17 September 2020

लोहारा येथे मराठा आरक्षणाबाबत संभाजी ब्रिगेडचे निवेदन



प्रतिनिधी / लोहारा

पंतप्रधानांनी लोकसभा व राज्यसभेत मराठा आरक्षणाचा ठराव पास करून हा विषय मार्गी लावावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. लोहारा तहसीलदार विजय अवधाने यांनी हे निवेदन स्वीकारले.
                   मराठा आरक्षणासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पंतप्रधानांना तहसिलदार यांच्या मार्फत सोमवारी ( दि. १४) निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाच्या आरक्षण बाबत मा. सवौच्च न्यायालयाने दि. ९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने समाजाला दिलेल्या आरक्षणास स्थगिती देऊन मराठा आरक्षणाचा विषय स्वतंत्र घटना पिठाकडे वर्ग करण्याबाबत निर्दशीत केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संपूर्ण देशात विशेषताः महाराष्ट्रातील मराठा समाजास जबर फटका बसलेला आहे. मराठा समाज व्यथीत झालेला आहे. आम्ही घटनात्मक आरक्षणास पूर्णत पात्र आसताना देखील मराठा समाज आरक्षण लाभापासून कायम वंचित राहिलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून आपण समजून घ्याव्यात व मराठा आरक्षणाचा विषय लोकसभा व राज्यसभेत बहुमतांनी ठराव पास करून हा विषय मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाचा सरसगट ओबीसी मध्ये समावेश करावा, अंतिम निर्णय होईपर्यंत सध्या झालेली नोकरभरती, महाविद्यालयातील प्रवेश कायम ठेवावेत, घटना पिठाचा अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही स्वरूपाची शासकीय नौकर भरती करण्यात येउ नये,  महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढावा आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास घटनात्मक मार्गाने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी असा ईशारा या निवेदनात देण्यात आला आहे.




               या  निवेदनावर शरद पवार, धनराज बिराजदार, महादेव मगर, आण्णासाहेब पवार, शामसुंदर पाटील, बालाजी यादव, सुमित कोटमाळे, विशाल भोजराव, महेश भोजराव, सतिश जगदाळे, रवींद्र जाधव, विठ्ठल औरादे, अंगद मुळे, खंडू जांभळे, लक्ष्मण दावेकर, संतोष जांभळे, महादेव पवार, शरद मुळे आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment