध्या तसा काळ आणि वेळ नाही. हि भयावह कोरोना स्थिती आपण वारंवार सोशलमिडीया व प्रसार माध्यमातुन सांगत असता, की काळजी घ्या. त्यांत सरकारने लोकल ट्रेन पण सुरु केल्या नाहीत मुबंई ,ठाणे यासारख्या परिसरातील विदयार्थीनी परीक्षेस कसे सामोरे जायचं? शाळा ,काँलेज, वसहतीगृह मिळेल ती जागा आपण कोरोना चे सेंटर म्हणुन उभे केलेत. सर्व परीक्षा केंद्र याच ठिकाणी असतात. त्याचबरोबर राज्यातील अनेक मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, जर अशी महत्वपूर्ण मंडळी संक्रमणातुन सुटत नसतील तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं काय?
त्यामुळेचं वरील सर्व मुद्याचा आपण गांभीर्याने विचार करून जोपर्यंत करोनाची तीव्रता कमी होत नाही. तोपर्यत या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती स्टुडंट हेल्पींग युनिटीच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

1 comment:

  1. आगदी योग्य जय महाराष्ट्र

    ReplyDelete