14 September 2020

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (स) येथे कृषी सहाय्यक दिपक जाधव यांच्या बदलीनिमित्त निरोप समारंभ संपन्न



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (स) येथे कृषी सहाय्यक पदावर कार्यरत असलेले दिपक जाधव यांची सास्तुर येथे बदली झाली आहे. शनिवारी ( दि. १२) हिप्परगा ( स) येथे ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून निरोप दिला.
             दिपक जाधव हे मागील ९ वर्षांपासून हिप्परगा (स), करवंजी येथे कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांची सास्तुर येथे बदली झाली. जाधव यांनी मागील ९ वर्षात केलेल्या उत्कृष्ठ सेवेबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी ( दि.१२) त्यांना निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच नागनाथ पाटील, पोलीस पाटील संतोष यादव, सोसायटीचे चेअरमन श्रीशैल्य ओवांडे, चांद कारभारी, ग्राम रोजगार सेवक लक्ष्मण मोरे, आदिनाथ भोजराव, दयानंद ओवांडे, मंगलताई सुरवसे, करवंजीचे सरपंच तानाजी हाक्के, भरत मुगळे, सोमनाथ भोंडवे, अनिल ओवांडे यांच्यासह हिप्परगा (स), करवंजी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी दिपक जाधव यांनी मागील ९ वर्षांत केलेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment