उस्मानाबाद प्रतिनिधी -
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शेकापूर रोडवरील बालाजी नगर येथील स्वामी समर्थ मूकबधिर निवासी शाळेतील विशेष शिक्षक भगवान चौगुले लिखित राष्ट्रीय कार्यक्रम “स्वच्छ भारत सुंदर भारत” या विषयावर दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देत व जनजागृती करीत अप्रतिम असे भारूड सादर केले.
यामध्ये महेश देवकुळे, कृष्णा शिंदे, अक्षय अलकुटे, विश्वनाथ राजे, अथर्व कोकाटे ,समर्थ मदने, काजल शेख, श्रेया गोवर्धन, सायमा सय्यद फातिमा शेख या दिव्यांग कलाकारांनी मनोरंजनातून प्रबोधन केले. तसेच सिमरन शेख या दिव्यांग विद्यार्थिनीने रेखा ओहोळ, विठ्ठल व्होरडे, भिमराव पाथरूड यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ते १२ वयोगटातून रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. या सर्वांचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना काबले, सहाय्यक सल्लागार सुभाष शिंदे, मुख्याध्यापक शकिल शेख, किरण जाधव, नागेश चव्हाण, संजय म्हमाणे यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment