13 October 2019
लोहारा शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटवणार - रमाकांत गायकवाड
प्रतिनिधी / लोहारा
मतदारांनी उमरगा-लोहारा विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यास डबघाईला आलेल्या उमरगा येथील एमआयडीसीला उर्जित अवस्थेत आणण्याबरोबरच लोहारा शहराचा कायमस्वरुपी पाणी प्रश्न मिटविणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमाकांत गायकवाड यांनी पत्रकार परीषदेत व्यक्त केले.
यावेळी बोलताना रमाकांत गायकवाड म्हणाले की, लोहारा-उमरगा तालुक्यात बेरोजगार तरुणांची संख्या लक्षणिय आहे. त्यांच्या हाताला काम नसल्याने तरुणवर्ग मुंबई, पुणे या सारख्या शहरात मोठ्याप्रमाण स्थलांतरीत होत आहेत. तालुक्यातील प्रस्थापित नेते मात्र या तरुणांचा वापर केवळ निवडणूक प्रचारासाठी करून घेतात. सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम त्यांच्याच गावात उपलब्ध करुन देण्याच्या इराद्याने निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे केजी टू पीजी पर्यंतचे शिक्षण मोफत करुन गुणात्मक शिक्षण देण्यास प्राधान्य देणार आहे. दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तीन खेडी व पाच खेडी पाणीपुरवठा योजना राबविण्यास प्राधान्य देणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तसेच ही माझी पहीली व शेवटची निवडणूक राहणार आहे. मी यापुढे कुठलीही निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अमोल माटे, अतुल कांबळे, मधुकर वाघमारे, तात्याराव कांबळे, मोहन वाघमारे, सचिन रोडगे आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment