प्रतिनिधी / लोहारा
तालुक्यातील लोहारा खुर्द येथील लोकमंगल माऊली साखर कारखान्यातील कर्मचारी श्रीनिवास चिकुंद्रे (रा. माकणी ) यांचे दि. २ नोव्हेंबर ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. चिकुंद्रे यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य म्हणून लोकमंगल माऊली लोहारा कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे एकुण रक्कम रु. १,५२०७०/- जमा झाले. तसेच लोकमंगल समूहाकडून चिकुंद्रे यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य म्हणून आर्थिक मदत म्हणून रु. १ लाख १ हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही दोन्ही रक्कम मिळून एकूण दोन लाख त्रेपन्न हजार सत्तर रुपयांचा धनादेश लोकमंगल समूहाचे चेअरमन महेश देशमुख, संचालक प्रशांत पाटील, टेक्नीकल डायरेक्टर मोहन पिसे यांच्या हस्ते गुरुवारी ( दि. २६) कै. श्रीनिवास चिकुंद्रे यांच्या पत्नी वर्षाराणी चिकुंद्रे व त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी लोकमंगल समूहाचे कर्मचारी राम पाटील, संजय जाधव, सुधाकर राठोड, प्रशासन अधिकारी अजमेर कारभारी, सगर साहेब, शेतकी अधिकारी अमरीष कदम, माकणीचे सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच दादासाहेब मुळे, सदस्य उमाशंकर कलशेट्टी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment