श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय उमरगा आयोजित छात्रसेवाकाल शिबीराचे समारोप
लोहारा प्रतिनिधी :
उमरगा येथील श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयाच्या वतीने सिद्धेश्वर विद्यालय कसगी येथे चार दिवसीय छात्रसेवाकाल शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये विद्यार्था करीता विविध उपक्रम घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामकृष्णपंत खरोसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिध्देश्वर शिक्षण संस्थेचे सचिव विठ्ठलराव बदोले हे होते. या शिबीरात अध्यापन कार्य, रक्तदान शिबीर , वृक्षारोपन , पर्यावरण रक्षणासाठी व वाढविण्यासाठी गावातून वृक्षदिंडी काढून पथनाटय सादरीकरण करण्यात आले. क्रिडा विभागामार्फत विविध खेळ घेण्यात आले तसेच सामान्य ज्ञान स्पर्धा घेवून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले. तसेच भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.
या शिबीराच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला. या सांस्कृतीक कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग घेवून आपले कलाविष्कार सादर केले. या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून संजय कोथळीकर व व्ही एम सातपुते यांनी काम पाहिले. यावेळी प्राचार्य डॉ. विजय सरपे, मुख्याध्यापक संजय बदोले, जेष्ठ शिक्षक पटणे सर, डॉ. प्रा. कदम पि वाय. कदम, प्रा. बी व्ही. पवार, प्रा. एन.एम. देवकते, प्रा. ए .जेे. लाटे, प्रा. व्ही एम सातपुते, श्रध्दा जाधव, श्रुती चांदुरकर, कुलदीप जाधव आदी उपस्थित होते.
या छात्रसेवाकाल शिबीराचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व छात्राध्यापकांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगदीश सुरवसे यांनी तर श्रुती चांदुरकर यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment