![]() |
| महायुतीचे उमेदवार आ. ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ उमरगा शहरात भव्य पदयात्रा संपन्न झाली. |
प्रतिनिधी / लोहारा
भाजप, शिवसेना, रिपाई व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ रविवारी ( दि. १३) उमरगा शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली.
या पदयात्रेदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड, उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सर्वसामान्य मतदारांच्या भेटी गाठी घेत संवाद साधला. महादेव मंदिरापासून भाजपचे जेष्ठ नेते अनिल धारूरकर यांच्या हस्ते नारळ अर्पण करून पदयात्रेला सुरवात करण्यात आली. महादेव गल्ली, सय्यदबाशा गल्ली, जुनीपेठ, हमीद नगर, कोळीवाडा, बालाजीनगर, बँक कॉलनी, राष्ट्रीय महामार्ग, एकोंडी रोड परिसर, मुंशी प्लॉट, पतंगे रोड, म्हात्रे प्लॉट, शिवपुरी रोड मार्गे निघालेल्या या पदयात्रेचा समारोप पतंगे रोड येथील सचिन कॉर्नर येथे करण्यात आला.
यावेळी पदयात्रेत शिवसेनेचे जितेंद्र शिंदे, किरण गायकवाड, माजी जिल्हा उपप्रमुख बसवराज वरनाळे, बाजार समिती सभापती सुलतान सेठ, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, विवेक हराळकर, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, तालुका प्रमुख बाबूराव शहापुरे, प्रभारी बळी सुरवसे, नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोने, संदिप चव्हाण, संदीप चौगुले, योगेश तपसाळे, शरद पवार, साई विभुते, भाजपचे जिल्हा बँकेचे व्हाइस चेअरमन कैलास शिंदे, तालुक्याध्यक्ष माधवराव पवार, कृ उ बा स उपसभापती रमेश माने, जिल्हा परिषद सदस्य दिग्विजय शिंदे, दिलिपसिंह गौतम, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, सरचिटणीस सिद्धेश्वर माने, पंकज मोरे, प्रसिद्धीप्रमुख विठ्ठल चिकुन्द्रे, किरण रामतिर्थे, नगरसेवक आकाश शिंदे, इराप्पा घोडके, अमर वरवटे, महादेव सलके, रिपाइंचे सुभाष सोनकांबळे आदींसह शिवसेना, युवासेना, भाजप, रिपाई व महायुतीच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



No comments:
Post a Comment