09 September 2020
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी घेतली जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट - जिल्ह्यातील विविध विषयांवर झाली चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची बुधवारी (दि. ९) भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने सध्याच्या कोविड १९ ची उद्भवलेली गंभीर परिस्थिती, दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी, सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वेमार्गाचे जास्तीत जास्त काम रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात यावे, उस्मानाबाद येथे होत असलेले वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ होणेबाबत, जिल्हा बँक आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.
याबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढाकार घेऊन हे प्रश्न मार्गी लावावेत अशी विनंती करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, उस्मानाबाद चे माजी नगराध्यक्ष संपतराव डोके, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, उस्मानाबाद शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)



No comments:
Post a Comment