06 February 2020

सहशिक्षक विजयकुमार कलशेट्टी यांना राज्यस्तरीय गुणीजण शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान






प्रतिनिधी / लोहारा

उमरगा तालुक्यातील आलूर येथील जि. प. कन्या प्राथमिक शाळेतील  तंत्रस्नेही सहशिक्षक विजयकुमार कलशेट्टी यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अँकाडमी, मुंबई तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय गुणीजण शिक्षकरत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अँकाडमीचे संस्थापक अध्यक्ष अँडव्होकेट कृष्णाजी जगदाळे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण  करण्यात आले. सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र आणि मानकरी बॅच हे या राज्यस्तरीय गुणीजण गौरव पुरस्काराचे स्वरूप होते.
            तंञज्ञानाच्या युगात डिजीटल करण्याचे उद्दिष्ट शाळेसमोर    असताना तंञस्नेही उपक्रमशील शिक्षक विजयकुमार कलशेट्टी यांच्या सहविचार कल्पनेतून शाळेचे सर्व वर्ग डिजीटल झाले आहे. शाळेतील सर्वच वर्ग Smart Led Tv युक्त झाले आहेत. याद्वारे शाळेतील विद्यार्थीनीना स्वयंअध्ययन, इंटरनेट, युटुब अँप्स हाताळण्यास मदत होत आहे. शाळेत बोअरवेल, प्रोजेक्टर, संगणक संच, ध्वनी साधने आदी साहीत्याने शाळा समृध्द बनली आहे. शाळेतील सर्वच शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका, वाँटर बेल, led tv द्वारे अध्यापन, आदी नवनवीन उपक्रम राबविले जातात.
            विजयकुमार कलशेट्टी यांचे शैक्षणिक, सामाजिक, अष्टपैलू कार्य पाहूनच मनुष्यबळ विकास लोकसेवा अँकाडमी, मुंबईने त्यांना सन्मानित केले आहे. या यशाबद्दल शाळेतील मुख्याध्यापक अनिल सोमंवशी व सर्व शिक्षक स्टाफच्या वतीने परिपाठात त्यांचा गौरव करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्नेहलता भालके, उपाध्यक्ष महादेव बिराजदार, सर्व सदस्य, सरपंच सुरेश बोळदे, उपसरपंच राजकुमार माने, तंटामुक्त समिती अध्यक्ष नागेश पाटील, माजी पं.स.सदस्य शिरीष पाटील, तसेच जि .प . उर्दू शाळा आलूर , सरस्वती इंग्लिश स्कूल आलूर , सोमेश्वर इंग्लिश स्कूल आलूर , जि .प इंदीरा नगर आलूर , फिनिक्स फाउंडेशन अचलेर, केसरजवळगा, अचलेर, बेळंब, मुरुम, आलूर व परिसरातून सर्वच नागरीकांनी कलशेट्टी यांचे कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment