18 March 2019
लोहारा तालुक्यातील अचलेर येथे फिनिक्स फाउंडेशन तर्फे करीअर मार्गदर्शन मेळावा
लोहारा प्रतिनिधी -
लोहारा तालुक्यातील अचलेर येथे फिनिक्स कोचिंग क्लासेस तर्फे विद्यार्थी, युवक, युवतीसाठी करीअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूणे येथील तज्ञ मोटीवेशनल ट्रेनर किसन गवळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुभाष माने, फिनिक्स फाऊंडेशन चे संचालक जगदीश सुरवसे, अमित लोखंडे, आएशा पटेल, गौरी धनशेट्टी, सोनाली करंडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरी धनशेट्टी यांनी केले. यावेळी मार्गदर्शक किसन गवळी यांनी विद्यार्थ्यांना १० वी व १२ वी नंतर काय करावे, कोणते शिक्षण घ्यावे, स्पर्धा परीक्षेची तयारी कसे करावे व ध्यानधारणा करण्याचे महत्व अशा अनेक विषया बद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर सुभाष माने, जगदीश सुरवसे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आएशा पटेल यांनी तर आभार सोनाली करंडे यांनी मानले. या कार्यक्रमास विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment