06 December 2019
पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी / विद्यार्थींनींकरीता महाराष्ट्र लोकसेवा, राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यात येत असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोफत स्वरूपात मार्गदर्शनाची सोय
प्रतिनिधी / उस्मानाबाद
जिल्हा परिषद, उस्मानाबाद आणि जि.प. कर्मचारी कल्याण निधी यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद जिल्ह्यातील होतकरू, गरजू आणि गुणवंत पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी / विद्यार्थींनींकरीता महाराष्ट्र लोकसेवा, राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यात येत असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोफत स्वरूपात मार्गदर्शनाची सोय जिल्हा परिषद उस्मानाबाद येथील अधिकारी व कर्मचारी कल्याण निधीतून करण्यात आलेली आहे. सदरील केंद्रात दि. 1 मे 2016 पासून नियमितपणे वर्ग चालू असून आजपर्यंत STI , वित्त व लेखाधिकारी ( वर्ग 2), अशा विविध पदावर एकूण 31 पेक्षा अधिक मुलींची निवड झालेली आहे. या केंद्रात नियमितरित्या classes, नियमित चाचण्या, सुसज्ज ग्रंथालय, इंटरनेट सुविधा, Guest Lecturs, गट चर्चा, मुलाखतीची तयारी, IAS दर्जाचे उच्चपदस्थ अधिकारी यांचे मार्गदर्शन, वैयक्तिक मार्गदर्शन / समुपदेशनाची मोफत सोय करण्यात आलेली आहे. या केंद्राच्या बॅचची सुरूवात प्रत्येक वर्षाच्या दि. 1 नोव्हेंबर आणि 1 मे पासून सहा महिन्यांकरीता करण्यात येते. दि. 1 नोव्हेंबर 2019 या महिन्यामध्ये आठवी बॅच सुरू करण्यात आलेली आहे. तरी पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षातील मुलींनी जि. प. प्रशाला (मुलांची), उस्मानाबाद (DIECPD समोर ) येथे जाऊन प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी संपर्क :- 02472 222018,
मो. नं. 9226934100
स्थळ - उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, ( मुलांची ) जुनी इमारत , DIECPD समोर , बार्शी नाका , उस्मानाबाद.
रोहिणी कुंभार
सनियंत्रण अधिकारी
तथा
उपशिक्षणाधिकारी ( प्रा. ) जि.प. उस्मानाबाद
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment