20 February 2020
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलचे ७ वे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा संपन्न
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलचे ७ वे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा मंगळवारी ( दि.१८) संपन्न झाला. यावेळी स्कुल च्या चिमुकल्यांनी विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प.सदस्य दीपक जवळगे होते. लोहारा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा ज्योती मूळे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपनगराध्य प्रताप घोडके, दिपक मूळे, नगरसेवक गगन माळवदकर, दत्तात्रय वाडीकर, प्रा. यशवंत चंदनशिवे, दत्तात्रय गायकवाड, जयराम चोबे, सुरेखा भोसले, ब्रह्मकुमारी सरिता बहनजी, स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव, पालक प्रतिनिधी शिवराज झिंगाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, कलेची देवता नटराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेच्या वतीने मान्यवरांना स्मृतिचिन्ह व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय कब-बुलबुल, स्काऊट गाईड राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त विद्यार्थी, आदर्श शिक्षक म्हणून पूजा दाळिंबकर, वर्षा घोडके यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी केलेल्या प्रास्ताविकातून स्कुलचा वर्षभरातील आढावा प्राचार्य शहाजी जाधव यांनी मांडला. ते म्हणाले की, कोणतीही भाषा ही वाईट नसते, ज्याप्रमाणे मराठी मातृभाषा, हिंदी राष्ट्रभाषा आहे त्याचप्रमाणे इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याने या भाषेतून शिक्षण देणे ही काळाची गरज आहे.
यावेळी बोलताना दिपक जवळगे म्हणाले की, न्यू व्हिजन या नावाप्रमाणेच स्कुलचे कार्य आहे. लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांच्या पाल्यांना या शाळेत इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे असे मत मांडून स्कुलच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये चिमुकल्यानी गणेश वंदना व उठाओ बस्ता - है आगे स्कुल का रस्ता या गीताने प्रारंभ केला. यावेळी लोकनृत्य, तांडवनृत्य, गोंधळगीत, देव मल्हारी, देशभक्तीपर गीत, माय भवानी, कब्बडी डान्स, फनी डान्स, लावणी, बालगीत, शेतकरी गीत, महाराष्ट्राची लोकधारा, मराठी- हिंदी सिनेमातील गीतावर विविध प्रकारची नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच समाजातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्याच मुलांकडून होणारे हाल व आपला समाज मातृ पितृ देवोभव: ही संस्कृती विसरत चालल्याचे विदारक सत्य वृद्धाश्रम या नाटिकेतून दाखवून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणले. छ. शिवरायांचे चरित्र दर्शविणारे 'एकच राजा इथे जन्मला' व 'दैवत छत्रपती' हे गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्र संचलन सविता जाधव यांनी तर आभार सिद्धेश्वर सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कुलमधील शिक्षक रामेश्वर पंजरकर, व्यंकटेश पोतदार, अनंत समदळे, परमेश्वर जाधव, रवींद्र चव्हाण, गणेश सूर्यवंशी, शीतल खराडे, हिना सौदागर, पूनम गोरे, मीरा शिवकर, प्रणिता जवादे, चांदबी चाउस, हुमेरा पटेल, पूनम पंजरकर, स्वाती कुलकर्णी, वैशाली स्वामी, सुवर्णा पाटील आदींसह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात वर्षभरात पालकांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)




No comments:
Post a Comment