09 February 2020
कलदेव निंबाळा येथे विहिरींच्या कामांचा शुभारंभ
कलदेव निंबाळा येथे विहिरींच्या कामांचा शुभारंभ
आ. ज्ञानराज चौगुले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या हस्ते नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा शुभारंभ -
प्रतिनिधी / उमरगा
नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजने अंतर्गत कलदेव निंबाळा ग्रामपंचायतीच्या वतीने मंजुर करण्यात आलेल्या विहिरींच्या कामाचा शुभारंभ आ. ज्ञानराज चौगुले, उस्मानाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जि.प. सदस्य प्रा. सुरेश बिराजदार, शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, पंचायत समिती सदस्या पानफुलाबाई कांबळे, तालुका कृषी अधिकारी एस. व्ही. जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सचिव बाळासाहेब स्वामी आदीच्या हस्ते लाभार्थी विवेकानंद डोणगावे यांच्या विहीरीचा कार्यरंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच सुनिता पावशेरे, बाबूराव शहापुरे, सदानंद शिवदे पाटील, अजित पाटील, अतुल गायकवाड, तुकाराम बिराजदार, सुनिल पांचाळ, एस . व्ही गायकवाड, प्रभाकर बिराजदार, तुकाराम जाधव, खयूम चाकुरे, प्रा . रमाकांत पाटील, मधुकर पाटील, कलाकार पाटील, विजयकुमार डोणगावे, बन्सी चव्हाण, कल्लेश्वर जाधव, किरण स्वामी, अतूल गायकवाड, निळकंठ कांबळे, किसाबाई डोणगावे, शिवाजी रसाळ, प्रभाकर बिराजदार, बळीराम मुसांडे, वैजनाथ कल्याणकर , मलिनाथ कारभारी, गोपाळराव डोणगावे, पांडूरंग पाटील, किरण स्वामी, अजित भालेराव, गहिनीनाथ बिराजदार, दयानंद सुर्यवंशी , कुमार सरवदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते . याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
गावातील शेतकऱ्यांनी गाव स्तरावरील कृषी संजिवनी समितीकडे ऑनलाईन विहीर मागणीचे अर्ज नोंदणी केले होते. यामधून शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार अपंग, मागासवर्गीय, खुला प्रवर्गास पारदर्शक ड्रॉ पद्धतीने विहीरींचे वाटप सर्व प्रवर्गाला ग्रामपंचायतीच्या वतीने तालुक्यात प्रथम केल्याचे या कृषी समितिच्या अध्यक्षा तथा सरपंच सुनिता देविदास पावशेरे यांनी या प्रसंगी सांगितले. देविदास पावशेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment