![]() |
| शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये नुकसान झालेल्या कुटुंबाला बाबा जाफरी सोशल फाउंडेशन च्या वतीने गृहोपयोगी साहित्य देण्यात आले. |
प्रतिनिधी / लोहारा
उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे मेहबूब शेख यांच्या घरी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये नुकसान झाले होते. या घटनेची माहिती बाबा जाफरी यांच्यापर्यंत पोहोचली. ते सध्या मक्का मदीना येथे उमराह यात्रेसाठी गेले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांच्या मित्र मंडळींना संपर्क साधून दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला मदत करण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे बाबा जाफरी सोशल फाऊंडेशनचे सदस्य दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला (मेहबूब शेख) भेट देऊन गृहोपयोगी साहित्य देवुन मदत करण्यात आली.
यावेळी इरफान जहागीदार, असिफ शिलार, अस्लम पटेल, अमीन शेख, दिलीप निंबाळकर, लक्ष्मण आयवळे, अविनाश राठोड, प्रकाश राठोड, असिफ मुल्ला यांच्या सह बाबा जाफरी सोशल फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते.
बाबा जाफरी यांनी त्यांच्या सोशल फाऊंडेशन च्या माध्यमातून अनेक सॅम7कार्य केली आहेत. तसेच अनेकांना मदत केली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment