27 November 2019
उमरगा - मराठा सोयरिक संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर
प्रतिनिधी / उमरगा
तालुक्यातील मराठा सोयरिक संघटनेची तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली असून खालील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही संघटना कार्य करणार असल्याचे मत तालुका प्रमुख विद्याताई वाघ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
समाजातील विधवा, परितक्ता, आर्थिक दृष्टय़ा दुर्बल, अनाथ अशा मुलींच्या लग्नाला आर्थिक मदत करणे, समाज विकास संस्थेचे मंगल कार्यालय मोफत पुरविणे आदी उद्दिष्ट असल्याचे विद्याताई वाघ यांनी सांगितले तर रेखाताई पवार यांनी वय झालेल्या युवा युवतींचे लग्न जमविण्यावर जास्त भर देण्यात यावा असे मत व्यक्त केले. तसेच हुंडा विरोधी चळवळ सक्रिय करावी असे मत सुवर्णा उगले, सीता सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. आंतरजातीय विवाहास प्राधान्य द्यावे असे मत सारिका लोढे यांनी व्यक्त केले. त्याचसोबत आजपासून तालुक्याचे मध्यवर्ती कार्यालय म्हणून समाज विकास संस्थेचे कार्यालयामध्ये लग्न जुळवनी केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. संघटनेची तालुका कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली. त्याप्रमाणे मराठा सोयरिक संघटनेच्या तालुका प्रमुखपदी विद्या वाघ, कार्याध्यक्ष सीता सुर्यवंशी, उपाध्यक्ष सविता मुळे, सचिव सुवर्णा उगले, खजिनदार सारिका लोंढे, संघटक रेखाताई पवार, प्रचारक सविता मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)


Nice work 👌
ReplyDelete