प्रतिनिधी / उमरगा
शिवसेना गेल्या पाच वर्षात सत्तेत असूनही सर्वसामान्य जनतेबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी सरकारला सतत धारेवर धरण्याचे काम केले असल्याने मतदार नक्कीच शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशीआहेत. गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमदार ज्ञानराज चौगुले हे यावेळी हँट्रीक मारणार असून त्यांना मोठ्या मताधिकक्याने विजयी करावे असे आवाहन माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी केले.
उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील हनुमान चौकात गुरूवारी ( दि. १७) रात्री शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. गायकवाड बोलत होते.या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर पाटील होते. यावेळी उमरगा-लोहारा तालूक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना तालूकाप्रमूख बाबूराव शहपुरे, युवासेनेचे किरण गायकवाड, भाजपचे माजी उपसभापती दिलिप गौतम, उपतालूका प्रमूख सुधाकर पाटील, शेतकरी सेना उपतालूका प्रमूख बलभिम येवते, विभाग प्रमूख राम जाधव, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास जाधव, माजी पंचायत समिती सदस्य मारूती थोरे, जेष्ठ नागरिक मुरलिधर कारभारी, गुरूवाडीचे सरपंच पप्पू घोडके, कोळसूरचे माजी सरपंच दिलिप जगताप आदिंची प्रमूख उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना प्रा. गायकवाड म्हणाले की, गेल्या दहा वर्षापासून आमदार चौगुले यांनी कधीही कोणत्याही जाती-धर्माचा विचार केला नाही. अडचण घेवून आलेल्या प्रत्येकाला न्याय मिळवून दिला आहे. दोन्ही तालुक्याचा सर्वांगिण विकास साधन्यासाठी, शासन दरबारी सतत संघर्ष करून जास्तित जास्त विकास निधी आणला आहे. त्यामूळे विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता चौगूलेंना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना आमदार चौगूलेंनी जनतेचा सेवक राहणार असून कधीही मालक होणार नसल्याचे वचन दिले. यावेळी श्री गौतम व सुधाकर पाटील यांचीही भाषणे झाली. सभेचे प्रास्ताविक शिवशक्ति साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पंडीत शिंदे यांनी तर सूत्रसंचालन व आभार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी मानले.

No comments:
Post a Comment