19 December 2019
लोहारा येथे शिवसेना, युवासेना कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीने गैरहजर अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन
प्रतिनिधी / लोहारा
शेतकरी व वीज ग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी युवासेना, शिवसेना कार्यकर्ते व शेतकरी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात गेले असता संबंधित अधिकारी गैरहजर असल्याने बुधवारी ( दि.१८) गैरहजर अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांना व ग्राहकांना अवास्तव वीज बिल येणे, शेतीतील व लोहारा तालुक्यातील गावठाण, शेतातील डीपी नादुरुस्त असणे, अतीरिक्त लोड असलेल्या डीपीवरील वीजपुरवठा कमी करून सुरळीत वीजपुरवठा करणे, शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे, लोहारा शहरातील जट्टे डीपीवरील लोड कमी करून अतिरिक्त डीपी बसवणे, कार्यालयातील अधिकारी यांची गैेरहजेरी या मागण्याचे निवेदन देण्यासाठी उपकार्यकारी अभियंता कार्यालय लोहारा येथे बुधवारी (दि. १८) शेतकरी, युवासेना, शिवसेना कार्यकर्ते गेले असताना कार्यालयात अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे गैरहजर अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
यापुढे कामात हयगय करणे, शेतकऱ्यांना व ग्राहकांना त्रास झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा यावेळी देण्यात आला. यावेळी युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक शाम नारायणकर ,शिवसेना उपतालुकाप्रमुख अजमेर कारभारी, सामाजिक कार्यकर्ते दत्ता मोरे, विलास जेवळीकर, शाखाप्रमुख रमेश जाधव, दत्ता चंदनशिवे, शिवाजी पाटील, रणजित चंदनशिवे, नबीलाल तांबोळी, जीवन जाधव, अनिल चंदनशिवे, दादासाहेब मसलकर, आनंदराव मुळे, लियाकत मुल्ला, दिलीप जाधव, इरफान शेख, जावेद दाळिंबकर, किसन पाटील यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment