लोहारा प्रतिनिधी -
लोहारा तालुक्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोहारा शहरातील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसीलदार राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार रणजित शिराळकर, पंचायत समितीच्या सभापती अश्विनी पाटील, उपसभापती हेमलता रनखांब, पोलीस उपनिरीक्षक गंगाधर दराडे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख, तालुका कृषी अधिकारी एम. बी. बिडबाग यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
गटशिक्षण कार्यालयाच्या प्रांगणात पं. स.
सभापती अश्विनी पाटील यांच्या हस्ते धव्जारोहण करण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. लोहारा पोलीस ठाण्याचे ध्वजारोहण पोलीस निरीक्षक सर्जेराव भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. लोहारा नगरपंचायतचे ध्वजारोहण नगराध्यक्षा ज्योती दिपक मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, शहरातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचे ध्वजारोहण उपअभियंता एस.जी. माले यांच्या हस्ते करण्यात आले. तालुका कृषी कार्यालयाचे ध्वजारोहन तालुका कृषी अधिकारी एम.बी. बिडबाग यांच्या हस्ते करण्यात आले. लोहारा शहरातील कै. वसंतराव काळे विद्यालयातील ध्वजारोहण नगरसेवक शाम नारायणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूल चा ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्याची भाषणे, कवायत, कलागुण प्रदर्शन, मुलांना खाऊ वाटप आदी कार्यक्रम पार पडले. तसेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम ही संपन्न झाला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला पालक उपस्थित होते. महिलानां स्वतःला सिध्द करण्याची संधी म्हणून त्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक हिरा सोलापुरे, यशोधरा बनसोडे, गजाला सय्यद, अश्विनी कारभारी, मनीषा शिंदे, सुनीता कुंभार, लता पाटील, मनिषा जेवळे, आशा चौरे, सोमनाथ कुसळकर, सुनिल पवार, नितीन सितापूरे , सुनिल कांबळे, महादेव कांबळे आदी उपस्थित होते. लोहारा खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच शोभा शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लोहारा तालुका ग्रामिण रुग्णावयाचे ध्वजारोहण वैद्यकिय अधिक्षक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामिण पाणीपुरवठा कार्यालयाचे ध्वजारोहन उप अभियंता पी.व्हि. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लोहारा शहरातील हजरत अबुलफता कादरी ऊर्दु प्रायमरी शाळेचे ध्वजारोहण नुर मोमीन यांच्या हस्ते करण्यात आले. लोहारा शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुल चे ध्वजारोहण दत्तात्रय बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. लोहारा तालुक्यातील कास्ती बु. येथील जि.प.कें.प्रा.शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक एम.एन.चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आले.

No comments:
Post a Comment