10 August 2020

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना मशाल फाऊंडेशन, पुणे यांचेकडून शैक्षणिक साहित्याची मदत



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना पुण्यातील मशाल फाऊंडेशनच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून रविवारी ( दि.९) शैक्षणिक साहित्याचे किट्स वितरित करण्यात आले. सास्तूर दिव्यांग शाळेत आयोजित कार्यक्रमात हे किट्स वितरित करण्यात आले.


                   या शैक्षणिक किट्स मध्ये १०० दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग्ज,५०० वह्या, चित्रकलेचे साहित्य, सॅनिटायझेशनसाठी साबण,  मास्क इ. साहित्य शाळेचे मुख्याध्यापक बी. टी.नादरगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरूपात शाळेत उपस्थित निराधार दिव्यांग विद्यार्थी दत्ता गिरी व सोनाली बेळे यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक किट्स चे वितरण करण्यात आले. सदर किट्स मशाल फाऊंडेशन, पुणे या संस्थेचे प्रमुख शरद महाजन यांच्या दातृत्वातून उपलब्ध करून देण्यात आले.





 सास्तूर निवासी दिव्यांग शाळेतील १०० दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार साहित्याचे वितरण करण्यात आले. सास्तूर सारख्या ग्रामीण भागात निवासी दिव्यांग शाळेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाचे कार्य निस्वार्थ भावनेने केले जात आहे. समाजानेही या चांगल्या कार्याला भरीव मदत करावी. यासाठी पुणे येथील मशाल फाऊंडेशनकडून समाजातील दात्यांनी  प्रेरणा घेवून, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे असे प्रतिपादन प्रा. डॉ. महादेव शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माकणी गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. महादेव शिंदे हे होते. यावेळी मशाल फाऊंडेशन पुणे या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रा. विष्णु शिंदे, माकणी येथील आदर्श शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी, आयसीड फाऊंडेशन माकणी या संस्थेचे संचालक महेश शिंदे, आयसीड संस्थेचे पुणे येथील सदस्य नितीन नरखेडकर, हराळी येथील किशन सूर्यवंशी, सुरेश मरगळे, श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम नादरगे, शांतेश्वर दिव्यांग व्यावसायीक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रा. बी. एम. बालवाड, प्रशालेचे मुख्याध्यापक बी. टी. नादरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.



या कार्यक्रमासाठी शाळेतील विशेष शिक्षिका अंजली चलवाड, राष्ट्रीय दिव्यांग खेळाडू प्रयागताई पवळे, प्रशालेतील कर्मचारी वृंद विठ्ठल शेळगे, ज्ञानोबा माने, एन. सी. सूर्यवंशी, गोरक पालमपल्ले, डी. एस. सगर, सूर्यकांत कोरे, शंकरबाबा गिरी, माधव मुंडकर, सुरेखा परीट, सविता भंडारे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मशाल फाऊंडेशनचे व्यवस्थापक प्रा. विष्णु शिंदे यांनी केले. तर सूत्रसंचलन विठ्ठल शेळगे यांनी केले.

1 comment: