28 January 2019

लोहारा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत एरंडी चा संघ विजेता तर लातूर चा संघ उपविजेता

लोहारा प्रतिनिधी -

लोहारा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत एरंडी चा संघ विजेता तर लातूर चा संघ उपविजेता



प्रजासत्ताक दिनानिमित्त लोहारा शहरातील कोब्रा बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान आयोजित भव्य खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत उस्मानाबाद तालुक्यातील एरंडी हा संघ विजेता तर लातुरचा संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघाला प्रथम बक्षीस रोख रक्कम रु. ११००० व चषक, उपविजेत्या संघाला रोख रक्कम रु. ९००० व चषक देण्यात आले.
                  लोहारा येथील कोब्रा बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त लोहारा हायस्कुल च्या मैदानावर व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. शनिवारी ( दि. २६) रात्री ८ च्या सुमारास उद्घाटन झालेल्या या स्पर्धा रविवारी ( दि. २७) दुपारपर्यंत सुरू होत्या. या स्पर्धेत उस्मानाबाद, लातुर, सोलापुर जिल्ह्यासह एकूण ६८ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील अंतिम, उपांत्य सामन्यासह अनेक सामने लक्षवेधी ठरले. अंतिम सामना पाहण्यासाठी शहरातील क्रीडा प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेत विजेता ठरलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील एरंडी संघाला प्रथम बक्षीस रु. ११००० व चषक, तर उपविजेता ठरलेल्या लातुरच्या संघाला द्वितीय बक्षीस रु. ९००० व चषक देण्यात आले. तसेच या स्पर्धेत मुरुड संघाला तृतीय बक्षीस ७००० रु. वचषक, उस्मानाबाद संघाला चतुर्थ बक्षीस ५००० रु, मातोळा अ संघाला पाचवे बक्षीस ३००० रु, मातोळा ब संघाला सहावे बक्षीस २००१ रु, अक्कलकोट संघाला सातवे बक्षीस १००१ रु, कोब्रा संघाला आठवे बक्षीस रु. ५०० देण्यात आले. तर उत्कृष्ट खेळाडु चे बक्षीस ( रु. १००१) व चषक एरंडी संघातील सुजितकुमार याला तसेच उत्कृष्ट नेटमँन चे बक्षीस ( रु. १००१) व चषक साई यांना देण्यात आले.
            या स्पर्धेसाठी कोब्रा बहुउद्वेशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता निर्मळे, उपाध्यक्ष महेश मक्तेदार, प्रताप घोडके, विजय ढगे, गोपाळ सुतार, सुनील देशमाने, सचिन भोसले, खंडू शिंदे, भरत सुतार, शैलेश जट्टे, विनोद लांडगे, चंद्रकांत नांगरे, ओम पाटील, परमेश्वर मुळे, किरण पाटील, शरणांपा कुंभार, अमोल रोडगे, संतोष शेवाळे, अनिल ठेले, नगरसेवक गगन माळवदकर, राजपाल वाघमारे, निहाल मुजावर, मधुकर सुरवसे यांच्या सह प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment