08 February 2020
लोहारा तालुक्यातील हराळी येथील सचिन सूर्यवंशी यांच्याकडून महालिंगरायवाडी शाळेला क्रीडा साहित्य
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा तालुक्यातील हराळी येथील सचिन सूर्यवंशी यांनी उमरगा तालुक्यातील महालिंगरायवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला क्रीडा साहित्य वितरित केले आहे. महालिंगरायवाडी येथे बुधवारी ( दि. ५) क्रीडा साहित्य वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल, फुटबॉल, बॅट, बॉल, बॅडमिंटन किट, जंपिंग रोप, रिंग्स आदी साहित्य देण्यात आले. यावेळी सचिन सूर्यवंशी यांनी मुलांनी शारीरिक क्षमता कशी वाढवावी याविषयी मुलांना माहिती सांगितली तसेच जलसंधारण व पाण्याच्या शुद्धते विषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी किसन सूर्यवंशी, उपसरपंच आशाताई भुसार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या चंदा घोरपडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षक राजेश सुर्यवंशी यांनी तर शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी आभार मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment