लोहारा प्रतिनिधी -
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील शारदा इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी लहान चिमुकल्याना विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
जेवळी येथील गुरू सिद्धेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती मनिप्र गंगाधर महास्वामी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हभप सिद्धलिंग महाराज, सरपंच मोहन पणुरे, उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीमंत कारभारी, धनराज हावळे, प्रा. किशोर वाघमारे, प्रा. शिंदे, डाॅ. संतोष ढोबळे, गुंडाप्पा कारभारी, बाबूराव ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. यावेळी बाल चिमुकल्यानी विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच पुलवामा शहिदांना श्रद्धांजली म्हणून ए वतन ए वतन हे गीत सादर केले. या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पोतदार यांनी तर कल्याणी ढोबळे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य मंजुशा कुलकर्णी, ए. एस. गाडेकर, टी. पी. दीक्षित, एम. आर. भोसले, के. एस. ढोबळे यांच्या सह सतिश ढोबळे, परमेश्वर ढोबळे, अप्पू ढोबळे, सोमनाथ ढोबळे, नागेश ढोबळे, बसवराज ढोबळे यांनी परिश्रम घेतले.



No comments:
Post a Comment